'फितूर' आणि 'बाईल वेड्या'
अटल बिहारी वाजपेयी यांना "भारतरत्न" देण्यात येऊ नये !
आपल्या देशाचे माझी 'पंत'प्रधान श्री.अटल बिहारी वाजपेयी यांना "भारतरत्न" पुरस्कार देण्याची संघीष्ट शेंबड्या लोकांची मागणी जोर धरत आहे.त्यामध्ये स्वत:च स्वत:ला भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ समजणाऱ्या प्रचार-प्रसार माध्यमांचा सहभाग विषय उतू जाण्यायेवढा आहे.मुळामध्ये आज पर्यंत "भारतरत्न" पुरस्कार देण्यात आलेल्या लोकांच्या नावांची यादी पहिली तर कोणताही सभ्य व्यक्तीला कपळावर हात मारून घेण्याची वेळ आल्या शिवाय राहणार नाही.अशा एकासेक महाभागांची नावे यात आहेत.(काही अपवाद आहेत.) यामधील एकेका महाभागाचे चरित्र आणि चारित्र्य पाहिले तर एक वेळ लाज सुद्धा लाजेल.आता,तर सदर पुरस्कार देण्या-घेण्यावरुन जो गदारोळ सुरु आहे.तो पाहता "भारतरत्न" पुरस्काराला भारत भुवन नावाच्या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या कटिंग चहा एवढी सुद्धा किंमत राहिलेली नाही.किंबहुना "भारतरत्न" ज्या पद्धतीने दिला-मागितला जात आहे.ते देण्या-मागण्याची भाषा करणाऱ्या लोकांमुळे असे म्हणण्यास पुरेपूर वाव आहे.यात भरीसभर म्हणून आता अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची भरती करण्यासाठी सचिन तेंडूलकर यांच्या नावासाठी ज्या प्रमाणे या देशातील ब्राम्हण ब्युरोक्रोसी कामाला लागलेली आहे.मुळामध्ये भारता सारख्या लोकशाही प्रधान देशात दिला जाणारा "सर्वोच्च नागरी सन्मान" असणारा "भारतरत्न" सुद्धा लोकशाही पद्धतीने लोकांचे मतदान घेऊन देण्यात आला पाहिजे.आणि तो हि पाच वर्षातून एकदाच.आणि एकाच व्यक्तीला.असो.
तर आता……………… अटल बिहारी वाजपेयी यांना "भारतरत्न" का देण्यात येऊ नये ?
या प्रश्नाचे थेट उत्तर द्यावयाचे झाल्यास आता,"फितुरांना" आणि "बाईल वेड्या" लोकांसुध्दा "भारतरत्न" द्यायचा का ? असा प्रती प्रश्न उपस्थित करावा लागेल.अटल बिहारी वाजपेयी हे "फितूर" आहेत हे माझे वाक्य नसून अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे नेते आणि जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री.लीलाधर वाजपेयी यांचे आहे.
याबाबत सविस्तर विषय असा आहे :-

'फितूर' वाजपेयींचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय ?
देशातील स्वातंत्र्य सैनिकांचा सवाल

अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांचे बंधूंनी ब्रिटीश न्यायाधीशांसमोर माफीनामा लिहून दिला. ते इंग्रजांना फितूर झाल्यानेच मला पाच वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला,असा आरोपही लीलाधर वाजपेयी यांनी या पत्रपरिषदेत केला. व्हाईसराय यांच्या विधिमंडळात सदस्य असलेल्या गिरीजा शंकर वाजपेयी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाजपेयी आणि त्यांचे बंधू या प्रकरणातून बचावले,असे हि लीलाधर वाजपेयी यांनी सांगितले.
(संदर्भ :- दै. लोकमत.नागपूर-रविवार दिनांक १९ सप्टेंबर १९९९,पान नं १२)
हा झाला अटल बिहारी वाजपेयी यांच्या 'फितुरी'चा पुरावा. आता,प्रश्न राहतो तो 'बाईल वेडे' पणाचा ! तर हे मत सुद्धा माझे नाही. तर हे मत आहे भारताचे आणखी एक माजी 'पंत'प्रधान आणि अटल बिहारी वाजपेयींचे एकेकाळचे जानेजीगर मोरारजी देसाई यांचे !
या बाबत हि पुढील उतारा पहा :-
अटलजी अविवाहित की ब्रम्हचारी ?
भारतीय राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे.सर्वच पक्ष आपणच खरे राष्ट्रप्रेमी असल्याचा आव आणत असतात आणि दुसरीकडे विरोधक कसे गद्दार,राष्ट्रद्रोही आहेत हेही जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो.अशा वेळी खरा देशप्रेमी कोण हे जनतेने कसं ठरवायचं.की सगळेच राष्ट्रद्रोही आहेत असं समजून भारतमातेच्या नशिबावर आसवं गाळायची ? प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्ववादी संघटना अशी प्रतिमा बनवू इच्छिणाऱ्या भाजपचे मात्र नशिबाच फुटकं म्हणा की,ऐन वेळी एखादा बाँबगोळा पडतो आणि राष्ट्रीयत्वाची आकार घेत असलेली प्रतिमा उध्वस्त होऊन जाते. आडवाणीजींनी रथयात्रा काढली.काही ठिकाणी दंगली झाल्या. दंगलीचे खापर भाजपच्या माथ्यावर फुटलं आणि निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही. आता हेच बघा ना. अटलबिहारी वाजपेयी,डॉ. मुरलीमनोहर जोशी इ. जे भाजपचे चमकते सितारे आहेत; त्यांच्या नावांभावती काही न काही वादळ उठतच असत. त्यातही ब्रम्हचारी महाराज अटलबिहारी वाजपेयी म्हणजे भाजपचा पिलर………. आधारस्तंभ. अटलजी म्हणजे स्वछ प्रतिमा,अटलजी म्हणजे चारित्र्य, अटलजी म्हणजे राष्ट्रप्रेमी, अटलजी म्हणजे शुद्धत्व, अशी हाकाटी चालू असतानाच एका खटल्यात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांनी अटलजीना पुन्हा संशयाच्या विळख्यात उभं केलं आहे.
अटलबिहारी ब्रम्हचारी आहेत. हे जगजाहीर तथ्य आहे. पण माझी पंतप्रधान आणि एकेकाळचे अटलजींचे जानेजीगर मोरारजी देसाईनी "अटलजी गेल्या २० वर्षापासून एका महिलेबरोबर राहत आहेत",असे म्हटल्यामुळे आपल्यासारख्या सामान्य जनांची बुद्धी चक्रावून जाते नाही ?,मुंबईच्या 'न्यूज ट्रक वीकली' ने मोराजींची मुलाखत घेतली होती. आणि हि मुलाखत एका खटल्या दरम्यान पुरावा म्हणून सादर केली गेली. त्यात मोरारजी जे काही म्हणाले त्यामुळे अटलजींच्या स्वच्छ प्रतिमेला चांगला उभा चिर पडला. मोरारजींनी सांगितलं होत की,"पंतप्रधान असताना मी विदेशवाऱ्या केल्या तेव्हा अटलजीवर ते 'बाईल वेडे' असल्याचे आरोप केले होते. मी चूप होतो. मला मला ते माहित असत ना तर विदेश दौर्यात माझ्यासोबत नेहमी राहणाऱ्या अटलजीना मी हटकलं असत. त्यांनी अतिशय हुशारीन त्याचं काम सुरु ठेवलं होत !"
पत्रकाराने विचारलं …. "मग आपल्याला कसं कळल ?"
मोरारजी म्हणाले,"मला तसं सांगण्यात आलं. कुणी मला सुचवलं असतं तर मी त्याची गंभीर दखल घेतली असती. एवढंच नव्हे मी त्यांना काढूनही टाकलं असत. पण मला माहितच नव्हत आणि पुराव्याशिवाय आपण कुणाबद्दल काहीच म्हणू शकत नाही. "मग आताही तुमच्याकडे पुरावे नाहीत,तरीही तुम्ही एवढ ठामपणे कसं म्हणू शकता …. "पत्रकार.
"पुरावे आहेत ! मोरारजी म्हणाले",अटलजी गेल्या २० वर्षापासून एका बाईसोबत राहतात. आणि ते स्वत:हि अनेक मुलाखतीत म्हणतात की 'मी अविवाहित आहे पण ब्रम्हचारी नाही ! याचा अर्थ काय ?
त्यावर अटलजीनी लग्न का केलं नाही ? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यावर मोरारजींनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होत. ते म्हणाले होते………"लग्न केलं कि तुम्हाला एकाच बाईसोबत आयुष्यभारासाठी बांधून रहावं लागतं. पण अविवाहित असलं तर तुम्ही दुसरीकडे हि जाऊ शकता. यामुळे दोन फायदे होतात. एक म्हणजे तुम्हास एकाच स्त्रीच्या बंधनात रहावं लागत नाही. आणि दुसर म्हणजे तिला तुमच्याकडे तक्रारही करता येत नाही. मोरारजींनी अटलजींच्या प्रतिमेचं अशाप्रकारे पार खोबर करून टाकलं आहे आणि जनमानसात त्यांच्याविषयी संशयाचं वावटळ उठलं आहे. अटलजी आपल्या पक्षाशीच प्रामाणिक नाहीत.मग ते कुठल्या बाईशी कसे प्रामाणिक राहू शकतात. असे त्यांचे विरोधक म्हणतात. रामजन्मभूमीबाबतच्या भाजपच्या धोरणाला अटलजींचा विरोध आहे. हिंदी आणि हिंदू राजकारणाचे खंदे प्रणेते अटलजी कधी समाजवादाची प्रशंसा करतात तर कधी समाजवादाची आपली पसंती व्यक्त करतात. अटलबिहारी नावामधला 'अटल' वेगळा आणि 'बिहारी' वेगळा असं हे दुभंगलेलं व्यक्तिमत्व. सदैव वादाच्या भोवर्यात राहात असल्यामुळे ते ब्रम्हचारी कि फक्त अविवाहित हे आपण कसं ठरवायचं ? तसं काही 'प्रुफ' किंवा 'आयविटनेस' सापडल्याखेरीज 'जे जे होईल ते ते पाहावे" हेच आपल्या हाती आहे !
(संदर्भ :- दै. जनवाद,नागपूर दिनांक १२ ऑक्टोंबर १९९१,पान ३)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteमुळात भारत-रत्न किंवा तत्सम नागरी पुरस्कार सरकारने जनतेच्या पैशाने वाटूच नयेत. परंतु सरकार असे पुरस्कार देत आहे.
ReplyDeleteअटल बिहारी वाजपेयी खाजगी जीवनात कुठल्या बाई-सोबत राहिले याने त्यांचे काम कमी होत नाही. आणि असाही पुरस्काराच्या नियमावलीमध्ये तसा नियम नाही.
आता त्यांनी फितुरी केली असेल तर असा पुरस्कार त्यांना देऊ नये या मताशी सहमत आहे.
ज्या संघटनेची आणि ज्या पक्षाची सुरवातच देशद्रोहापासून झाली आहे,त्यांच्या कडून राष्ट्रभक्तीची अपेक्षा साफ चुकीची आहे. बाईलवेडे असणं गैर काय किती वेळ दुसऱ्याचं पुरुषत्व आझमवून घेणार...
ReplyDelete