Wednesday, December 29, 2010

‎!! सत्यमेव जयते !!

साळत घातलया माझ्या पोराला,अन पश्चाताप झालय माझ्या मनाला
घामाच पाणी पिकाना देऊन
सालआ मी पोराला शिकवली होती
पोराच्या फी साठी रक्ताची बाटली मी विकली होती
...तरी बी पोर माझ बेकार हाय
साळत घातलया माझ्या पोराला,अन पश्चाताप झालय माझ्या मनाला
भरल्या कुकवान जीव माझ्या कारभारनिन सोडला होता
तिच्या देहा वरती गुरा सारखा हबरधा मी फोडला होता
तव्या वर फोड़निचा जाळ व्हावा
तसा कालजात माझ्या झाला होता

क्ड्ब्याची गंज रचावी तशी स्वप्नाची गंज मी रचली होती
स्वप्नाची गंजच आता पेटली होती
या बेकारिला कटालुन माझ्या पोरान आत्महत्याच केली होती
तालुक्यावरून पंचनाम्याला पोलिसाची गाड़ी पण आली होती
पोराच्या हत्येला बा जबाबदार
...म्हणून मलाच अटक करुन घेउन गेली होती
तरी सुद्धा तालुक्याच्या पोलिस स्टेशनात
सत्यमेव जयतेचीच पाटी होती
सत्यमेव जयतेचीच पाटी होती
-कवि -चन्द्रशेखर गायकवाड,मालशिरस,जि.सोलापुर