Sunday, January 9, 2011

''आम्ही तुडवलं भांडारकर''

                            ज्या घटनेने संपूर्ण देश हादरला त्या घटनेचा मी एक साक्षीदार नव्हे घटनाकार ! होय,आम्हीच तुडवलं ५ जानेवारी  २००४ ला भांडारकर ! बहुजनप्रतिपालक छत्रपति शिवराय व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या अवमानाचा बद्दला आम्ही आमच्या पध्दतीने घेतला.हे सर्व का घडले ? कुणामुले घडले ? त्याच फलित काय ? अशा एक ना अनेक प्रश्नाची उत्तरे आता,आम्हाला सापडली आहेत.खरे तर,या अशा प्रश्नाशी आमचा काहीच संबंध नव्हता.कारण पंढरपुर तालुक्याचे माजी आमदार स्मृतिशेष कर्मवीर औदुंबरअण्णा पाटिल यांचा मी नातू.बहुदा हीच ओलख होती माझी.लहानपना पासून असलेली चित्रकारी ची आवड व ती जोपासण्यासाठी माझी सततची धडपड.एका संपन्न घराण्यात जन्माला आल्यामुले कशाचीच कालजी नव्हती.तरी पण अण्णानी स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या येवती या आमच्या मूळ गावातील डाकबंगला जळीत प्रकरणा संबंधी अभिमान वाटे आणि लहानपणा पासून एका नावाच जबरदस्त आकर्षण होते.ते नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटिल ! या नावाचे किंवा क्रांतिसिंहाच्या आयुष्यासंबंधी पहिल्या पासूनच कुतूहल होते.पण कधी सुद्धा वाचनाची आवड नव्हती.पण कदाचित नुसती कागदावर चित्रे काढून आयुष्य जाणार नव्हते.तर या बहुजन समाजाचे बिघडलेले चित्र दुरुस्त करण्याचे काम मला करावयाचे होते.हा विचार मनाला कधी शिवला सुद्धा नाही.हे सर्व सुरु असताना मी दाहवी नापास झालो.व त्यावेलेस शनी भक्ति कड़े वळलो,नुसता  वळलो नाही तर त्यात पार बुडून गेलो.साडेतिन वर्ष मनोभावे शनीभक्ति केली.पण एक दिवस मात्र आयुष्याला एक दिशा देणारी घटना घडली.ती म्हणजे घरा मध्ये मा.म.देशमुख नावाच्या इतिहासकाराची 'शिवशाही' व 'मराठा कुणबी समाजाची दशा व दिशा' ही पुस्तके येऊन पडली.सहज पुस्तके चाळली व पुस्तकातील भटजी-शेटजी-लाटजीची भाषा वाचली.आणि मनात आले,की किती जातीयवादी माणुस आहे.हा मा.म.देशमुख.पुन्हा आमची शनीभक्ति  सुरूच राहिली.पण विचारचक्रे मात्र पुन्हा फिरू लागली.त्याच वेळेस घरात मराठा सेवा संघाच्या ८ व्या अधिवेशनाची पत्रिका पाहिली.पत्रिकेत मा.म.देशमुख यांचे नाव होते.त्यांचे व्याख्यान होते.मग गडबडित अधिवेशनाचे ठिकान गाठले.आणि मा.म.देशमुख यांच्या पहिल्या वाक्यातच गारद झालो.तसा तडक घरी आलो.व वडिलाकडे पुस्तकांची  मागणी केली.त्यांनीपण भलामोठा गट्ठाच खरेदी करुन पुस्तके आणून दिली.आणि प्रवास सुरु झाला.संभाजी ब्रिगेडच्या दिशेने.....!
                       अधिवेशना मध्ये सौदागर मोळक व प्रशांत सुरवसे यांची ओळख झाली होती.गांधी रोडच्या तांबट धर्मशाळेत पहिली मिटिंग झाली.व संभाजी ब्रिगेडच्या पाच शाखा उघडण्याचे ठरले.पण १ जानेवारी १९९९ ला प्रत्यक्ष तीनच शाखा स्थापन झाल्या.एक नंबर नाथ चौक येथे व दोन इतर ठिकाणी.एवढे सगले होउनही शनीभक्ति अखंड सुरु राहिली.आयुष्यातिल पहील भाषण अर्ध्या मिनटाचे,दुसरे  भाषण एक मिनटाचे व तीसरे भाषण पाच तासाचे.त्याच दरम्यान शनीला जात असताना सुरेश गणेशकर साहेबांची ओळख झाली.व सतत चर्चा,विचार,वाचन सुरु  झाले.त्यातच शनी अमावसेला शनीशिगनापुरला गेलो.तिथल्या घराना दारं,खिडक्या नसल्याचे पाहून व तिथे चोरी होत नाही असे ऐकून मन प्रसन्न झाले.पण इकडे मा.म.देशमुखांच्या पुस्तकाचा फडशा पडत होता.व एक दिवस त्यातच प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा असे वाचनात आले.व चिकित्सा सुरु झाली.मांजर आडव जाते त्याची,शनिवारी दाढ़ी कटिंग न करण्याची.त्यातच पुन्हा शनीशिगनापुरला गेलो.पण या वेळेला सोबत चिकित्सा घेउन गेलो.आणि तेथे गेल्यावर तिथली हरामखोरी पाहून थक्कच झालो.संपूर्ण शनीशिगनापुरात दारे नाहीत.खिडक्या नाहीत.कुलुप घालणे अशुभ.अशा शनीशिगनापुरात शनीच्या दक्षिणा पेटिला भले मोठे कुलुप.तेव्हाच शनीची लायकी कळली.म्हणजे आमच्या बहुजनाची संपत्ति विना दारं-खिडक्यांची वार्र्यावर व भटा-ब्राह्मनांचे हितसंबंध  मात्र कुलुपात.वारे शनी..!तसा तडक घरी आलो व शनीचा फोटो पालथा घातला.
                      संभाजी ब्रिगेड मध्ये मी आणि माझ्यात संभाजी ब्रिगेड केव्हाच एकरूप झाली होती.कार्यकर्ता,शहर उपाध्यक्ष,शहर व तालुका  अध्यक्ष एकचवेळी व आता तालुका अध्यक्ष.या जबाबदार्या पार पडल्या व अद्यापही पार पाडत आहे.पंढरपुर शहर व तालुक्याचा प्रवास आता एका वेगळ्या दिशेने सुरु झाला आहे.मला माहित नाही माझी यात काय भूमिका आहे ? पण एक मात्र नक्की हा विचार बहुजन समाजाला तारनारा विचार आहे.माझ्या आयुष्यातिल महत्वाची घटना म्हणजे भांडारकर प्रकरण....!
                        राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना  प्ररेणास्थान मानून जगामध्ये एका नवीन धर्माचा उदय होत आहे.तो म्हणजे शिवधर्म ! १२ जानेवारी २००५ रोजी कोट्यावधी बहुजन समाज हिंदू धर्माचा त्याग करुन शिवधर्माची दीक्षा घेणार आहे.म्हणजेच देशाच्या सांस्कृतिक,धार्मिक इतिहासात एका नव्या क्रांतिला सुरवात होत आहे.आणि मी त्या क्रांतिचा एक सच्चा वारसदार आहे.पण या देशातील सडक्या मेंदूच्या समाजातून शिवधर्म जननी जिजाऊंचीच बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले ! एप्रिल-मे २००३ मध्ये जेम्स लेन लिखित 'शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या नावाचे पुस्तक प्रकाशित झाले.साप्ता.चित्रलेखा मध्ये त्यातील तो वादग्रस्त मजकुर वाचण्यात आला.मी त्वरित संभाजी ब्रिगेडच्या वार्षिक सभेमध्ये पुस्तकांचा निषेध नोंदवला व पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणारे पाच हजार निवेदन पत्र मुख्यमंत्री व ग्रहमंत्री यांना पाठवण्यात आली.तरी पण कृति शुन्य ! मग मात्र एक दिवस ठोस पाऊल उचलन्याचे ठरले.त्याप्रमाणे मी,किरण आटकले,संदीप जाधव,पिंटू आटकले,शिवाजी चव्हाण,रमेश कदम,दत्ता ताड,सचिन कोले इत्यादी ४ जानेवारी २००४ ला रात्री   पंढरपुरातुन निघलो.ठरलेल्या ठिकाणी इतर सर्वजन जमन्या अगोदर आम्ही पोहचलो.रात्री १२ वाजल्या पासून पहाटे २ वाजे पर्यंत सर्वाना मी सुचना व माहिती दिली.सकाळी ६ वाजता ठिकान सोडले.आणि.....११ वाजून ५   मिटानी भटाचा भांडारकर अड्डा उदवस्त केला.
                          वादग्रस्त पुस्तक लिहले जेम्स लेनने आणि  कारवाई केली भांडारकरवर असे का ?या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ लागले.त्याला करणेही तशीच होती.मुलामध्ये या पुस्तकाचा लेखक जेम्स लेन हा पुण्यामध्ये बराच काळ राहिला होता.पुस्तक प्रकाशित झाल्या नंतर दै.सामना मधून अनंत देशपांडे यांनी पुस्तकाचे कौतुकपूर्ण परिक्षण लिहले होते.बाबा पुरंदरेने सोलापुर जनता बैंक व्याख्यानमाले मध्ये पुस्तक संग्रही ठेवण्याचा आग्रह केला होता.अशा प्रकारे पद्धतशिरपणे पुस्तकाला लोकमान्यता मिळवून देण्याचा इथल्या ब्राह्मणवाद्याचा डाव होता.पण आम्हाला माहित होते.भांडारकर या संस्थेशी संबंधित बारा भटानीच जेम्स लेनला ही सर्व विकृत माहिती पुरवली आहे.म्हणून या सर्वाचे तोंड उघडण्यासाठी आम्हला भांडारकरचे नाक ठेचावे लागले.विशेष म्हणजे भांडारकरवर कारवाई केल्या नंतर कोणीही मागे न हटन्याचे ठरले होते.त्या प्रमाणे आम्ही आमचे काम करुन पोलिसाची वाट पाहत बसलो होतो.अर्थात जय जिजाऊ ! जय शिवराय !! व भांडारकर तो झांकी है,शनिवारवाडा बाकि है !!!या घोषनानी सर्व पुणे दुमदुमून गेले होते.सर्वाना वाटत होते.आपल्याला लगेच सोडतील.पण मला एकच माहित होते की आपण  ब्राह्मणवाद्याच्या सांस्कृतिच्या चिंधडया उड़वल्या आहेत.आपली सुटका आता लवकर नाही. 
                         सर्वप्रथम आम्हाला डेक्कन जिमखाना पोलिस चौकीत टेंपो,पोलिस व्ह्यन इ.मधून नेहन्यत आले.त्या नंतर तेथील मुख्य साहेबांनी आमच्यातील प्रमुख कार्यकर्त्याना बोलवून आमच्या  कडून माहिती घेतली.आम्हाला चहा पाजुन आमची रवानगी फरासखाना पोलिस चौकिला केली.फरासखाण्यात सर्वाना एका कमी उजेडाच्या मोठ्या लोकअप मध्ये कोबण्यात आले.प्रत्येक अधिकारी येऊन दमबाजी करू लागला.पण 'जो बामन से नही डरे,क्या वो पोलिस से डरेगे ?'तर नाही. पोलिसाच्या दमबाजिला चेष्टा मस्करीतुन उत्तरं देण्याचा रमेश कदमने सपाटा लावला.रात्र केव्हा झाली कलेच नाही.अत्यंत अस्वच्छ व कुबट वासाच्या त्या कोठडीत धड नीट झोपताही येत नव्हते.त्याच वेळेस जेलचे जेवन आले.जेवण घेउन येनार्याला सर्वजन मामा म्हणत होते.आणि मामा बनवत ही होते.पहिल्या दिवशी जेवणाचा पहिला घास खाल्ला आणि मळमलायला लागले.तेव्हा कळले लोक जेलला का भितात ?पोलिसाच्या मारहानिला नव्हे तर बेचव जेवनाला लोक भितात.जे जेवन जनावरे सुद्धा खाणार नाहीत.असे अन्न खाण्याची पाली आली.तेव्हाच घरच्या जेवणाची पात्रता समजली.दुसर्या दिवशी सकाळी आंघोलीसाठी बाथरूम मध्ये गेलो तर संडास व बाथरूम दोन्ही एकच.आणि फरासखाण्याचे संडास म्हणजे शनीशिगनापुरची घरे...!'निर्ल्ल्जम सदा सुखी' म्हणतात त्याप्रमाणे  दिनक्रम सुरु झाला.तोपर्यत पेपर वाचावयास मिळाला.तसे आरोपी लोकाना पेपर वाचण्यास देत नाहीत.पण आम्ही सर्वजन राजआरोपी.अकरा वाजता आम्हाला कोर्टात नेले.व संध्याकाली परत फरासखाण्यात आणले.परत तेच बेचव जेवण आणि तोच मामा.रात्री उशिरा काही पोलिस आले.व मला आणि इतर तिघांना घेउन डेक्कन पोलिस स्टेशनला आले.रात्री उशिरापर्यत आमचा चौघाचा जबाब नोंदवन्याचे आला.शेवटचा प्रश्न असायचा.कशासाठी केले हे सर्व ?आमचे सर्वांचे समान उत्तर होते.जिजाऊंच्या बदनामिचा बदला घेण्यासाठी व पुढील काळात बहुजन समाजाच्या माता-भगिनिच्या अब्रू रक्षणासाठी  ! पण पोलिसाना हवी असलेली माहिती कदाचित मिलत नव्हती.म्हणून ते दमबाजीची भाषा वापरत होते.पण आम्ही जरा सुद्धा विचलित झालो नाही.शेवटी आमच्यासाठी राईसप्लेट मागवल्या.वरुण पोलिसाच्या शिव्या खात आम्ही राईसप्लेटचा फडशा पडला.
                          त्यानंतर आम्हा चौघाना पोलिसनी फरासखाण्याला न नेहता खडकिला नेहले.खडकिचे पोलिस  स्टेशन म्हणजे ओसाड गावची पाटीलकी !चहाचा गाडा एक किमी अंतरावर होता.पण फरासखाण्यापेक्षा इथली कोठडी लहान होती.आणि आमच्या आधी तिनजन पाहुने होते. खाली अंतरायला सतरणजीच्या मळकट कळकट पट्ट्या व पंघरायला ढेकुनयुक्त वाकळ !मग काय मज्जाच मजा !रात्री झोप लागेना म्हणून त्या तिन मुस्लिम आरोपीना बहुजन चळवळीचे  महत्व पटवून देत बसलो.थोडक्यात केडर केम्प घेतला. पोलिस सुद्धा मन लावुन आमच्या गप्पा ऐकत होते.दुसर्या दिवशी पुन्हा तोच मामा आणि त्याचे तेच जेवण.रात्री परत एका जगताप नावाच्या आरोपीला आमच्या कोठडीत कोडले.तोपर्यत पहिल्या तिघाना सोडून दिले होते.मग या भाईशी चर्चा चालू झाली.आम्ही भांडारकर तुडवलं हे ऐकल्यावर त्याला आनंद झाला.हा पहिला माणुस आम्हाला शुभेच्छा देणारा भेटला होता.एका तासात त्या व्यक्तीला सोडून देण्यात आले.पण त्या माणसाने मात्र आमच्यासाठी पेस्ट व साबन पाठवून दिले.मग बर्याच दिवसानी आंघोळ केली.अंग मोकले झाले.मग मामाचे जेवण चवदार लागु लागले.एक एक दिवस पुढे सरकत होता.समोरच्या भिंतीवरचा जंगली महाराजाचा फोटो आम्हाला कार्टून वाटत होता.रोज आरोपी बदलत होते.त्या आरोपीचे जेवण जेवन्यास आम्ही सर्वजन त्यांना मद्दत करत होतो.पुन्हा एक दिवस पोलिस आले.व आम्हाला कोर्टात घेवुन गेले.आणि आता आमची सर्वाची रवानगी येरवडा कराग्रहात करण्यात आली.
                         ऐतिहासिक पार्श्वभूमि लाभलेल्या येरवडा काराग्रहा समोर आमची गाड़ी थाबली.त्या गाडीच्या जालीतुन बाहेर पाहिले तर आमचे सर्वाचे मित्र भेटण्यासाठी आली होते.थोड्या वेळाने एका एकाची तपासणी करुन आतमध्ये सोडण्यात आले.आतमध्ये गेल्या गेल्या एक झोपण्यासाठी पट्टी व दोन पांढर्या सूती घोंगडयासह एक जर्मनचा मग,एक मोठी वाटी देण्यात आली.व आमची सर्वाची म्हणजे ७२ जनाची रवानगी किशोर विभागात करण्यात आली.आमच्या आधी त्या हॉलमध्ये १०० ते १२५ कैदी होते. भिंतीच्या एका बाजूला लागुन आम्हाला जागा करुन देण्यात आली.सर्वजन एकत्र आल्यामुले काहीजनावरचा ताण मोकला झाला व गप्पा मारन्यास जोर चढला होता.रात्री सर्वाना रांगेत बसवून तिथल्या जुन्या कैद्यांनी आम्हाला जेवण वाढले. दोन जाडजूड चपात्या,आमटी व थोडासा भात.सर्वानी जेवनावर ताव मारला.कारण पोलिस कस्टडीपेक्षा येरवडयाचे जेवण बरे होते.सोबतीला इतर कैदयां कडून तिखट मिट मिळत होते.रात्री अंताक्षरी सुरु झाली तेव्हा एका कैदयांने जेवणाच्या थाल्या उलट्या टाकुन,'पिवळ्या साडीला हिरवी किनार ग,आज बायांचा आहे मंगलवार ग' ही बहुतेक स्वरचित लावणी म्हटली.मग रमेश कदम त्यावर छानपैकि नाचला.येरवडयातला पहिला दिवस केव्हा संपला समजलेच नाही.बाकीचे कैदी सकाळी सहा वाजता शेती कामासाठी जात होते.व संध्याकाली माघारी येत होते.माघारी आले की पुन्हा तेच नाच-गाने चाले.पण रात्री फक्त दहा वाजेपर्यतच.रोज सकाळी सहा वाजता गिनती म्हणजे मोजणी होत होती. रोज संख्या कमी-कमी होत होती.पण तरीसुध्दा बरीच गर्दी होती.येरवडयात मला रोज कोण ना कोण भेटायला येत होते.कधी पप्पा,तर कधी दादा,रणजीत तर कधी सर्व पंढरपूरातिल मित्र मंडली आणि एक दिवस स्वतः खेडेकरसाहेब भेटायला आले.एक दोन वाक्य बोलुन लगेच निघून गेले.गंगाधर बनबरेसरानी पुस्तके दिली.पण आत मिळालीच नाहीत.एके दिवशी तर लंडनवरून बी.बी.सी ची एक पत्रकार तरुणी मुलाखत घेण्यासाठी आली.पण आम्ही मुलाखत दिली नाही.रोज रात्री बसून आम्ही झोपण्यापूर्वी 'शिव नमो आधी नमन करुया जिजाऊ मातेला'हे आम्हीच रचलेले गीत एकत्र सुरात म्हणत असू.या गीतामुले इतर कैदी सुद्धा प्रभावित झाले.एका माघुन एक दिवस जात असताना पंढरपूरातिल अशोक डोंबे,धोडया, शेवत्याचा एक कैदी,शेगावचा भाकरे कैदी त्याच बरोबर धूला कोलेकर रोजच भेटण्यास येत होते.त्यांच्या मुले वेळ जात होता.मग कधी संपूर्ण येरवडयाचा परिसर फिरने,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गांधीजीच्यात झालेल्या पुणे कराराचे कोठडी पह्न्यास जाणे इत्यादी उद्योग सुरु होते.त्याच दरम्यान आमचा जमीन झामिन झाल्याची बातमी आली.सर्वजन नाचू लागले.पण इतर सर्व कैदयांचे चेहरे मात्र पडले.कारण रोज दोन पार्ट्या करुन चालणारी अंताक्षरी आता बंद पडणार होती.शेवटच्या दिवसामध्ये मी सर्वाचा केडर केम्प घेतला होता.त्या मुले सर्वच कैदी प्रभावित झाले व शनिवारवाडा आता आम्हीच बाहेर आल्यावर पडतो म्हणाले,त्याच्या या वाक्याने जग जिकल्याचे समाधान मिळाले.काहिजनानी आमचे पत्ते लिहून घेतले.अशोक दादा  डोंबेनी सर्वाना काय पाहिजे,काय नको.ते पाहिले.शेवटी एकदाचा जमीन झाला.व आम्ही येरवडयातुन भलीमोठी अनुभवाची शिदोरी घेउन बाहेर पडलो.बाहेर पडताना एकच निर्धार झाला,तो म्हणजे -चला एकच शिवनिर्धार करू ! भट मुक्त राष्ट्र निर्माण करू !!
                                                        जय जिजाऊ ! जय शिवराय !! 
*सदर लेख संक्षिप्त स्वरूपात आहे.भांडारकर प्रकरणाची केस पुणे कोर्टात चालू आहे.केस संपल्यावर "एका आंतरराष्ट्रिय षड्यंत्रचा पर्दाफाश:''आम्ही तुडवलं भांडारकर'' हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.

4 comments:

  1. aapla hardik abhinanadan
    SHIVASHRI AMARJEET PATIL,
    aapan aapla jiavan sarthaki kelat aapanas ashi suvarnsandhi chalun aali
    aai jijaunchya apmanacha aapan badla ghetlaat

    ReplyDelete
  2. या तुमच्या कार्याचा सार्थ अभिमान वाटतो सर..

    ReplyDelete