Wednesday, November 20, 2013

'फितूर' आणि 'बाईल वेड्या' 
अटल बिहारी वाजपेयी यांना "भारतरत्न" देण्यात येऊ नये !


आपल्या देशाचे माझी 'पंत'प्रधान श्री.अटल बिहारी वाजपेयी यांना "भारतरत्न" पुरस्कार देण्याची संघीष्ट शेंबड्या लोकांची मागणी जोर धरत आहे.त्यामध्ये स्वत:च स्वत:ला भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ समजणाऱ्या प्रचार-प्रसार माध्यमांचा सहभाग विषय उतू जाण्यायेवढा आहे.मुळामध्ये आज पर्यंत  "भारतरत्न" पुरस्कार देण्यात आलेल्या लोकांच्या नावांची यादी पहिली तर कोणताही सभ्य व्यक्तीला कपळावर हात मारून घेण्याची वेळ आल्या शिवाय राहणार नाही.अशा एकासेक महाभागांची नावे यात आहेत.(काही  अपवाद आहेत.) यामधील एकेका महाभागाचे चरित्र आणि चारित्र्य पाहिले तर एक वेळ लाज सुद्धा लाजेल.आता,तर सदर पुरस्कार देण्या-घेण्यावरुन जो गदारोळ सुरु आहे.तो पाहता "भारतरत्न" पुरस्काराला भारत भुवन नावाच्या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या कटिंग चहा एवढी सुद्धा किंमत राहिलेली नाही.किंबहुना "भारतरत्न" ज्या पद्धतीने दिला-मागितला जात आहे.ते देण्या-मागण्याची भाषा करणाऱ्या लोकांमुळे असे म्हणण्यास पुरेपूर वाव आहे.यात भरीसभर म्हणून आता अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची भरती करण्यासाठी सचिन तेंडूलकर यांच्या नावासाठी ज्या प्रमाणे या देशातील ब्राम्हण ब्युरोक्रोसी कामाला लागलेली आहे.मुळामध्ये भारता सारख्या लोकशाही प्रधान देशात दिला जाणारा "सर्वोच्च नागरी सन्मान" असणारा "भारतरत्न" सुद्धा लोकशाही पद्धतीने लोकांचे मतदान घेऊन देण्यात आला पाहिजे.आणि तो हि पाच वर्षातून एकदाच.आणि एकाच व्यक्तीला.असो.
तर आता………………  अटल बिहारी वाजपेयी यांना "भारतरत्न" का देण्यात येऊ नये ?
या प्रश्नाचे थेट उत्तर द्यावयाचे झाल्यास आता,"फितुरांना" आणि "बाईल वेड्या" लोकांसुध्दा "भारतरत्न" द्यायचा का ? असा प्रती प्रश्न उपस्थित करावा लागेल.अटल बिहारी वाजपेयी हे "फितूर" आहेत हे माझे वाक्य नसून अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे नेते आणि जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री.लीलाधर वाजपेयी यांचे आहे.
याबाबत सविस्तर विषय असा आहे :-

'फितूर' वाजपेयींचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय ?

 देशातील स्वातंत्र्य सैनिकांचा सवाल


शनिवार,नवी दिल्ली :(प्रेस ट्रस्ट) ब्रिटिशाविरोधात आम्ही लढत असताना ब्रिटिशाना 'फितूर' झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय ? असा प्रश्न देशातील जेष्ट स्वातंत्र्य सैनिकांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना विचारला आहे.अटलबिहारी वाजपेयी यांनी १९४२ च्या लढ्याच्या वेळी न्यायाधीशांसमोर केलेल्या दगाबाज फितुरीमुळे काही स्वातंत्र्य सैनिकांना तुरुंगवास भोगावा लागल्याचा आरोप अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक संघटनेने केला होता.वाजपेयी यांनी अलीकडेच हा आरोप फेटाळून लावला.परंतु आज पुन्हा आखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक संघटनेने दिल्लीत पत्रपरिषद घेऊन वाजपेयींवर केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला.संघटनेचे एक नेते व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लीलाधर वाजपेयी पत्रपरिषदेत म्हणाले कि,"१९४२ च्या लढ्याच्या वेळी महात्मा गांधींनी 'चले जाव'चा नारा दिला.गांधीजींच्या हाकेला प्रतिसाद म्हणून मी आणि काही तरुणांनी आग्रा जिल्ह्यातील दोन सरकारी इमारतींवर काँग्रेसचा ध्वज फडकवला.अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रेमबिहारी वाजपेयी हे सुद्धा ध्वज फडकवताना आमच्या सोबत होते. आमचा हा अहिंसक लढा,परंतु ब्रिटीश पोलिसांनी एक भिंत फोडली व एका इमारतीला आग लावून त्याचा आळ आमच्यावर आणला. आमच्याविरुद्ध खोटे खटले दाखल केले."
अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांचे बंधूंनी ब्रिटीश न्यायाधीशांसमोर माफीनामा लिहून दिला. ते इंग्रजांना फितूर झाल्यानेच मला पाच वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला,असा आरोपही लीलाधर वाजपेयी यांनी या पत्रपरिषदेत केला. व्हाईसराय यांच्या विधिमंडळात सदस्य असलेल्या गिरीजा शंकर वाजपेयी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाजपेयी आणि त्यांचे बंधू या प्रकरणातून बचावले,असे हि लीलाधर वाजपेयी यांनी सांगितले.
(संदर्भ :- दै. लोकमत.नागपूर-रविवार दिनांक १९ सप्टेंबर १९९९,पान नं १२)
हा झाला अटल बिहारी वाजपेयी यांच्या 'फितुरी'चा पुरावा. आता,प्रश्न राहतो तो 'बाईल वेडे' पणाचा ! तर हे मत सुद्धा माझे नाही. तर हे मत आहे भारताचे आणखी एक माजी 'पंत'प्रधान आणि अटल बिहारी वाजपेयींचे एकेकाळचे जानेजीगर मोरारजी देसाई यांचे !
या बाबत हि पुढील उतारा पहा :-

अटलजी अविवाहित की ब्रम्हचारी ?

भारतीय राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे.सर्वच पक्ष आपणच खरे राष्ट्रप्रेमी असल्याचा आव आणत असतात आणि दुसरीकडे विरोधक कसे गद्दार,राष्ट्रद्रोही आहेत हेही जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो.अशा वेळी खरा देशप्रेमी कोण हे जनतेने कसं ठरवायचं.की सगळेच राष्ट्रद्रोही आहेत असं समजून भारतमातेच्या नशिबावर आसवं गाळायची ? प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्ववादी संघटना अशी प्रतिमा बनवू इच्छिणाऱ्या भाजपचे मात्र नशिबाच फुटकं म्हणा की,ऐन वेळी एखादा बाँबगोळा पडतो आणि राष्ट्रीयत्वाची आकार घेत असलेली प्रतिमा उध्वस्त होऊन जाते. आडवाणीजींनी रथयात्रा काढली.काही ठिकाणी दंगली झाल्या. दंगलीचे खापर भाजपच्या माथ्यावर फुटलं आणि निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही. आता हेच बघा ना. अटलबिहारी वाजपेयी,डॉ. मुरलीमनोहर जोशी इ. जे भाजपचे चमकते सितारे आहेत; त्यांच्या नावांभावती काही न काही वादळ उठतच असत. त्यातही ब्रम्हचारी महाराज अटलबिहारी वाजपेयी म्हणजे भाजपचा पिलर………. आधारस्तंभ. अटलजी म्हणजे स्वछ प्रतिमा,अटलजी म्हणजे चारित्र्य, अटलजी म्हणजे राष्ट्रप्रेमी, अटलजी म्हणजे शुद्धत्व, अशी हाकाटी चालू असतानाच एका खटल्यात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांनी अटलजीना पुन्हा संशयाच्या विळख्यात उभं केलं आहे.
अटलबिहारी ब्रम्हचारी आहेत. हे जगजाहीर तथ्य आहे. पण माझी पंतप्रधान आणि एकेकाळचे अटलजींचे जानेजीगर मोरारजी देसाईनी "अटलजी गेल्या २० वर्षापासून एका महिलेबरोबर राहत आहेत",असे म्हटल्यामुळे आपल्यासारख्या सामान्य जनांची बुद्धी चक्रावून जाते नाही ?,मुंबईच्या 'न्यूज ट्रक वीकली' ने मोराजींची मुलाखत घेतली होती. आणि हि मुलाखत एका खटल्या दरम्यान पुरावा म्हणून सादर केली गेली. त्यात मोरारजी जे काही म्हणाले त्यामुळे अटलजींच्या स्वच्छ प्रतिमेला चांगला उभा चिर पडला. मोरारजींनी सांगितलं होत की,"पंतप्रधान असताना मी विदेशवाऱ्या केल्या तेव्हा अटलजीवर ते 'बाईल वेडे' असल्याचे आरोप केले होते. मी चूप होतो. मला मला ते माहित असत ना तर विदेश दौर्यात माझ्यासोबत नेहमी राहणाऱ्या अटलजीना मी हटकलं असत. त्यांनी अतिशय हुशारीन त्याचं काम सुरु ठेवलं होत !"
पत्रकाराने विचारलं …. "मग आपल्याला कसं कळल ?"
मोरारजी म्हणाले,"मला तसं सांगण्यात आलं. कुणी मला सुचवलं असतं तर मी त्याची गंभीर दखल घेतली असती. एवढंच नव्हे मी त्यांना काढूनही टाकलं असत. पण मला माहितच नव्हत आणि पुराव्याशिवाय आपण कुणाबद्दल काहीच म्हणू शकत नाही. "मग आताही तुमच्याकडे पुरावे नाहीत,तरीही तुम्ही एवढ ठामपणे कसं म्हणू शकता …. "पत्रकार.
"पुरावे आहेत ! मोरारजी म्हणाले",अटलजी गेल्या २० वर्षापासून एका बाईसोबत राहतात. आणि ते स्वत:हि अनेक मुलाखतीत म्हणतात की 'मी अविवाहित आहे पण ब्रम्हचारी नाही ! याचा अर्थ काय ?
त्यावर अटलजीनी लग्न का केलं नाही ? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यावर मोरारजींनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होत. ते म्हणाले होते………"लग्न केलं कि तुम्हाला एकाच बाईसोबत आयुष्यभारासाठी बांधून रहावं लागतं. पण अविवाहित असलं तर तुम्ही दुसरीकडे हि जाऊ शकता. यामुळे दोन फायदे होतात. एक म्हणजे तुम्हास एकाच स्त्रीच्या बंधनात रहावं लागत नाही. आणि दुसर म्हणजे  तिला तुमच्याकडे तक्रारही करता येत नाही. मोरारजींनी अटलजींच्या प्रतिमेचं अशाप्रकारे पार खोबर करून टाकलं आहे आणि जनमानसात त्यांच्याविषयी संशयाचं वावटळ उठलं आहे. अटलजी आपल्या पक्षाशीच प्रामाणिक नाहीत.मग ते कुठल्या बाईशी कसे प्रामाणिक राहू शकतात. असे त्यांचे विरोधक म्हणतात. रामजन्मभूमीबाबतच्या भाजपच्या धोरणाला अटलजींचा विरोध आहे. हिंदी आणि हिंदू राजकारणाचे खंदे प्रणेते अटलजी कधी समाजवादाची प्रशंसा करतात तर कधी समाजवादाची आपली पसंती व्यक्त करतात. अटलबिहारी नावामधला 'अटल' वेगळा आणि 'बिहारी' वेगळा असं हे दुभंगलेलं व्यक्तिमत्व. सदैव वादाच्या भोवर्यात राहात असल्यामुळे ते ब्रम्हचारी कि फक्त अविवाहित हे आपण कसं ठरवायचं ? तसं काही 'प्रुफ' किंवा 'आयविटनेस' सापडल्याखेरीज 'जे जे होईल ते ते पाहावे" हेच आपल्या हाती आहे !
(संदर्भ :- दै. जनवाद,नागपूर दिनांक १२ ऑक्टोंबर १९९१,पान ३)
वरील दोन्ही उतारे अटल बिहारी वाजपेयी यांची लायकी सांगण्यास पुरेसे आहेत.यावरून अशा व्यक्तीस "भारतरत्न" देण्याची मागणी करणे म्हणजे पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वैशेला मणिहार घालण्यासारखा प्रकार आहे. 

हा घ्या आणखी एक अस्सल पुरावा : अटल बिहारी वाजपेयी चा माफीनामा !

Thursday, March 14, 2013

"शिवधर्म गाथा" समजून घेताना.....! (भाग १ ला)

दि.१२ जानेवारी २००५ रोजी आपण सर्वांनी आपल्या  'मूळ'  सांस्कृतिक -धार्मिक वारसा असणार्या 'शिवधर्माचे' जाहीर प्रकटन  जगा समोर केलेले आहे.या निमित्ताने आपण आपल्या मुळच्या 'शिव' संस्कृतीचे पुन:जीवन करण्याचाही प्रत्येकाने मनोमन 'संकल्प' केलेला होता.तो आज हि कायम आहे.त्या मुळच्या संस्कृतीचे पुन:जीवन म्हणजे आपला मुळचा चेहरा शोधणे होय. आज आपण या 'सामुहिक' संकल्पाच्या दिशेने क्रमाक्रमाने पाऊले टाकण्यास सुरवात केलेली आहे.त्यातीलच एक पाऊल म्हणून आपल्याला आपल्या 'मार्गदर्शकांनी' १२ जानेवारी २०१२ रोजी शिवधर्मा संदर्भात काहीना काही तरी भाग लिखित स्वरुपात आपल्या समोर ठेवण्याचे अभिवचन  दिलेले होते.त्या वचनाला  जागून गेल्या वर्षभरातील वैचारिक भूमिकेचा सार 'शिवधर्म गाथा' या ग्रंथाच्या माध्यमातून १२ जानेवारी २०१३ रोजी आपण सर्वांन समोर ठेवण्यात आलेला आहे.मुळ विषयाकडे वळण्याआधी मी वाचकांना,शिवधार्मियांना पुन्हा पुन्हा नम्र विनंती करू इच्छितो,कि आपण सर्व प्रथम 'शिवधर्म गाथा' विकत घ्यावी आणि ती सुरवाती पासून शेवट पर्यंत अत्यंत काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा वाचावी.त्यातील बारीक-सारीक तपशिलांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा.वाचन,मनन आणि चिंतन या पातळ्या  पार पाडाव्यात.आणि मगच माझा हा लेख अथवा हि लेखमाला वाचावी.हि नम्र विनंती आहे.

'शिवधर्म गाथेचे' प्रास्थाविक......

शिवधर्म संसद आपल्या प्रास्थाविका मध्ये अनेक बाबींचा उल्लेख करते.जसे कि 'शिवधर्मा'च्या समग्र मांडणीला येथून पुढे कायम "शिवधर्म गाथा" संबोधले जाईल.यामध्ये अत्यंत महत्वाचा उल्लेख म्हणजे 'आज जी मांडणी आपल्या पुढे ठेवली आहे.ती एक प्रकारे शिवधर्म गाथेचा कच्चा  आराखडा आहे.' म्हणजे या मध्ये आपणा सर्वांना शिवधर्म संसद आपल्या विवेकबुद्धीचा वापर येत्या वर्षभरामध्ये व तेथून पुढे हि करण्याचे एक प्रकारचे आवाहनच करीत आहे.व त्यास अनुसरून आपण आपल्या सुचना पाठवण्याचे हि आवाहन करीत आहे.आणि हाच मुद्दा 'शिवधर्म' आणि जगातील इतर सर्वच 'धर्म'  यातील  फरक अत्यंत ठळकपणे अधोरेखित करणारा आहे.आणि तो म्हणजे,जगातील आजपर्यंतच्या (माझ्या अभ्यासा नुसार) कोणत्याही 'धर्मा'ने धर्म संबंधी बाबी ठरवण्याचा अधिकार आपल्या अनुयायांना दिलेला नव्हता.व नाही.पण 'शिवधर्म' मात्र  हा जगातील असा एकमेव 'धर्म' आहे.जो आपल्या अनुयायांना आपला 'विवेक' सतत वापरण्याची मुभा तर देतोच आहे.पण 'धर्म' तत्वज्ञान ठरवण्याचा 'अधिकार' हि  देत आहे.आणि हीच गोष्ट 'शिवधर्म' या संकल्पनेला सर्व धर्माहून वेगळे दर्शवण्या बरोबर आपले वैशिष्ठ्य अधोरेखित करणारी आहे.जगदगुरु तुकोबारायांच्याच भाषेत सांगावयाचे झाल्यास.....
                                     जो जागता आपुलिया हिता !
                                     धन्य माता-पिता तयाचिये !!
असेच या संदर्भात म्हणता येईल.त्याच बरोबर फक्त 'धर्म' तत्वज्ञान काय असावे ? एवढेच सुचवण्याचा 'शिवधर्म संसद' आपणाला अधिकार देत नाही तर त्यात काळानुरूप 'बद्दल' करण्याचा लोकशाहीतील अतिउच्च असा असणारा 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा' अधिकार हि प्रदान करते आहे.यातून एक बाब अत्यंत ठळकपणे स्पष्ट होते कि,'माणूस हा धर्मासाठी आहे' हि परंपरागत विचारसरणी टाकून 'शिवधर्म संसद' 'धर्म हा माणसांसाठी आहे.' हे सांगते.शेवटी कुणीतरी म्हटले आहेच ना,"जो 'धारण'  करतो तो 'धर्म' !" येथे आज पर्यंत आपण ज्या कोणत्याही धर्मात आहात,होता.त्या धर्माने आपल्याला कधी 'धारण' केले होते का ? केले आहे का ? याचा हि विचार प्रत्येकाने करावा.तसेच,आपल्याला आपल्या 'धर्म' बाबी ठरवण्याचा 'अधिकार' दिलेला होता का ? दिलेला आहे का ? व अत्यंत महत्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या 'धर्माने' त्याच्या तत्वज्ञानात 'बद्दल' करण्याचा कधी 'अधिकार' दिलेला होता का ? किंवा दिलेला आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रत्येकांने आप-आपल्या मेंदूला विचारल्या शिवाय 'शिवधर्माचे' वेगळेपण आणि वैशिष्ट्य  लक्षात येणार नाही.
                                                                                          (क्रमश:)                                                                                                        

Friday, January 4, 2013

"जिजाऊ" चे स्मरण करताना !


१२ जानेवारी २०१३ "जिजाऊ जन्मोउत्सव" देशात-विदेशात आणि खास करून सिंदखेडराजा या जिजाऊ च्या जन्मगावी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.या दिना निमित्त जगभरातील मातृशक्तीचा सन्मान करणारे जिजाऊच्या समोर नतमस्तक होत आहेत. ज्या अर्थी हे वर्ष २०१३ आहे त्या अर्थी आपण  फार फार वर्ष पूर्वीचे अश्मयुगातील जीवन मागे टाकले आहे याचाच हा एक पुरावा आहे. पण शरीरात असणारा एखादा जुनाट दुर्धर आजारने ऐन मोक्याला डोके वर काढावे आणि आयुष्याच संपून जावे.अशीच काहीशी अवस्था आपल्या देशाची,समाजजीवनाची झालेली आहे.
एकीकडे आपण मातृशक्तीला सर्वोच्च स्थानी विराजमान करून या देशातील मातृसत्ताक समाज व्यवस्था परत पुन:स्थापित करण्यासाठी कटिबद्ध होत आहोत.झालो आहोत.आणि दुसरीकडे आपल्याच देशात दिल्ली मध्ये सामुहिक बलात्काची अत्यंत संताप जनक घटना घडून त्यात एका अनामिक मुलीचा जीव गेला आहे.दिल्ली मधील घटना हि काही या पहिली  देशातील घटना नाही.किंबहुना आपल्या देशातील बलात्काराची सरासरी काढल्यास प्रत्येक एका तासाला एक बलात्काराची घटना  घडत आहे.तर प्रत्येक अर्ध्या तासाला विनयभंग घडत आहेत.यातील बहुतांश घटना या समाजातील दिन-दलित,कष्टकरी,निराधार,लहान मुली यांच्या बाबत मोठ्या शहरापासून ते खेडेगावातील बांधाबांध वर घडत आहेत.आणि त्या भर म्हणजे कौटुंबिक अत्याचाराच्या घटनाची तर नोंदच सांगता येणे अशक्य आहे. आणि या सर्व घटनांमध्ये एकच व्यक्ती केंद्रभूत आहे ती  म्हणजे "स्त्री" ! जिला तिच्या जन्मा पासूनच 'तू' इतरांसारखी नाहीस.हेच सातत्याने बिंबवले गेले आहे.जात आहे.आपल्या देशातील मुळची संस्कृती असलेल्या शिव संस्कृतीचा संदर्भ सोडला तर आपल्या देशात आक्रमन करून प्रस्थापित झालेल्या वैदिक ब्राम्हण धर्माने सर्व प्रथम स्त्रीचा अपमान केला व मातृसत्ताक समाजजीवनाला पर्याय म्हणून पितृसत्ताक समाज व्यवस्था रूढ केली.पितृसत्ताक समाज व्यवस्था हि एक प्रकारची प्रतिक्रांतीच होती.हे आपण समजून घेतले पाहिजे.वैदिक ब्राम्हण धर्मातील वर्ण व्यवस्थे मध्ये प्रामुख्याने चार वर्ण होते हे आपणाला  माहित आहेच.पण....! स्त्री चे वर्णन कोणत्या वर्णात समाविष्ट आहे याचा शोध घेतला असता स्त्रीच्या अवस्थेची कल्पना येते.स्त्री हि ब्राम्हण आहे का ? नाही.स्त्री हि क्षत्रिय आहे का ? नाही.स्त्री हि वैश्य आहे का ? नाही.मग स्त्री हि शुद्र आहे का ? तर  त्याचे हि उत्तर आहे नाही.अजिबात नाही ! मग स्त्री आहे कुठे ? आणि  तिचा सामाजिक दर्जा काय ? तर वैदिक ब्राम्हणी धर्मानुसार स्त्री हि 'अवर्ण' आहे'.म्हणजे तिला ना आकार आहे ना उकार आहे.ती आहे फक्त उपभोगजन्य 'वस्तु' ! होय,वस्तूच ! आणि याचे समर्थन सनातनी कवी तुलसीदासने सुद्धा केले आहे.तुलसीदास म्हणतो,"ढोल गवार पशु और नारी ! सब है ताडन के अधिकारी !!" हे एकच उदाहरण नाही तर अशी लाखो नव्हे तर अनगिनत उदाहरणे वैदिक ब्राम्हणी धर्मग्रंथांच्या पानापानांवर आहेत.आणि त्याच वैदिक ब्राम्हणी धर्माचे आपण कळत-नकळत शिकार झालेलो आहोत.आपले भारतीय समाजजीवन तर या रोगाने पूर्ण ग्रस्थ झालेले आहे.त्यामध्ये सर्वात मोठा वाटा या देशातील मिडीयाचा आहे.जो आज दिल्लीतील बलात्काराच्या घटनांचे भांडवल करून खिसे भरून घेत आहेत.हा तोच मिडिया आहे.जो स्त्री हि नरकाचे दार आहे म्हणणाऱ्या असाहराम बापू व इतर अनेक बाबा-श्री श्री श्री-बुवा यांचे रात्रंदिवस उदात्तीकरण करण्यात गुंग असतात.आणि आता हेच दिल्लीतील निघणारे निषेध मोर्चे कव्हर करून थेट प्रसारण करीत आहेत.दिल्ली मध्ये घडलेली घटना निषेधाच्या पण पलीकडील आहे.पण या अगोदर फुलनदेवी या स्त्रीवर संपूर्ण उच्चवर्णनीय जमीनदारांनी गावासह सलग तीन दिवस बलात्कार केला.त्या वेळेस मिडिया नव्हता काय ? का तो बलात्कार नव्हता ? जेवढी प्रसिद्धी फुलनदेविच्या बंदूक हातात घेवून तिने घेतलेल्या प्रतिशोधा बद्दल दिली गेली.तेवढी तिच्यावर झालेल्या अत्याचाराला दिली गेली असती तर आज रस्त्या-रस्त्यावर मेणबत्या जाळण्याची वेळ भारतीयांवर आली नसती.आज मात्र अश्लीलतेच्या चौकटी कधीच मोडून मोकळे वावरणाऱ्या चित्रपट सुष्टीने सुद्धा निषेध नोदवावा या सारखा मोठा विनोद दुसरा कुठलाच नाही.
आपल्या देशात असणारी पुरुष प्रधान संस्कृतीच वाढत्या स्त्री अत्याचारास कारणीभूत आहे.कारण आपल्या देशातील सर्वच धर्मानी स्त्री हि 'अवर्ण' किंवा केवळ 'उपभोग' जन्य वस्तू म्हणूनच पहिले आहे.आज समाज,देश किती हि बदला असला तरी या देशातील हि विकृत मानसिकता आज हि कायम आहे.मुळामध्ये येथील धर्मानी मानवी जीवनाचा संपूर्ण ताबा घेतलेला आहे.त्यामुळे हि मानसिकता सहज सहजी बदलणे अवघड आहे.फक्त कायदा करून हा प्रश्न सुटणारा नाही.त्यासाठी आपल्या देशाची मूळ संस्कृती असणार्या 'मातृप्रधान संस्कृतीचा' जाणीवपूर्वक अंगीकार करावा लागेल.आणि त्यासाठी या देशातील सर्वच जाती-जमाती मधील स्त्री हि त्या त्या धर्मिक गुलामगिरीतून मुक्त झाली पाहिजे.त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे धर्मविरहित शिक्षण प्रणालीचा जाणीवपूर्वक अंमल करण्यात आला पाहिजे.अशा धर्मविरहीत शिक्षण प्रणालीतून तयार झालेली स्त्रीच या पुरुष प्रधान संस्कृतीचा 'काळ' ठरेल.व हि विकृती समाप्त करेल.पण,हे काम फक्त स्त्रीयाचेच नाही तर स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाचे आहे.
आज खर्या अर्थाने स्त्रीला सन्मानाचे आणि बरोबरीचे जीवनमान मिळवून द्यावयाचे असेल तर रस्त्यावर मेणबत्ती मोर्चा काढण्यापेक्षा आप-आपल्या घरातील  हि स्त्री हि उपभोग जन्य वस्तू समजणाऱ्या वैदिक ब्राम्हणी धर्म ग्रंथांची प्रत्येक चौका-चौकात जाहीररित्या होळी केली पाहिजे.आणि ती हि पुरुषांनी ! तरच जिजाऊचे स्मरण वंदनीय ठरणार आहे.
जय जिजाऊ ! जय शिवराय !!

Thursday, October 4, 2012

'राजसंन्यास'चा संशयकल्लोळ !

राम गणेश गडकरी लिखित 'राजसंन्यास' या सन १९२२ साली लिहिल्या गेलेल्या नाट्यकृती बाबत माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत.गडकरीच्या अपूर्ण ? राहिलेल्या 'वेड्याचा बाजार' आणि 'राजसंन्यास' या दोन नाट्यकृती असल्याचे सांगण्यात येते.पण अधिक माहित घेता यातील 'वेड्याचा बाजार'हि नाट्यकृती पुढील काळात राम गणेश गडकरी यांचे  निकटचे मित्र चिंतामण कोल्हटकर यांनी पूर्ण केले आणि १९२३ मध्ये प्रकाशित केले.
आता प्रश्न राहतो तो 'राजसंन्यास' या छत्रपती परिवाराची अत्यंत संतापजनक बदनामी करणाऱ्या नाट्यकृतीचा ! सन १९२२ सालाची  गडकरी यांची  हि नाट्यकृती त्यांचा  २३ जानेवारी १९१९ साली मृत्यु झाल्या मुळे अपूर्ण राहिल्याचे सांगितले जात आहे.आज घडीला  'राजसंन्यास' या नाट्यकृतीचे  अंक पहिला (प्रवेश१,२,३)अंक तिसरा (प्रवेश १  ) व अंक पाचवा (प्रवेश १,२,३,४,५)हे उपलब्ध आहेत.यातील अंक दुसरा व चौथा उपलब्ध नाहीत.(गडकर्यांच्या मृत्यू मुळे अपूर्ण राहिल्याचे बोलले जात आहे.) पण.........! नेमके हीच बाब संशय निर्माण करणारी आहे.कारण एकतर कोणताही नाटककार जे काही लिहाह्याचे असेल ते सलग लिहील एका आड एक अंक लिहिणार नाही.
पण गडकरी बुवा मात्र कमालच म्हणावे लागतील.कारण त्यांनी एका आड एक अंक लिखाण केले आहे.या सर्व प्रकारला संशय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील दोन उदाहने पाहणे महत्वाचे ठरेल.यातील पहिले उदाहरण म्हणजे 'ज्ञानेश्वरी' ची मूळ  प्रत वी.का.राजवाडे यांनी नष्ट केली आणि त्या ठिकाणी बनवत प्रत  महाराष्ट्राच्या माथी मारली  असे त्यांच्याच जात बांधवांनी नोंदवून ठेवले आहे.दुसरे उदाहरण म्हणजे इतिहास संशोधन ? करीत असताना दत्तो वामन पोतदार यांना पेशव्यांचा कारभारी नाना फडणवीस याने भोगलेल्या 'राखेल्याची' यादी सापडली.पठ्याने चक्क ती यादीच गिळून टाकली.म्हणजे नाना फडणवीस याने रखेल्या नुसत्या भोगल्या पण दत्तो वामन पोतदार याने तर त्या पचवल्या ! याला म्हणतात 'जाती साठी माती (सॉरी) रखेल्या खाणे !'
या प्रकारे महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास ब्राम्हणी हागणदारीने बरबटलेला आहे.यात आता 'राजसंन्यास' या नाटकाची भर पडत आहे.या नाटक बाबत मी स्वत: महाराष्ट्रातील मान्यवर इतिहासकार यांच्या कडून अधिकची माहिती घेतली असता.असे समजले कि 'महाराष्ट्र शासनाने' 'राम गणेश गडकरी समग्र वाड्मय' प्रकाशित केलेले आहे.त्याचे संपादन प्र.के.अत्रे यांनी केलेले आहे.सदर समग्र वाड्मय मध्ये अत्रे यांनी सदर नाटक स्वत: पूर्ण करून छापले आहे.तसेच काहीच्या मते हे नाटक 'बाळ सामंत' या कथाकाराने नंतरच्या काळात पूर्ण केले आहे.पण मला जो मुद्दा सर्वांच्या समोर आणावयाचा आहे तो असा कि,'राजसंन्यास' हे नाटक स्वत:  गडकरी याने त्याच्या हयातीतच पूर्ण केले असण्याची शक्यता आहे.कारण त्या काळात या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत.आणि त्याचा पुरावा म्हणजे 'राम गणेश गडकरी समग्र वाड्मय' याची संपूर्ण माहिती देण्यासाठी बनवण्यात आलेल्या http://ramganeshgadkari.com/ या संकेतस्थळावर या 'राजसंन्यास' नाटकाच्या सादरीकर झालेले फोटो उपलब्ध आहेत.
मग प्रश्न असा उरतो कि,आज जे 'राजसंन्यास' अपूर्ण आहे म्हणून दाखवण्यात येत आहे.ते ज्या प्रमाणे नंतरच्या काळात पूर्ण केले गेले असण्याची शक्यता सांगितली जात आहे.तशीच शक्यता पूर्ण असलेले नाटक नंतरच्या काळात 'अपूर्ण' करण्यात आले असण्याची शक्यता का असू शकत नाही ? म्हणजे पूर्ण नाटकातील (आता असणार्या अपूर्ण नाटकातील वादग्रस्त  मजकुरा पेक्षा ) जास्त वादग्रस्त मजकूर नंतरच्या कळत कशा वरून वगळण्यात आलेला नसेल ? किंवा नष्ट करण्यात आलेला नसेल.(उदा :  ज्ञानेश्वरी ची मूळ प्रत वि.का.राजवाडे याने नष्ट केली व नाना फडणवीस याच्या रखेल्या दत्तो वामन पोतदार यांनी गिळल्या !) या बाबत अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे जेम्स लेन ला विकृत माहिती पुरवली म्हणून एस.एस.बहुलकर या व्यक्तीला पुण्यातील शिवसैनिकांनी काळे फासले होते.त्या नंतर राज ठाकरेने बहुलकरची माफी मागितली त्याच दरम्यान संभाजी ब्रिगेड ने 'भांडारकर' वर कारवाई केली.त्याचा निषेध म्हणून पुण्यातीलच गजानन भास्कर मेहंदळे याने स्वत: लिहित असलेल्या 'शिव चरित्राची' एक हजार पाने नष्ट केली होती.त्या वेळेस हि मेहंदळेच्या पाने नष्ट करण्याच्या कृतीवर महाराष्ट्रातील आघाडीचे साप्ताहिक 'चित्रलेखा' ने संशय व्यक्त केला होता.असे काय लिहिले होते त्या पानात ? कि ती  नष्ट करण्यात आली.असो.तर 'राजसंन्यास' या विकृत नाट्य कृतीच्या बाबत कुणी जाती साठी माती खाल्ली असेल हे सांगण्यास जोतिष्याची  आवश्यकता नाही !

Friday, March 18, 2011

बडव्यांचा निर्णय दिशाभूल करणारा

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील बडवे-उत्पात व सेवाधारी यांनी भाविक भक्तांकडून दक्षिणा न मागण्यांचा घेतलेला निर्णय हा निव्वळ स्टंट असून सर्वसामान्य गोरगरीब भाविक भक्तांची दिशाभूल करणारा आहे, असे पत्रक येथील औदुंबरअण्णा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुळातच बी. डी. नाडकर्णी आयोगाच्या शिफारशीनुसार बडवे-उत्पात यांना गाभाऱ्यात व मंदिराच्या इतर कुठल्याही भागात दक्षिणा, ओवाळणी किंवा देणग्या मागण्याची मनाई आहे. दक्षिणा न मागण्याचा निर्णय हा नुकतेच आयकर विभागाने बडवे-उत्पातांना बजावलेल्या नोटिशीतून पळवाट काढून आपले उत्पन्न कमी दाखवण्याचा नियोजनबद्ध डाव आहे. तसे नसते तर आताच हा निर्णय घेण्याची सद्‌बुद्धी बडवे-उत्पातांना का सुचली? हा संशोधनाचा विषय आहे.
बडवे-उत्पातांनी विठ्ठलमूर्तीचे संरक्षण केल्याचा उल्लेख सातत्याने करण्यात येतो. जरी बडवे- उत्पातांनी विठ्ठलमूर्तीचे संरक्षण केले असले तरी त्यामुळे त्यांचा त्यावर हक्‍क प्रस्थापित होत नाही. त्यामुळे विठ्ठलमूर्तीचे संरक्षण करून बडवे-उत्पातांनी बहुजन समाजावर फार मोठे उपकार केल्याच्या आविर्भावात राहू नये. कारण याबाबत कोणत्याही ऐतिहासिक साधनांमध्ये कोणताच पुरावा उपलब्ध नाही.
या प्रकरणामध्ये सेवाधाऱ्यांना निश्‍चित मानधन देण्याचा विषय चर्चेत आहे. परंतु सेवाधारी हे काही मंदिराचे कायम कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांना कायम मानधन देण्याचा विषय हा गैरलागू तर आहेच पण ज्या बडवे-उत्पात व सेवाधारी यांच्याकडून ज्या भाविकभक्तांचा शेकडो वर्षे अगणित छळ करण्यात आला त्याच भाविकांच्या पैशातून बडव्यांना मानधन देणे हा सर्वसामान्य भाविकांचा अवमान आहे.
मुळातच नाडकर्णी आयोगाच्या शिफारशीनुसार बनवण्यात आलेल्या मंदिर अधिनियमाच्या अंमलबजावणीलाच या बडवे-उत्पात समाजाने दावा दाखल करून परंपरेच्या नावाखाली खोडा घातला आहे. त्यामुळे दक्षिणा न मागण्याचा निर्णय हा सर्वसामान्य भाविकांच्या डोळ्यात सरळ सरळ धूळफेक आहे आणि जर बडवे-उत्पातांना सर्वसामान्य भाविकांचा एवढा कळवळा असेल तर त्यांनी दाव्याचा अंतिम निकाल लागण्याची वाट न पाहता तत्काळ मंदिरातील अधिकार सोडावेत आणि मंदिर स्वतः शासनाच्या अधिपत्याखाली पूर्णपणे सोपवावे, असे पत्रक औदुंबर अण्णा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Saturday, March 12, 2011

बडवे-उत्पाताच्या कचाटयातुन पांडुरंगाची सुटका कधी ?


पंढरपुरचा पांडुरंग हा बहुजन समाजाचा लोकदेव आहे.त्याचा आणि वैदिक ब्राम्हण यांचा काडीचा ही संबंध नाही.तरीया बहुजन समजच्यादेवाताला आपल्या जानव्याच्या दोराने व परंपरेच्या नावाखाली  गेली अनेक दशके बांधून ठेवले आहे.आणि त्याच्या आडून आपली पोटे जाळण्याचा उद्योग ही मंडळी करीत आलेली आहेत.करीत आहेत.या सर्व प्रकरणाची  १९६६ ते २०११ च्या वास्तव परीस्थिती आपल्या समोर ठेवत आहे.
बडवे-उत्पाताच्या त्रासला वैयतागुन वारकरी यांनी सन १९६७ चे आलंदी यात्रेत वै.वरळीकर,मुंबई यांचे अध्यक्षते खाली वारकरी महा मंडलाची स्थापना केली.त्या नंतर कै.हरिभाऊ पाटसकर यांच्या नेतृत्वा खाली वारकर्याच्या मागणी प्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी २१/१०/१९६८ रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नाडकर्णी आयोगाची (श्री.बी.डी.नाडकर्णी,निवृत जिल्हा न्यायाधीश) यांची नेमणूक केली.नाडकर्णी आयोगाने अत्यंत कठीण परिश्रम घेउन पंढरपुर मंदिरातील गैरप्रकाराची सविस्तर चौकशी तसेच प्रथा-परंपरा यांचा अभ्यास करुन २ फेब्रुवारी १९७० रोजी शासनास चौकशी अहवाल सादर केला.तसेच पंढरपुर मंदिर अधिनियमाचा मसुदा सुध्दा यासोबत शासनास सादर केला.
नाडकर्णी आयोगाने बडवे-उत्पात सेवाधारी इ.चे हक्क,अधिकार व विशेषाधिकार काढून घेण्यात यावेत.देवताचे पूजेसाठी नौकर नेमावेत.धार्मिक देवालय राजकारणा पासून अलिप्त असावे.प्रांत दर्जाचा अधिकारी व्यवस्थापक असावा.देवलाच्या भागात दक्षिणा/ओवाळणी मागण्याची सक्त मनाई असावी.इ महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत.
सन.१९७३ साली.थोर स्वातंत्र्यसैनिक व विठ्ठल भक्त कै.शेलरमामा यांनी मुंबईतिल हुतात्मा चौकात प्राणातिक उपोषण केले होते.वारकरी महामंडल,रामदास बुवा मनसुख ,गो.श.राहिरकर यांच्या विनंतीला मान देऊन त्या वेळचे विधि व न्याय मंत्री ए.आर.अंतुले यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर मंदिर अधिनियम,१९७३ हा कायदा विधिमंडलाच्या दोन्ही सभाग्रहात मंजूर करण्यात आला.
सदर कायद्यान्वये बडवे,उत्पात,पुजारी यांचे अनुवंशिक अधिकार व विशेषाधिकार,मंदिरात दक्षिणा घेण्याचा किंवा मागण्याचा बडवे,उत्पात,सेवाधारी,शेत्रोपाध्याय,कोळ्याचे आणि इतर सर्वाचे अनुवंशिक अधिकार व विशेषाधिकार संपुष्टात आणण्यात आले आहेत.
समस्त बडवे मंडळ,समस्त बडवे समाज,उत्पात समिती यांच्या संबंधातिल त्यांच्या सर्व शक्ति,कर्तव्य,अधिकार व विशेषाधिकार इत्यादि सर्व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 
समितीच्या सुपूर्त करण्यात आले.
सदर कायदा अंमलात आणण्याची  अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द होण्यापुर्वीच  सन १९७४ मध्ये बडवे- उत्पात  यांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका (writ petition no 228  & 229 of 1974 ) दाखल करुन सदर कायद्याच्या वैधतेला आव्हान दिले.सदर याचिकेत आव्हानित कलेले मुद्दे हे पुराव्याच्या आधारे  सिद्ध करावयाचे असल्याने दिवाणी न्यायालयात दावे दाखल करण्याचे निर्देश मा.सर्वोच्च न्यायालयाने बडवे उत्पाताना दिले. 
त्याप्रमाणे बडवे-उत्पात यांनी सोलापुर येथील न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचे कोर्टात महाराष्ट्र शासन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या विरुध्द पंढरपुर मंदिरे अधिनियम १९७३ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारे दावे (regular civil suit no 527 of 1976  ) दाखल केले.सर्व संबंधीतांचे म्हणणे ऐकून व पुराव्याच्या अभ्यास करुन दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांनी सदर तिनीही दावे दिनांक २४/१/१९८४ रोजी दिलेल्या निकाला द्वारे फेटालून  लावले.
त्यानंतर बडवे,उत्पात व सेवाधारी यांनी सोलापुर येथील जिल्हा न्यायालयात पहिले अपिल (civil appeal no.105 of 1984 ) दाखल केले.तीसरे अतिरिक्त्त सहाय्यक जिल्हा न्यायाधीश यांनी दिनांक २८/११/१९८४ रोजी दिलेल्या निकालात ही सर्व अपिले फेटालून लावली.
त्यानंतर बडवे-उत्पात यांनी मुंबई उच्च न्यायालयात दुसरे अपिल दाखल (second appeal no 46 & 52 of 1985 ) दाखल केले.या अपिलाची सुनावनी होउन निकाल लागे पर्यंत मंदिराचे व्यवस्थापन करण्याबाबत अंतरिम निर्देश द्यावेत 
असा विनंती अर्ज (civil application no.238 of 1985 ) बडवे-उत्पातानी मा.उच्च न्यायालयात दाखल केला.या अर्जानुसार मा.न्यायालयाने अस्थायी समितीद्वारे मंदिराचे व्यवस्थापन सुरु ठेवणे बाबत तसेच अशा समितीमध्ये  बडवे-उत्पात यांच्या प्रतिनिधिंचा समावेश करणे बाबत अंतरिम आदेश दिनांक २१/२/१९८५ रोजी दिले आहेत.
त्यामुले "श्री विठ्ठलाच्या पायाशी अर्पण केलेली रक्कम बडवे यांनी व श्री रुक्मिणी मातेच्या पायाशी अर्पण केलेली रक्कम उत्पात यांनी उचलने" हे आजतागायत  चालू राहिले आहे. 
त्यानंतर अनेक वर्षे (२१ वर्षे) कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सदर अपिलाची सुनावनी पुढे ढकलण्यास बडवे-उत्पात यांना यश आले.मात्र २००६ चे एप्रिल-मे-जून या काळात सदर अपिलाची सुनावनी मा.उच्च न्यायालय (न्यायमूर्ति मा.अजय खानविलकर) यांचे समोर होउन संपली.दिनांक १६/११/२००६ रोजी मा.न्या.अजय खानविलकर यांचे कोर्टात सर्व अपिलांचा निर्णय जाहिर करण्यात आला.व सर्व अपिले नामंजूर करुन फेटालन्यात  आली.
मा.उच्च न्यायालयातील सदर अपिलांच्या सुनवणीच्या वेळी मा.शासनाच्या वतीने वरिष्ठ विधिन्य शेखर नाफड़े
यांनी तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने वरिष्ठ विधिन्य मा.अनिल साखरे व मा.शशिकांत सुराणा यांनी युक्तिवाद केला.बडवे यांच्या वतीने वरिष्ठ विधिन्य मा.बाळ आपटे व उत्पाताच्या वतीने वरिष्ठ विधिन्य मा.अभय अभ्यंकर आणि सेवाधारी यांच्या वतीने मा.विनीत नाईक यांनी युक्तिवाद केला. 
मा.उच्च न्यायालयाने सर्व संबंधीतांचा  युक्तिवाद ऐकून पंढरपुर मंदिरातील प्रथा परंपरांचा सर्व अनुषंगिक बाबींचा विचार करुन ३५३ पानांचे सविस्तर असे निकालपत्र
दिनांक १६/११/२००६ रोजी जाहिर केले.त्यामुले पंढरपुरच्या  विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बडवे-उत्पात आणि सेवाधारी यांचे हक्क आणि अधिकार हे संपु ष्ठात  येउन ते शासन नियुक्त अस्थायी मंदिर समितीकडे  सुपूर्त करण्यात आले.   
परिणाम स्वरूप बडवे,उत्पात,सेवाधारी व पंढरपुर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील इतर हक्कदार यांचे दक्षिणा
अथवा देणग्या व त्यापासून मिळणारे उत्पन्न स्वत:ला घेण्याचे सर्व अधिकार संपुष्टात आले.शासन नियुक्त समिती मंदिराचा कारभार 
पाहिल.तसेच बडवे,उत्पात,सेवाधारी व इतर यांचे भक्ताच्या नावाने देवतांची पूजा करणे इत्यादि अधिकार संपुष्टात आले.या निर्णयामुले संपूर्ण भारतातील व महाराष्ट्रातिल वारकरी भक्तांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले होते.
नोव्हेंबर -२००६ रोजी मुंबई उच्च न्यायालयात मा.न्या.अजय खानविलकर यांनी वरील निर्णय जाहिर केल्यानंतर बडवे,उत्पात,सेवाधारी यांच्या वकिलांनी सन १९८५ मध्ये दुसरे अपिल दाखल होताना जे अंतरिम आदेश दिलेले 
होते ( दिनांक २१/२/१९८५ रोजी दिलेले अंतरिम आदेश) तेच आणखी बारा आठवडे पुढे चालू रहावेत,अशी विनंती न्यायालयास केली.न्यायालयाने गेली २० वर्षे सुरु 
असलेले दिनांक २१/२/१९८५ रोजीचे अंतरिम आदेश १२ आठवडे पुढे चालू ठेवण्यास सर्व संबंधीताना आदेश दिले.
यानंतर बडवे-उत्पात यांनी मा.उच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाच्या विरोधात मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमति याचिका 
क्रमांक २८३०/२००७ ( ) दाखल केली.मा. सर्वोच्च न्यायालयाकडून 'जैसे थे' ( ) परिस्थिति ठेवण्याचे आदेश २३/२/२००७ रोजी मिळवलेत.त्यामुले आजही मा.उच्च न्यायालयाने 
दिनांक २१/२/१९८५ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार अंमलात आलेली व्यवस्था सुरु आहे.म्हणजेच आजही श्री विठ्ठलाच्या पायाशी 
अर्पण केलेली रक्कम बडवेनि उचलने व श्री रुक्मिणीच्या पायाशी अर्पण केलेली रक्कम उत्पात यांनी उचलने अशी व्यवस्था आजतागायत चालू राहिली आहे.
त्यानंतर २००९-१० या वर्षात तात्कालीन विधि व न्याय मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे-पाटिल यांनी या प्रकरनात  व्यक्तिश: लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाची बाजु भक्कमपणे मांडण्यासाठी दिल्ली येथील सुप्रसिध्द विधिन्य मा.हरीश साळवे यांना जेष्ठ वकील ( )म्हणून तसेच सुप्रसिध्द वकील श्री.पी.पी.राव यांची विशेष अभियोक्ता ( )म्हणून दिनांक १४/२/२०१० रोजी नियुक्ति केली आहे.
आज मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २३/२/२००७ रोजी दिलेल्या आदेशाला तसेच मा.उच्च न्यायालयाच्या दिनांक १६/११/२००६ रोजीच्या अंतिम आदेशाला ४ वर्षे पूर्ण होऊंनही सदर प्रकरण कधीही मा.सर्वोच्च न्यायालयाच्या समोर सुनावनीस आलेले नाही.
यावरुन असे स्पष्ट दिसून येते की,पंढरपुर मंदिरे अधिनियम १९७३ अस्तित्वात येण्यासाठी प्रचंड परिश्रम व कालावधी 
लागला आहे.त्यानंतर या कायद्याची अंशत:अंमलबजावनी  शक्य होऊंन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे शासनाच्या ताब्यात  येण्यासाठी १२ वर्षे (१९७३ ते १९८५) वाट पहावी लागली.त्यानंतर या प्रकरणाचा उच्च न्यायालयात अंतिम निकाल लागेपर्यंत २१ वर्षे (१९८५ ते २००६) इतका कालावधि लागला.तसेच या कायद्याची पूर्णपणे अंमलबजावनि करण्यासाठी अजुन किती वर्षे लागतील हे सांगता येत नाही.
म्हणजे १९६६-६७ साली (किंवा त्यापूर्वी अनेक वर्षे) असलेली मंदिरातील परिस्थिति आजही २०१०-११ या सालात कायम आहे.या परिस्थितिस जबाबदार कोण ? आणि......
बडवे-उत्पाताच्या कचाटयातुन पांडुरंगाला सोडवणार कोण ? आणि कधी ?