Friday, January 4, 2013

"जिजाऊ" चे स्मरण करताना !


१२ जानेवारी २०१३ "जिजाऊ जन्मोउत्सव" देशात-विदेशात आणि खास करून सिंदखेडराजा या जिजाऊ च्या जन्मगावी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.या दिना निमित्त जगभरातील मातृशक्तीचा सन्मान करणारे जिजाऊच्या समोर नतमस्तक होत आहेत. ज्या अर्थी हे वर्ष २०१३ आहे त्या अर्थी आपण  फार फार वर्ष पूर्वीचे अश्मयुगातील जीवन मागे टाकले आहे याचाच हा एक पुरावा आहे. पण शरीरात असणारा एखादा जुनाट दुर्धर आजारने ऐन मोक्याला डोके वर काढावे आणि आयुष्याच संपून जावे.अशीच काहीशी अवस्था आपल्या देशाची,समाजजीवनाची झालेली आहे.
एकीकडे आपण मातृशक्तीला सर्वोच्च स्थानी विराजमान करून या देशातील मातृसत्ताक समाज व्यवस्था परत पुन:स्थापित करण्यासाठी कटिबद्ध होत आहोत.झालो आहोत.आणि दुसरीकडे आपल्याच देशात दिल्ली मध्ये सामुहिक बलात्काची अत्यंत संताप जनक घटना घडून त्यात एका अनामिक मुलीचा जीव गेला आहे.दिल्ली मधील घटना हि काही या पहिली  देशातील घटना नाही.किंबहुना आपल्या देशातील बलात्काराची सरासरी काढल्यास प्रत्येक एका तासाला एक बलात्काराची घटना  घडत आहे.तर प्रत्येक अर्ध्या तासाला विनयभंग घडत आहेत.यातील बहुतांश घटना या समाजातील दिन-दलित,कष्टकरी,निराधार,लहान मुली यांच्या बाबत मोठ्या शहरापासून ते खेडेगावातील बांधाबांध वर घडत आहेत.आणि त्या भर म्हणजे कौटुंबिक अत्याचाराच्या घटनाची तर नोंदच सांगता येणे अशक्य आहे. आणि या सर्व घटनांमध्ये एकच व्यक्ती केंद्रभूत आहे ती  म्हणजे "स्त्री" ! जिला तिच्या जन्मा पासूनच 'तू' इतरांसारखी नाहीस.हेच सातत्याने बिंबवले गेले आहे.जात आहे.आपल्या देशातील मुळची संस्कृती असलेल्या शिव संस्कृतीचा संदर्भ सोडला तर आपल्या देशात आक्रमन करून प्रस्थापित झालेल्या वैदिक ब्राम्हण धर्माने सर्व प्रथम स्त्रीचा अपमान केला व मातृसत्ताक समाजजीवनाला पर्याय म्हणून पितृसत्ताक समाज व्यवस्था रूढ केली.पितृसत्ताक समाज व्यवस्था हि एक प्रकारची प्रतिक्रांतीच होती.हे आपण समजून घेतले पाहिजे.वैदिक ब्राम्हण धर्मातील वर्ण व्यवस्थे मध्ये प्रामुख्याने चार वर्ण होते हे आपणाला  माहित आहेच.पण....! स्त्री चे वर्णन कोणत्या वर्णात समाविष्ट आहे याचा शोध घेतला असता स्त्रीच्या अवस्थेची कल्पना येते.स्त्री हि ब्राम्हण आहे का ? नाही.स्त्री हि क्षत्रिय आहे का ? नाही.स्त्री हि वैश्य आहे का ? नाही.मग स्त्री हि शुद्र आहे का ? तर  त्याचे हि उत्तर आहे नाही.अजिबात नाही ! मग स्त्री आहे कुठे ? आणि  तिचा सामाजिक दर्जा काय ? तर वैदिक ब्राम्हणी धर्मानुसार स्त्री हि 'अवर्ण' आहे'.म्हणजे तिला ना आकार आहे ना उकार आहे.ती आहे फक्त उपभोगजन्य 'वस्तु' ! होय,वस्तूच ! आणि याचे समर्थन सनातनी कवी तुलसीदासने सुद्धा केले आहे.तुलसीदास म्हणतो,"ढोल गवार पशु और नारी ! सब है ताडन के अधिकारी !!" हे एकच उदाहरण नाही तर अशी लाखो नव्हे तर अनगिनत उदाहरणे वैदिक ब्राम्हणी धर्मग्रंथांच्या पानापानांवर आहेत.आणि त्याच वैदिक ब्राम्हणी धर्माचे आपण कळत-नकळत शिकार झालेलो आहोत.आपले भारतीय समाजजीवन तर या रोगाने पूर्ण ग्रस्थ झालेले आहे.त्यामध्ये सर्वात मोठा वाटा या देशातील मिडीयाचा आहे.जो आज दिल्लीतील बलात्काराच्या घटनांचे भांडवल करून खिसे भरून घेत आहेत.हा तोच मिडिया आहे.जो स्त्री हि नरकाचे दार आहे म्हणणाऱ्या असाहराम बापू व इतर अनेक बाबा-श्री श्री श्री-बुवा यांचे रात्रंदिवस उदात्तीकरण करण्यात गुंग असतात.आणि आता हेच दिल्लीतील निघणारे निषेध मोर्चे कव्हर करून थेट प्रसारण करीत आहेत.दिल्ली मध्ये घडलेली घटना निषेधाच्या पण पलीकडील आहे.पण या अगोदर फुलनदेवी या स्त्रीवर संपूर्ण उच्चवर्णनीय जमीनदारांनी गावासह सलग तीन दिवस बलात्कार केला.त्या वेळेस मिडिया नव्हता काय ? का तो बलात्कार नव्हता ? जेवढी प्रसिद्धी फुलनदेविच्या बंदूक हातात घेवून तिने घेतलेल्या प्रतिशोधा बद्दल दिली गेली.तेवढी तिच्यावर झालेल्या अत्याचाराला दिली गेली असती तर आज रस्त्या-रस्त्यावर मेणबत्या जाळण्याची वेळ भारतीयांवर आली नसती.आज मात्र अश्लीलतेच्या चौकटी कधीच मोडून मोकळे वावरणाऱ्या चित्रपट सुष्टीने सुद्धा निषेध नोदवावा या सारखा मोठा विनोद दुसरा कुठलाच नाही.
आपल्या देशात असणारी पुरुष प्रधान संस्कृतीच वाढत्या स्त्री अत्याचारास कारणीभूत आहे.कारण आपल्या देशातील सर्वच धर्मानी स्त्री हि 'अवर्ण' किंवा केवळ 'उपभोग' जन्य वस्तू म्हणूनच पहिले आहे.आज समाज,देश किती हि बदला असला तरी या देशातील हि विकृत मानसिकता आज हि कायम आहे.मुळामध्ये येथील धर्मानी मानवी जीवनाचा संपूर्ण ताबा घेतलेला आहे.त्यामुळे हि मानसिकता सहज सहजी बदलणे अवघड आहे.फक्त कायदा करून हा प्रश्न सुटणारा नाही.त्यासाठी आपल्या देशाची मूळ संस्कृती असणार्या 'मातृप्रधान संस्कृतीचा' जाणीवपूर्वक अंगीकार करावा लागेल.आणि त्यासाठी या देशातील सर्वच जाती-जमाती मधील स्त्री हि त्या त्या धर्मिक गुलामगिरीतून मुक्त झाली पाहिजे.त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे धर्मविरहित शिक्षण प्रणालीचा जाणीवपूर्वक अंमल करण्यात आला पाहिजे.अशा धर्मविरहीत शिक्षण प्रणालीतून तयार झालेली स्त्रीच या पुरुष प्रधान संस्कृतीचा 'काळ' ठरेल.व हि विकृती समाप्त करेल.पण,हे काम फक्त स्त्रीयाचेच नाही तर स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाचे आहे.
आज खर्या अर्थाने स्त्रीला सन्मानाचे आणि बरोबरीचे जीवनमान मिळवून द्यावयाचे असेल तर रस्त्यावर मेणबत्ती मोर्चा काढण्यापेक्षा आप-आपल्या घरातील  हि स्त्री हि उपभोग जन्य वस्तू समजणाऱ्या वैदिक ब्राम्हणी धर्म ग्रंथांची प्रत्येक चौका-चौकात जाहीररित्या होळी केली पाहिजे.आणि ती हि पुरुषांनी ! तरच जिजाऊचे स्मरण वंदनीय ठरणार आहे.
जय जिजाऊ ! जय शिवराय !!

No comments:

Post a Comment