Friday, February 25, 2011

मराठीचा 'बाप' कोण ? 'मराठी भाषा' दिवस कुणाच्या नावावर ?

मराठी भाषा दिवस २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्याचे आवाहन तथाकथित मराठी भाषा प्रेमी सेना-मनसेवाल्यानी केले  आहे.या दिवसाच्या निमित्ताने बहुजन समाजाच्या दृष्ठिने काही प्रश्नाची उत्तरे शोधने आवश्यक आहे.त्यासाठीच हा लेखन प्रपंच !
सुरवातीला आपण मराठी आणि मराठा या दोन समान वाटणार्या पण परस्पर भन्न असणार्या शब्दाच्या व्याख्या समजुन घेतल्या पाहिजेत.या दोन शब्दाची व्याख्या पुढील प्रमाने सांगता येतील.तेथे आपण मराठी संस्कृति आणि मराठा संस्कृति याची नोंद घेतली पाहिजे.
मराठा संस्कृति:-छत्रपति शिवरायांनी उभारलेले स्वराज्य हे मराठा राज्य म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रात नोंद आहे.छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति झाल्यावर सभासद नावाचा बखरकार म्हणतो,"या युगी सर्व पृथ्वीवर मेच्छ बादशाह,मराठा पादशाह ऐवढा छत्रपति झाला.ही गोष्ट काही सामान्य झाली नाही."छत्रपति शिवरायांचे स्वराज्य मराठा राज्य असले तरी त्यातील 'मराठा' या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आहे.यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचा समावेश होतो.मराठा संस्कृति ही व्यापक संस्कृति आहे.यामध्ये आठरापगड़ जातीचा आणि बाराबलुतेदाराचा समावेश होतो.मराठा ही अन्ययाच्या विरोधात लढणारी वृति  आहे.या संस्कृतीचे मुळ हे हडप्पा-मोहोंजोधडो या मध्ये सापडते.म्हणून आपल्या देशाच्या राष्ट्रगीता मध्ये मराठा असा उल्लेख रविंद्रनाथ टागोर यांनी केला आहे.थोडक्यात  मराठा संस्कृति म्हणजे महात्मा बलिराजा पासून ते गोतम बुध्दान आणि जगदगुरु तुकोबरायण पासून ते छत्रपति शिवरायां पर्यत व पुढे फुले-शाहू-आंबेडकरांची संस्कृति आहे.बहुजन संस्कृति आहे.                                                                                                    
नेमके याच्या उलट मराठी संस्कृति आहे.तिचाही थोडक्यात आढावा घेऊ या.
मराठी संस्कृति:-मराठी संस्कृतिचे मुळ हे वैदिक ब्राम्हणी संस्कृतित आहे.ज्याप्रमाने ब्राम्हनानी आपल्या फायद्यासाठि हिंदुत्वाचे कवच घेतले आहे.तसेच महाराष्ट्रातील ब्राम्हनानी मराठीपणाचे कवच घेतले आहे.ब्राम्हनाच्या मते जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी अशी संकल्पना नसून जो जन्माने ब्राम्हण आहे.तोच केवळ मराठी माणूस म्हणून ओळखण्यात येतो.म्हणून तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांना "हे राज्य मराठा असणार की मराठी" असा खोचक माडखोलकरी प्रश्न विचारण्यात आला होता.म्हणजेच छत्रपति शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला या देशातील ब्राम्हनानी मराठी राज्य मानले नाही.आणि ते प्रत्येकशात मराठा स्वराज्य होते.हे आपण वर पहिलेच आहे.ब्राम्हनाच्या मते मराठी राज्य म्हणजे पेशवाई हे होय.मराठी संस्कृति ही अत्यंत संकुचित संस्कृति आहे.ज्यामध्ये ब्राम्हनांचा समावेश होतो.थोडक्यात मराठी संस्कृति म्हणजे सदाशिव पेठी संस्कृति.म्हणजे बामन एके बामन.                                
आता आपण मराठी भाषा दिवस या विषयकडे पाहू या.या दिवसाचा इतिहास पाहता तो फार अलीकडचा असल्याचे आपल्या लक्षात येते.११९५ साली महाराष्ट्रामध्ये सेना-बीजेपीचे युति सरकार असताना गणपतीला दूध पाजन्याचा चमत्कार करणारे चमत्कारी बाबा मनोहर पंत जोशी हे मुख्यमंत्री म्हणून गादीवर होते.यानीच २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून जाहिर केला.२७ फेब्रुवारी म्हणजे वि.वा.शिरवाडकर उर्फ़ कुसमाग्रज याचा जन्म दिवस आहे.या कुस्माग्रजांचे अल्प चरित्र पाहने या विषयासाठी आवश्यक आहे.दि.२७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे शहरात रंगनाथ शिरवाडकरांच्या घरात मुलगा जन्मला.नाव ठेवले गजानन.काकाकड़े दत्तक दिले.म्हणून नाव झाले:-विष्णु वामन शिरवाडकर !पुणे तेथे शिक्षण झाले.पत्रकारिता करित असताना कविता लिहायला सुरवात केली.त्यासाठी टोपन नाव घेतले कुसमाग्रज.अशा कुसमाग्रजाचे मराठी साहित्यात योगदान काय ?तर ऐकून १४ पुस्तके.त्यातील ही बरीच भाषांतरित.यांनी छत्रपति शिवरायांचा व मावल्याचा अपमान करणारी 'सात' नावाची कविताही लिहिली आहे.ती दाहवीच्या 'मराठी कुमारभारती' या पुस्तकात पान क्रमाक १२८ वर आहे.अशा पध्तिने  छत्रपतींचा अपमान करणार्याच्या नावाने 'मराठी भाषा दिन' दिन साजरा केला जातो.आणि ते ही परस्पर वेगले असल्याचे दाखवणार्या सेना
मनसे या ब्राम्हणवाद जोपासनार्या पक्षा कडून हे बहुजन समाजाने लक्षात घ्यावे.
कारण या  कुसमाग्रज पेक्षा काकनभर जास्तच नव्हे तर असे लाखो कुसमाग्रज ज्यांच्या पसंगालाही पुरणार नाहीत.अशी माणसे बहुजन समाजात आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.साहित्यसम्राट आन्नाभाऊ साठेचे नाव सुध्दा पुरेसे आहे.तरी पण ब्राम्हनाना पाहिजे जातीचा 'मराठी माणूस'.तसेच लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदा मराठीत भाषण करणारे क्रांतिसिंह नाना पाटिल सुध्दा यांना चालत नाहीत.आणि ज्या छत्रपति शिवरायांनी मराठी भाषेचा 'राज्यव्यवहार कोष' तयार केला.ते सुध्दा चालत नाहीत.अशा बामनी षड्यंत्रला बळी पडण्यासाठि जणू आम्हा बहुजनात स्पर्धाच सुरु असल्या सारखे आमच्यातील बैयताड तरुण मरत असतात.खंर तर त्याची चुक नाहीच.कारण "जेथे पोरग रडतच नाही.....तेथे आईने पजन्याचा प्रश्नच उदभवत नाही."
 (हा विषय समजुन घेऊ इच्छीनार्या लोकानी "मराठी की ब्राम्हणी" हे पुरुषोत्तम खेडेकर लिखित पुस्तक जरुर वाचावे.)

3 comments: