Friday, February 4, 2011

वाकल्या गर्विष्ठ माना...!

प्रसंग पहिला
दिंनाक : ५ फेब्रुवारी २००१,
स्थल : कर्मवीर भाउराव पाटिल महाविद्यालय,पंढरपुर
कार्यक्रम:-"जिमखाना डे"चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
वेळ:- सकाळी ११:३०
(महाविद्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त हजर आहे)
                      पंढरपुर मधील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाउराव पाटिल महाविद्यालयाचा "जिमखाना डे"चा वार्षिक कार्यक्रम सुरु झाला होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुने/वक्ते म्हणून तथाकथित शिवशाहीर ब.मो तथा बाबासाहेब पुरंदरे हे उपस्थित होते.बाबासाहेब पुरंदरे हे भाषण करण्यासाठी उभे राहिले ते "जय भवानी...!जय शिवाजी....!" या घोषनांनच्या निनादात.बाबासाहेब पुरंदरे हे डायसवर पोहचले,तोच एक विद्यार्थी कुणाच्या लक्षात येण्याच्या आत डायस जवळ गेला आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हातात एक कागद दिला.बाबासाहेब पुरंदरेनी कागद पहिला व चूरगालुन फेकून दिला.आणि हिटलर,मुसोलिनी यांची नावे घेत आपले भाषण सुरु केले.बाबासाहेब बराच वेळ बोलत राहिले.पण....तेवढ्यात अचानक विद्यार्थ्यांन  मधून आवाज आला......."बाबासाहेब पोथी-पुराण बंद करा.आणि शिवजयंतीच्या तारीख-तिथि वादाचा खुलासा करा...!"तसे बाबासाहेब हडबडले...आणि "मी या  परिस्थितित  भाषण करू शकत नाही" असे म्हणाले आणि आपल्या जागेवर रागाने जाउन बसले.महाविद्यालयाचे प्राचार्य बोलायला उभा राहिले आणि "ज्यांना कार्यक्रमासाठी बसायचे नाही अशा विद्यार्थ्यानी बाहेर जावे."असे फर्मावले.व बाबासाहेबाना पुन्हा भाषण सुरु करण्याची विनंती केली.बाबासाहेब पुन्हा भाषणाला काही झालेच नाही या अविर्भावात उभे राहिले.आणि.....सभा मंडपात एकच आवाज दणाणला आणि तो होता....जय जिजाऊ...! जय शिवराय....!शिवजयंती तारीख-तिथीचा वाद लावणारया  बाबा पुरंदरेचा धिक्कार असो....!आणि सभेत मागील खुर्च्या पुढे जावून पडू लागल्या.पोलिसानी फास आवळला.पत्रकारांच्या नजरा,कैमेरा गोंधलाच्या दिशेने वळले.कोणालाच काय घडत आहे समजत नव्हते.आणि आवाज घुमला "अरे....आवाज कुणाचा..."प्रति आवाज आला"संभाजी ब्रिगेडचा" होय......संभाजी ब्रिगेडचा...! हेच माझ्या आयुष्यातिल पहिले आंदोलन.आणि मी आणि माझ्या सहकार्यानी  ब्राम्हणशाहिला दिलेला पहिला दणका...!
              महाराष्ट्र व देशा मध्ये छत्रपति शिवाजी महाराजान  बद्दल ब्राम्हनानी अनेक वाद निर्माण करुन ठेवले आहेत.त्या मधील एक वाद म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेचा वाद होय.या वादाची पार्श्वभूमी सर्व प्रथम आपण पाहुया.छत्रपति शिवाजी महाराजांच्या जन्म तिथिच्या वादाची सुरवात भटमान्य टिळकाने केली.हा वाद अनेक वर्ष सुरु राहिला.आणि १९६६ साली मुख्यमंत्री वसंतदादा पाटिल यांनी इतिहास अभ्यसकाची एक समिति नेमली.यासमिति मध्ये न.र.फाटक,ग .ह .खरे ,वा .सी .बेंद्रे ,दत्तो वामन पोतदार ,डॉ.आप्पासाहेब पवार आणि ब.मो .म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांचा समावेश होता.या समितीने शासनाच्या पैशाचा अनेक वर्ष चुराडा केल्या नंतर फाल्गुन वद्य तृतीय या तिथिच्या बाजूने आपला निर्णय दिला.नेमके त्याच वेलेला मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांनी शिवजयंती तारखेने साजरी केली जावी अशी मागणी शासनाकडे लावून धरली होती.१९९५ साला पासून मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड व इतर बहुजन संस्था आणि संघटना १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यास सुरवात केली होती.शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने १५ फेब्रुवारी २००० च्या जी.आर.द्वारे शिवजयंतीची १९ फेब्रुवारी ही शासकीय समितीने मान्य केलेली तारीख मान्य करुन जाहिर केली.
                 पण यामुले शिवचरित्र वादातीत ठेवण्याच्या ब्राम्हनाणच्या षडयंत्रावर  पाणी पडले होते.म्हणून कालनिर्णय केलेंडरचे साळगावकर यांनी वर्तमानपत्रात मोठमोठ्या जहिराती देऊन "शिवजयंती १२ मार्च रोजीच"या स्वरुपाचे आवाहन केले.व आपल्या मुद्दयाच्या समर्थनासाठी अनके इतिहास अभ्यासकाची पत्रे प्रसिद्ध केली.त्या पत्रात पहिले पत्र बाबासाहेब पुरंदरे यांचे होते.बाबासाहेब पुरंदरे यांनी शासनाच्या समितीत असताना १९ फेब्रुवारी च्या बाजूने आपले मत दिले होते.आणि बाहेर मात्र आपला बामनीकावा दाखवत तिथिचे समर्थन केले होते.
                  याच पार्श्वभूमीवर आम्ही महाविद्यालयात रितसर निवेदन देवून खुलासा करण्याची मागणी केली होती.पण आमच्या मागनिचा कागद फेकून देत त्यांनी आपली जात दाखवली.त्याचा परिणाम वरिल प्रसंग घडण्या पर्यंत गेला.कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ घातला म्हणून आम्हाला पोलिसानी महाविद्यालयातुन बाहेर काढले.आम्ही महाविद्यालयाच्या गेटवर घोषणाबाजी चालू केली.बाबासाहेब पुरंदरेची गाड़ी बाहेर जाऊ न देण्याचे ठरले.परिस्थिति हाता बाहेर जात असल्याचे पोलिसाच्या लक्षात आले.व त्यानी आमच्याशी संपर्क साधला.व शिवजयंतीच्या तारीख-तिथि वादाचा खुलासा केल्याशिवाय आम्ही बाबासाहेब पुरंदरेची गाड़ी बाहेर जाऊ देणार नसल्याचा निर्धार बोलुन दाखवला.पोलिसानी मध्यस्थी करण्याचे मान्य करुन बाबासाहेबाना आमचा निरोप दिला.बाबासाहेबानी आम्हाला विश्रामग्रहावर पाच मिनिट वेळ देण्याचे मान्य केले.आणि नेमके बाबासाहेब पुरंदरे इथेच आमच्या जाल्यात अडकले....!
                  विश्रामग्रहावर जबरदस्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.आम्ही साधारण १०० ते १५० कार्यकर्ते आगोदरच विश्रामग्रहावर पोहचलो होतो.पोलिस  बंदोबस्तात बाबासाहेब पुरंदरे यांचे आगमन झाले.मी त्यांना बसण्यासाठी खुर्ची दिली.आणि मी बाबासाहेब पुरंदरेना प्रश्न विचारन्यास सुरवात केली.
मी:-आपण शासनाने नियुक्त केलेल्या  शिवजयंतीच्या तारीख निश्चिती करण्याच्या समिति मध्ये होता.त्या वेळेस आपण १९ फेब्रुवारी च्या बाजूने आपले मत दिले होते.आणि आता आपण  कालनिर्णय केलेंडरचे साळगावकर यांनी वर्तमानपत्रात मोठमोठ्या जहिराती देऊन "शिवजयंती १२ मार्च रोजीच"या स्वरुपाचे आहवान केले त्याच्या समर्थनात पत्र दिले आहे.त्यामुले शिवप्रेमी मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मग शिवप्रेमीनी कोणती शिवजयंती साजरी करावी.
बाबासाहेब पुरंदरे:-छत्रपति शिवाजी महाराज हे आपले राम,कुष्ण या प्रमाणे देवत आहेत.ज्याप्रमाणे आपण राम,कुष्ण यांची जयंती तिथिने साजरी करतो.त्याप्रमाणे छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती तिथिने साजरी केली पाहिजे.असे माझे मत मी शासनास कळविले आहे.
मी:-पण आपण तर शासनाच्या अहवालात तारखेची बाजु घेतली आहे.आणि राम,कुष्ण हे देव पुरुष आहेत.आणि शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत.त्यांची तुलना आम्हाला मान्य नाही. (या मुद्द्यावर बाबासाहेब हडबडले)
बाबासाहेब पुरंदरे:-ते माझे सार्वजनिक  मत आहे.हे माझे व्यक्तिगत मत आहे.
मी:-मग यापैकि कोणत्य मताने आम्ही शिवजयंती साजरी करावी.
बाबासाहेब पुरंदरे:-अर्थाथच तिथिने साजरी केली पाहिजे.कारण आपण हिंदू आहोत.आणि हिन्दुनी प्रत्येक सण तिथिने साजरा केला पाहिजे.आणि शिवाजी महाराज हे हिंदू पदपादशाह आहेत.
मी:-जर  शिवाजी महाराज हे हिंदू पदपादशाह आहेत.तर मग ब्राम्हनानी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध का केला.आणि स्वता शिवाजी महाराजानी आपणाला हिंदू पदपादशाह असे कधीच म्हणून घेतले नाही.आणि तिथिने जयंती साजरी करण्यासाठी फक्त शिवाजी महाराजच अपवाद का ?  सावरकर,टिळक,आणि इतर नेत्याची जयंती तारखेने साजरी का करतात ?
बाबासाहेब पुरंदरे:-(या प्रश्नावर बाबासाहेब भलतेच अडचनित आले)त्याचे काय आहे.ज्यांचा जन्म स्वातंत्र्य पूर्व झाला आहे.त्यांची जयंती तिथिने केली जाते.आणि स्वातंत्र्या नंतर ज्यांचा जन्म झाला आहे.त्यांची जयंती तारखेने केली जाते.(बाबासाहेब प्रचंड दबावखाली आल्यामुले काहीही उत्तरे देऊ लागले.आणि सारखे आपल्या अंगरक्षका कडे पाहू लागले.)
मी:-मग आपला आणि सावरकर,टिळकांचा जन्म केव्हाचा आहे ?(या प्रश्नावर बाबासाहेब उसळले आणि म्हणाले )
बाबासाहेब पुरंदरे:-जयंती ही मेल्या नंतर साजरी करतात.आणि आपण मला मयताच्या यादीत सामिल करत आहोत.
मी:-तो भाग महत्वाचा नाही.मुद्दा हा आहे की जर तिथिनेचा जयंती साजरी करायची तर शिवाजी महाराजच अपवाद का ? आणि जयंती तिथिने साजरी करायची तर राज्याभिषेक तारखेने का साजरा केला जातो.(इथं शिवप्रेमिनी एक मुद्दा लक्षात घ्यावा.ब्राम्हण २००१  सालाच्या आगोदर तारखेने राज्याभिषेक साजरा करत होते.पंढरपुर मधील बाराभाइ तालमितिल तरुण २००१ पूर्वी अनेक वेळा तारखेच्या राज्याभिषेक सोह्ल्यासाठी हजर राहिलेले आहेत.आणि महत्वाचे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे या वेळी हजर असत.शिवजयंतीची तारीख निश्चित झाल्या नंतर ब्राम्हनानी डावपेच बद्दला आणि राज्याभिषेक तिथिने साजरा करण्यास सुरवात केली.आणि नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.पण तो कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे छत्रपति यांनी शिवराज्याभिषेक प्रतिवर्षी  ६ जून लाच साजरा करुन मोडित काढला.)
बाबासाहेब पुरंदरे:-(थरथरत)कोण म्हणत शिवराज्याभिषेक तारखेने साजरा होतो ?(मी बाबासाहेब पुरंदरेच्या पुढे बाराभाइ तालमितिल तरुण उभे केले,मग बाबासाहेब पुरंदरेची बोलतीच बंद झाली.)
मी:-बाबासाहेब मला सांगा,तिथि नुसार कोणताही कार्यक्रम घ्यावयाचा झाल्यास तारीख बदलत रहते हे खरे आहे का ?
बाबासाहेब पुरंदरे:-(सावधपणे)हो,कारण आपल्या पंचाग नुसार २१/ २२ दिवसाचा फरक पडतो.त्या मुले तारीख एक न येता बदलत राहते.
मी:-मग आपण गेली अनेक वर्ष ६ जून रोजीच रायगडावर काय करत असता ?(बाबासाहेब पूर्ण गोंधलूँन गेले होते,हताश झाले होते.)
बाबासाहेब पुरंदरे:-(या प्रश्नाचे उत्तर न देताचा उठ्न्याचा प्रयत्न करू लागले.)
मी:-बाबासाहेब आपणाला विनंती आहे की चर्चा अजुन संपलेली नाही.तरी आपण बसून राहवे.अन्यथा निर्माण होणार्या परिस्थिला आपण जबाबदार राहाल.(मग मात्र,बाबासाहेब पुरंदरे आपल्या जागेवर बसले)
मी:-आपण जाणीवपूर्वक शिवजयंती तारीख-तिथीचा वाद निर्माण केला आहे.असा आमचा आपल्यावर आरोप आहे.त्या बद्दल आपले काय म्हणणे आहे ?
बाबासाहेब पुरंदरे:-(अत्यंत हताशपणे)हवे तर तसे समजा....!
मी:-या आपल्या कृत्या बद्दल आपण समस्त शिवप्रेमिची माफ़ी मागितली पाहिजे.
बाबासाहेब पुरंदरे:-मी आपली माफ़ी मागतो.
मी:-आपण आता मागितलेली माफ़ी आम्हाला लेखी द्यावी लागेल.
बाबासाहेब पुरंदरे:-(या वर मात्र त्यांचा राग अनावर झाला) हा...हा...तर..! सरळ सरळ बलत्कार आहे.बळजबरी आहे.(वातावरन एकदम तंग झाले)
मी:-(मोठ्याने)तुम्हाला,माफ़ीनामा लिहून द्यावाच लागेल.आणि राहिली बाब बलत्कार,बळजबरी करण्याची तर आम्ही ती अजुन केलेली नाही.आपली इच्छा असेल तर त्याचा ही नमूना दाखवतो.....!
                    आणि.......मग मात्र........वाकल्या गर्विष्ठ माना.....या शिवमंदिरी...!  बाबासाहेब पुरंदरेच्या आयुषातिल ही पहिली हार होती.आणि आम्ही ब्राम्हनाना दिलेली पहिली मात.या नंतर बाबासाहेब पुरंदरे या नावाचे गारुड बहुजन समाजाच्या मनावरुन कमी होत गेले.आणि बाबासाहेब पुरंदरेच्या मागे शिवदशा लागली ती आज पर्यत कायम आहे.या दिवसी माझा वाढदिवस असतो.तो आम्ही बाबासाहेब पुरंदरेचा माफीनामा घेहुन साजरा केला.अजुन असे अनेक वाढदिवस मला साजरे करायला आवडेल.

जय जिजाऊ ! जय शिवराय !!

बाबा पुरंदरेचा स्वताच्या हस्ताक्षर मधील माफीनामा



प्रसंग दुसरा
दिंनाक : २० ओक्टोबर २००३,स्थल : पंढरपुर वेळ:- सकाळी ७:३० 
मी नेहमी प्रमाणे सकाळी उठून पेपर वाचत होतो.तेवढ्यात फोन वाजला.मी फोन घेतला......
मी:-हेलो....कोण बोलतय...!
उत्तर:-जय जिजाऊ....!अध्यक्ष,मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता बोलतय...!
मी:-जय जिजाऊ...!बोला....काय काम आहे ?
उत्तर:-अध्यक्ष,आजचा दैनिक पुण्यनगरी आणि दैनिक वार्ताहर बघा.शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या बद्दल काय लिहले आहे ते...?
मी:-ठीक आहे...मी पाहतो....आणि कळवतो...१
उत्तर:- ठीक आहे...आदेशाची  वाट पाहतो....जय जिजाऊ !
मी:-जय जिजाऊ ! 
मी तसाच उठलो आणि घरासमोरील पेपर स्टॉलवरून दैनिक पुण्यनगरी आणि दैनिक वार्ताहर घेतला.आणि त्यातील "बोलक्या पत्थरा"ची जहिरात वाचून तळपायाची आग मस्तकात गेली.जहिरात होती,"संत तुकाराम घाबरून गेले,पांडूरंगाला 'धाव घाली विठू आता चालू नको मंद ',असे म्हणून गाऊ लागले.अहो तुम्ही का घाबरता ? तुकाराम महाराजांना घाबरायला पाहिजे"अशा शीर्षकाखाली प्रसिध्द केली.मी तातडीने त्या जहिराती वरील फोन नंबर लावला.तो नंबर पंढरपुर मधील "बोलक्या पत्थरा"ची विक्री करणारे एका ब्राह्मण व्यक्तीचा होता.मी  संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष बोलतोय हे शब्द ऐकताच त्याची गाळण उडाली.आणि तो त-त प-प करू लागला.मी त्याला जहिराती बद्दल जाब विचारला.तसा त्याने आपला या जहीरातिशी संबंध नसल्याचे सांगुन मला "बोलक्या पत्थरा"चे मालक असणार्या बडोद्याच्या मधुसुधन पटवर्धनचा नंबर दिला.मी तात्काळ बडोद्याला फोन लावला.   
मी:-हेलो....मधुसुधन पटवर्धनचा नंबर का ?
उत्तर :-(वयस्कर थरथरनारा आवाज आला)मी मधुसुधन पटवर्धन बोलतोय....!
मी:-मी अमरजीत पाटिल,संभाजी ब्रिगेडचा पंढरपुर तालुका  अध्यक्ष बोलतोय....!                                           
मधुसुधन पटवर्धन:-बोला...मी आपल्यासाठी काय करू शकतो....!
मी:-अहो....!पटवर्धन.....आपण आपल्या "बोलक्या पत्थरा"च्या जहीरातित राष्ट्रपुरुष संत तुकाराम महाराज आणि छत्रपति शिवाजी महाराजाचा वापर केला आहे.हा त्यांचा अपमान आहे.कारण दोन्ही व्यक्ति या प्रयत्नवादी होत्या.दैववादी नव्हत्या.आणि आपण वापरलेला अभंग हा संत चोखामेला यांचा आहे.
मधुसुधन पटवर्धन:-आपले म्हणणे बरोबर असेल.पण ती जहिरात आहे.त्यामुले अशा चूका होणारच..!
मी:-पण....!संत तुकाराम महाराज आणि छत्रपति शिवाजी महाराजाचा वापर जहिरातीसाठी करने गैर आहे.आणि महाराष्ट्रा मध्ये सध्या इतिहास शुध्दीकरण चळवळ चालू आहे.आपल्या या जहिरातीमुले महाराष्ट्रा मध्ये तमाम शिवप्रेमी आणि वारकरी संप्रदाय यांच्या भावना दुखावल्या आहेत.त्याचे काय...?
मधुसुधन पटवर्धन:-त्या बाबत मी आता काही करू शकत नाही.
मी:-ठीक आहे..!माझे काम मी केले आहे.उद्या या प्रकरणाचा तुम्हाला त्रास झाला तर....नंतर बोलू  नका...!
आणि मी फोन बंद केला.संभाजी  ब्रिगेडच्या तगडया यंत्रनेचे कामकाज सुरु झाले.आणि दिवसभर मी निश्चित राहिलो.दुसर्या दिवशी म्हणजे दिनांक २१ ओक्टोबर २००३ रोजी दुपारी फोन वाजला.मी फोन उचला.
मी:-हेलो....कोण बोलतय...!
उत्तर:-मी मी मधुसुधन पटवर्धन बोलतोय....! अमरजीत पाटिल साहेब आहेत का ?
मी:- बोला....पटवर्धन...काय म्हणताय...!
मधुसुधन पटवर्धन:-अहो....पाटिल साहेब,मला या संकटातुन वाचवा हो....!
मी:-अहो....कसले संकट ? मी समजलो नाही...!
मधुसुधन पटवर्धन:-अहो...!काल नाही का तुम्ही मला फोन केला होता.आणि मला मी "बोलक्या पत्थरा"च्या जहीरातित राष्ट्रपुरुष संत तुकाराम महाराज आणि छत्रपति शिवाजी महाराजाचा वापर केला आहे.त्या बद्दल महाराष्ट्रा मध्ये शिवप्रेमी आणि वारकरी संप्रदाय यांच्या भावना दुखावल्या आहेत.हे कळवले होते.
मी:-हा...हा...!ते होय....!मग त्याचे काय...?
मधुसुधन पटवर्धन:-अहो...!आपण मला काल किती व्यवस्थित समजाऊंन सांगितले होते.पण तुमचा फोन झाल्या नंतर मला काल दिवसभर आणि रात्री अपरात्री अनेक फोन आले हो...आणि फार अश्लील बोलले हो...!काही तर तुमच्या मुली भ्रष्टऊ असे म्हणाले...!आपण मला यातून वाचवा हो....!मी आपण सांगेल ते प्रयश्चित घेण्यास तयार आहे.
मी:-काका मी अगोदरच सांगितले होते.तुम्ही ऐकले नाही काय करणार ?
मधुसुधन पटवर्धन:-अहो...!आम्ही शेन खाले असे समजा.पण यातून मार्ग काढा.
मी:-हे बरे आहे...!शेन खाताना खायाचे आणि वरून प्रयश्चित घेण्यास सुद्धा तयार...!
मधुसुधन पटवर्धन:-आपण सांगाल ते मी करण्यास तयार आहे.आपण मला मार्गदर्शन करावे.आपण मला गुरु प्रमाणे आहात.
मी:-अहो...पटवर्धन..!मी फक्त २४ वर्षाचा आहे.(त्या वेळेस हे वाचकानी लक्षात घ्यावे)
मधुसुधन पटवर्धन:-अहो...आपण ज्या पध्दतीने मला समजून सांगितले.त्या नुसार आपण मला गुरुच आहात.मी काय करावे ते मला सांगावे.    
मी:-मग असे करा..!दैनिक पुण्यनगरी आणि दैनिक वार्ताहर या दोन्ही पेपर मध्ये माफीनामा छापून जाहिर माफ़ी मागा.
मधुसुधन पटवर्धन:-मी उदयाच माफीनामा छापून जाहिर माफ़ी मागतो.त्या नंतर तर हे सर्व थांबेल ना...!
.......आणि परत एकदा वाकल्या गर्विष्ठ माना.....! दिंनाक २२ दैनिक पुण्यनगरी आणि दैनिक वार्ताहर या मध्ये पहिल्या पानावर जाहिर माफ़ी मधुसुधन पटवर्धन यांनी मागितली व चुकून सुद्दा आपल्या जहिरातित कोणत्याही महापुरुषाच्या नावाचा वापर येथून पुढे करणार नाही.याची खात्री दिली.माझ्या या कार्याची दखल साप्ता.चित्रलेखा ने घेतली.

"बोलक्या पत्थरा"वाला मधुसुधन पटवर्धन याचा माफ़ीनामा

चित्रलेखा  या महाराष्ट्रातिल आघाडीच्या साप्ताहिकाने घेतलेली दखल

1 comment:

  1. वीजापुरचा आदिलशहा -रामदास भेट...
    .
    .
    सहज उठोनी श्रीमोक्षपानी l पादशा असता एकांत सदनी l
    उष :कालि पुढे जाउनी l ठाकता घाबिरे नवल म्हणे l l
    सवेची मानिला संतोष मने l धन्य वलीचे घडले दर्शन l
    .
    (दास विश्रामधाम पान २०४ )
    .

    औरंगजेब बादशहा आणि रामदास भेट
    .

    भक्तास्तव केवळ निरापक्ष l शानशा (औरंगजेब) भेटो उपजली इच्छा l l
    एकांत शयनी असता पातच्छा l तेथेची प्रगटले अवचट l l
    .
    (दास विश्रामधाम सोपान २८)

    ReplyDelete