Friday, March 18, 2011

बडव्यांचा निर्णय दिशाभूल करणारा

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील बडवे-उत्पात व सेवाधारी यांनी भाविक भक्तांकडून दक्षिणा न मागण्यांचा घेतलेला निर्णय हा निव्वळ स्टंट असून सर्वसामान्य गोरगरीब भाविक भक्तांची दिशाभूल करणारा आहे, असे पत्रक येथील औदुंबरअण्णा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुळातच बी. डी. नाडकर्णी आयोगाच्या शिफारशीनुसार बडवे-उत्पात यांना गाभाऱ्यात व मंदिराच्या इतर कुठल्याही भागात दक्षिणा, ओवाळणी किंवा देणग्या मागण्याची मनाई आहे. दक्षिणा न मागण्याचा निर्णय हा नुकतेच आयकर विभागाने बडवे-उत्पातांना बजावलेल्या नोटिशीतून पळवाट काढून आपले उत्पन्न कमी दाखवण्याचा नियोजनबद्ध डाव आहे. तसे नसते तर आताच हा निर्णय घेण्याची सद्‌बुद्धी बडवे-उत्पातांना का सुचली? हा संशोधनाचा विषय आहे.
बडवे-उत्पातांनी विठ्ठलमूर्तीचे संरक्षण केल्याचा उल्लेख सातत्याने करण्यात येतो. जरी बडवे- उत्पातांनी विठ्ठलमूर्तीचे संरक्षण केले असले तरी त्यामुळे त्यांचा त्यावर हक्‍क प्रस्थापित होत नाही. त्यामुळे विठ्ठलमूर्तीचे संरक्षण करून बडवे-उत्पातांनी बहुजन समाजावर फार मोठे उपकार केल्याच्या आविर्भावात राहू नये. कारण याबाबत कोणत्याही ऐतिहासिक साधनांमध्ये कोणताच पुरावा उपलब्ध नाही.
या प्रकरणामध्ये सेवाधाऱ्यांना निश्‍चित मानधन देण्याचा विषय चर्चेत आहे. परंतु सेवाधारी हे काही मंदिराचे कायम कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांना कायम मानधन देण्याचा विषय हा गैरलागू तर आहेच पण ज्या बडवे-उत्पात व सेवाधारी यांच्याकडून ज्या भाविकभक्तांचा शेकडो वर्षे अगणित छळ करण्यात आला त्याच भाविकांच्या पैशातून बडव्यांना मानधन देणे हा सर्वसामान्य भाविकांचा अवमान आहे.
मुळातच नाडकर्णी आयोगाच्या शिफारशीनुसार बनवण्यात आलेल्या मंदिर अधिनियमाच्या अंमलबजावणीलाच या बडवे-उत्पात समाजाने दावा दाखल करून परंपरेच्या नावाखाली खोडा घातला आहे. त्यामुळे दक्षिणा न मागण्याचा निर्णय हा सर्वसामान्य भाविकांच्या डोळ्यात सरळ सरळ धूळफेक आहे आणि जर बडवे-उत्पातांना सर्वसामान्य भाविकांचा एवढा कळवळा असेल तर त्यांनी दाव्याचा अंतिम निकाल लागण्याची वाट न पाहता तत्काळ मंदिरातील अधिकार सोडावेत आणि मंदिर स्वतः शासनाच्या अधिपत्याखाली पूर्णपणे सोपवावे, असे पत्रक औदुंबर अण्णा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Sands Casino Hotel: The #1 Sportsbook in San Diego
    The official site of Sands Casino, the #1 casino in San Diego. หารายได้เสริม We provide gaming, luxury hotel, septcasino dining, & more 인카지노 fun!

    ReplyDelete