Thursday, March 14, 2013

"शिवधर्म गाथा" समजून घेताना.....! (भाग १ ला)

दि.१२ जानेवारी २००५ रोजी आपण सर्वांनी आपल्या  'मूळ'  सांस्कृतिक -धार्मिक वारसा असणार्या 'शिवधर्माचे' जाहीर प्रकटन  जगा समोर केलेले आहे.या निमित्ताने आपण आपल्या मुळच्या 'शिव' संस्कृतीचे पुन:जीवन करण्याचाही प्रत्येकाने मनोमन 'संकल्प' केलेला होता.तो आज हि कायम आहे.त्या मुळच्या संस्कृतीचे पुन:जीवन म्हणजे आपला मुळचा चेहरा शोधणे होय. आज आपण या 'सामुहिक' संकल्पाच्या दिशेने क्रमाक्रमाने पाऊले टाकण्यास सुरवात केलेली आहे.त्यातीलच एक पाऊल म्हणून आपल्याला आपल्या 'मार्गदर्शकांनी' १२ जानेवारी २०१२ रोजी शिवधर्मा संदर्भात काहीना काही तरी भाग लिखित स्वरुपात आपल्या समोर ठेवण्याचे अभिवचन  दिलेले होते.त्या वचनाला  जागून गेल्या वर्षभरातील वैचारिक भूमिकेचा सार 'शिवधर्म गाथा' या ग्रंथाच्या माध्यमातून १२ जानेवारी २०१३ रोजी आपण सर्वांन समोर ठेवण्यात आलेला आहे.मुळ विषयाकडे वळण्याआधी मी वाचकांना,शिवधार्मियांना पुन्हा पुन्हा नम्र विनंती करू इच्छितो,कि आपण सर्व प्रथम 'शिवधर्म गाथा' विकत घ्यावी आणि ती सुरवाती पासून शेवट पर्यंत अत्यंत काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा वाचावी.त्यातील बारीक-सारीक तपशिलांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा.वाचन,मनन आणि चिंतन या पातळ्या  पार पाडाव्यात.आणि मगच माझा हा लेख अथवा हि लेखमाला वाचावी.हि नम्र विनंती आहे.

'शिवधर्म गाथेचे' प्रास्थाविक......

शिवधर्म संसद आपल्या प्रास्थाविका मध्ये अनेक बाबींचा उल्लेख करते.जसे कि 'शिवधर्मा'च्या समग्र मांडणीला येथून पुढे कायम "शिवधर्म गाथा" संबोधले जाईल.यामध्ये अत्यंत महत्वाचा उल्लेख म्हणजे 'आज जी मांडणी आपल्या पुढे ठेवली आहे.ती एक प्रकारे शिवधर्म गाथेचा कच्चा  आराखडा आहे.' म्हणजे या मध्ये आपणा सर्वांना शिवधर्म संसद आपल्या विवेकबुद्धीचा वापर येत्या वर्षभरामध्ये व तेथून पुढे हि करण्याचे एक प्रकारचे आवाहनच करीत आहे.व त्यास अनुसरून आपण आपल्या सुचना पाठवण्याचे हि आवाहन करीत आहे.आणि हाच मुद्दा 'शिवधर्म' आणि जगातील इतर सर्वच 'धर्म'  यातील  फरक अत्यंत ठळकपणे अधोरेखित करणारा आहे.आणि तो म्हणजे,जगातील आजपर्यंतच्या (माझ्या अभ्यासा नुसार) कोणत्याही 'धर्मा'ने धर्म संबंधी बाबी ठरवण्याचा अधिकार आपल्या अनुयायांना दिलेला नव्हता.व नाही.पण 'शिवधर्म' मात्र  हा जगातील असा एकमेव 'धर्म' आहे.जो आपल्या अनुयायांना आपला 'विवेक' सतत वापरण्याची मुभा तर देतोच आहे.पण 'धर्म' तत्वज्ञान ठरवण्याचा 'अधिकार' हि  देत आहे.आणि हीच गोष्ट 'शिवधर्म' या संकल्पनेला सर्व धर्माहून वेगळे दर्शवण्या बरोबर आपले वैशिष्ठ्य अधोरेखित करणारी आहे.जगदगुरु तुकोबारायांच्याच भाषेत सांगावयाचे झाल्यास.....
                                     जो जागता आपुलिया हिता !
                                     धन्य माता-पिता तयाचिये !!
असेच या संदर्भात म्हणता येईल.त्याच बरोबर फक्त 'धर्म' तत्वज्ञान काय असावे ? एवढेच सुचवण्याचा 'शिवधर्म संसद' आपणाला अधिकार देत नाही तर त्यात काळानुरूप 'बद्दल' करण्याचा लोकशाहीतील अतिउच्च असा असणारा 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा' अधिकार हि प्रदान करते आहे.यातून एक बाब अत्यंत ठळकपणे स्पष्ट होते कि,'माणूस हा धर्मासाठी आहे' हि परंपरागत विचारसरणी टाकून 'शिवधर्म संसद' 'धर्म हा माणसांसाठी आहे.' हे सांगते.शेवटी कुणीतरी म्हटले आहेच ना,"जो 'धारण'  करतो तो 'धर्म' !" येथे आज पर्यंत आपण ज्या कोणत्याही धर्मात आहात,होता.त्या धर्माने आपल्याला कधी 'धारण' केले होते का ? केले आहे का ? याचा हि विचार प्रत्येकाने करावा.तसेच,आपल्याला आपल्या 'धर्म' बाबी ठरवण्याचा 'अधिकार' दिलेला होता का ? दिलेला आहे का ? व अत्यंत महत्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या 'धर्माने' त्याच्या तत्वज्ञानात 'बद्दल' करण्याचा कधी 'अधिकार' दिलेला होता का ? किंवा दिलेला आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रत्येकांने आप-आपल्या मेंदूला विचारल्या शिवाय 'शिवधर्माचे' वेगळेपण आणि वैशिष्ट्य  लक्षात येणार नाही.
                                                                                          (क्रमश:)                                                                                                        

No comments:

Post a Comment