Wednesday, January 5, 2011

गांधीहत्येमागचा मास्टरमाइंड ? 27 May 2008, महारास्ट्र टाइम्स

मणिशंकर अय्यर यांनी उकरून काढलेल्या वादानिमित्त महात्मा गांधींच्या हत्येतील सहभागाविषयी बरीच वादावादी झाली होती. तेव्हा ‘ आऊटलूक ’ ने केलेली ‘ वीर सावरकरः द इनसाइड स्टोरी ’ ही कव्हरस्टोरी खूप गाजली होती. ज्येष्ठ पत्रकार राजेश रामचंद्रन यांनी नॅशनल अर्काइवजमधील रेकॉर्डसच्या आधारे घेतलेला हा शोध आम्ही मराठीत देत आहोत.

यशस्वी होऊन या...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची निर्घृण हत्या करणारा नथुराम गोडसे आणि या कटातील त्याचा साथीदार नारायण दत्तात्रय आपटे यांना मिळालेला हा आशीर्वाद.. !

आणि हा आशीर्वाद दिला होता दस्तुरखुद्द विनायक दामोदर सावरकर यांनी...             

दिल्लीच्या संसद भवनापासून जेमतेम दोन किलोमीटर अंतरावर ‘ नॅशनल अर्काइवज् ऑफ इंडिया ’ ची नव्याने बांधलेली इमारत आहे. या वास्तूत अनेक गाजलेल्या खटल्यांशी संबंधित जुनीपुराणी कागदपत्रे जतन करुन ठेवण्यात आली आहेत. त्यातच गांधी खून खटल्याशी संबंधित कागदपत्रेही उपलब्ध आहेत. पोलिसांनी नोंदविलेले जाबजबाब , साक्षीदारांच्या साक्षी आणि स्पेशल ब्रँचचे गोपनीय अहवाल असा सगळा दस्तावेज याठिकाणी आहे. त्यांची छाननी केल्यानंतर एक गोष्ट अगदी स्वच्छ आणि स्पष्ट दिसते ती म्हणजे गांधीजींच्या हत्येच्या कटात सावरकर यांचा असलेला सहभाग. महात्मा गांधींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेचे ते केवळ निकटवर्तीय नव्हते , तर या हत्या कटात त्यांचा उघड सहभाग होता , असं या कागदपत्रांवरून स्पष्ट होते. ३० जानेवारी १९४८ साली गांधीजींची हत्या झाल्यानंतर ज्या आठ आरोपींवर खटला चालला त्यापैकी सावरकरही एक होते.

या ऐतिहासिक दस्तावेजांची पडताळणी केल्यानंतर जी माहिती मिळते ती अशी....

गोडसेचे गुरू : गांधी हत्या प्रकरणी विशेष न्यायालयात जी सुनावणी झाली , त्यामध्ये नथुराम गोडसे याने २८ फेब्रुवारी १९३८ रोजी सावरकरांना लिहिलेले पत्र पुराव्यासाठी सादर करण्यात आले होते. गांधीजींची हत्या करणारा गोडसे अनेक वर्षांपासून सावरकरांना ओळखत होता , हे त्यावरुन स्पष्ट होते. हिंदूराष्ट्राची उभारणी या समान विचारसरणीचा ध्यास घेतलेले सावरकर आणि गोडसे यांचे संबंध गुरू-शिष्य असे होते.                                                                   
सावरकर हिंदूमहासभेचे अध्यक्ष झाल्यानंतर गोडसेने त्यांना हे सविस्तर पत्र पाठवले होते. त्या पत्राचा आशय असा होता - “ रत्नागिरीतून तुमची सुटका झाल्यापासून सर्वांच्या मनात धगधगते अग्नीकुंड पेटले आहे. हिंदुस्थान हे केवळ हिंदूंसाठीच असावे , अशी मनापासून इच्छा बाळगणा-यांना नवी स्फूर्ती मिळाली आहे. हिंदूमहासभेचे अध्यक्षपद स्वीकारताना आपण जे भाषण केले , ते ऐकल्यानंतर आता हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणे फारसे अवघड राहिलेले नाही , याची खात्री पटते. ” आपण एक राष्ट्रीय स्वयंसेवक आर्मी स्थापन केली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५० हजार कार्यकर्ते त्यासाठी सज्ज आहेत , असा उल्लेखही त्या पत्रात आहे. हिंदूंच्या हितरक्षणासाठी लढणारांना सावरकरांनी मार्गदर्शन केले पाहिजे , अशी गोडसेची इच्छा होती.                

तत्कालिन बॉम्बे प्रांताच्या स्पेशल ब्रँचचे पोलिस उपायुक्त जमशेद नगरवाला यांनी गांधी हत्या कटाचा तपास केला होता. आपल्या अहवालात नगरवाला म्हणतात की , “ सावरकरांची राजकीय विचारसरणी गोडसेने १९३५ सालापासूनच अंगिकारली होती. गोडसेने १९३० साली रत्नागिरीत रा. स्व. संघाची शाखा उघडली होती. ”

गोडसेंची सावरकरांवर एवढी भक्ती होती की , आपल्या वर्तमानपत्राच्या मास्टहेडमध्ये (शीर्षस्थानी) त्याने सावरकरांचा फोटो छापला होता. हिंदूराष्ट्र प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणा-या अग्रणी नावाच्या वृत्तपत्राचा गोडसे संपादक , तर सह आरोपी नारायण आपटे हा मॅनेजर होता. सावरकरांनी दिलेल्या १५ हजार रुपयांच्या भांडवलावरच हे वृत्तपत्र सुरु करण्यात आले होते.        

सावरकरांचा सहकारी गोडसे : गोडसेने सावरकरांसोबत बराच काळ एकत्र काम केले होते. १९४६ साली त्याने सावरकरांना लिहिलेल्या पत्रावरून त्यांचे हे संबंध स्पष्ट होतात. दिल्लीचे शेठ जुगल किशोर बिर्ला यांच्याकडून सावरकरांना एक हजार रुपयांचा चेक मिळाला. तो चेक सावरकरांनी गोडसेला दिला. या व्यवहाराची माहिती त्या पत्रात नमूद करण्यात आली आहे.

पोलिस रेकॉर्डनुसार , गोडसे आणि आपटे सावरकरांचे एवढे जवळचे होते की , अनेकदा ते दोघे त्यांच्यासोबत प्रवास करत. गांधी हत्येच्या पाच महिने आधी , ऑगस्ट १९४७ मध्ये त्यांनी सावरकरांसोबत शेवटचा प्रवास केला होता. गांधी हत्येच्या कटात आपला हात असल्याचा सावरकरांनी निक्षून इन्कार केला असला तरी , ते गोडसेचा नेहमीच आदरार्थी उल्लेख करीत राहिले. त्यांनी पोलिसांना ज्या जबान्या दिल्या आणि कोर्टात सुनावणीच्या वेळी साक्षी दिल्या तेव्हा गोडसेचा उल्लेख पंडित नथुराम असा आदराने केला.
गांधी हत्या कटाची माहिती सावरकरांना होती : डीसीपी नगरवाला यांच्या क्राइम रिपोर्टमध्ये बॉम्बे प्रांताचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख आहे. महात्मा गांधींवर २० जानेवारीला झालेल्या पहिल्या हल्ल्याची तपशीलवार माहिती देसाई यांनी नगरवालांना दिली होती. ‘ मला गृहमंत्र्यांनी अशी माहिती दिली की , महात्मा गांधींवर २० जानेवारी १९४८ रोजी जो प्राणघातक हल्ला झाला. त्यामध्ये मदनलाल , त्याचा सहकारी करकरे आणि इतरांचा हात होता. दिल्लीत गांधीजींवर हल्ला करण्यापूर्वी मदनलाल आणि करकरे यांनी सावरकरांची भेट घेतली होती ’, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली , असा उल्लेख नगरवालांच्या अहवालात आहे.

              सावरकरांना गांधी हत्या कटाची संपूर्ण माहिती होती , अशी माहिती नगरवालांना मिळाली होती. आपल्या रिपोर्टमध्ये ते नमूद करतात - ‘ सावरकरांच्या प्रेरणेने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गांधी हत्येचा कट आखण्यात आला होता , अशी माहिती माझ्या सूत्रांनी मला दिली. मी आजारी आहे आणि राजकारणाशी माझा संबंध उरलेला नाही , असा सावरकरांनी घेतलेला पवित्रा ढोंग आहे.... त्यामुळेच सावरकरांच्या राहत्या घरावर वॉच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ’

गांधी हत्येचा कट आखणा-यांमध्ये सावरकरांच्या विचारसरणीला मानणा-यांचा तसेच नाराज शीख विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे नगरवाला यांनी अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित हिंदू राष्ट्र दल या संघटनेचे लोक सावरकरांना मानणारे आहेत. त्यांची आणि नाराज शीख कार्यकर्त्यांची एक गुप्त बैठकही झाली होती. स्वतः सावरकर यांनी कोर्टात दिलेल्या साक्षीत गोडसे , आपटे आणि इतर गांधी हत्या कटातील आरोपी हिंदू राष्ट्र दलाचे कार्यकर्ते होते , अशी कबुली दिली होती.

गांधी हत्या कटात सावरकरांची भूमिका : महात्मा गांधींवर २० जानेवारी रोजी मदनलाल पाहवा नावाच्या पंजाबी निर्वासिताने पहिला प्राणघातक हल्ला केला. नवी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधींच्या प्रार्थनेनंतर त्याने स्फोट घडवला. त्याला तत्काळ अटक करण्यात आली. मदनलालला ओळखणारे मुंबईच्या रुईया कॉलेजचे डॉ. जगदीश चंद्र जैन यांनी दुस-याच दिवशी सायंकाळी ४ वाजता बॉम्बे प्रांताचे तत्कालीन पंतप्रधान बाळासाहेब खेर यांची भेट घेतली. खेर यांनी गृहमंत्री मोरारजी देसाई यांनाही बोलावून घेतले. ‘ मी त्यांच्या रुममध्ये गेलो. माननीय पंतप्रधानांनी डॉ. जैन नावाच्या व्यक्तीशी माझी ओळख करुन दिली. वृत्तपत्रामध्ये त्या व्यक्तीने स्फोटाची बातमी वाचली , तो स्फोट घडविणा-या मदनलाल नावाच्या माणसालाही आपण ओळखतो , मला त्या व्यक्तीची चांगली माहिती आहे आणि ती द्यायची आहे , असे डॉ. जैन यांनी सांगितले... ’ असे मोरारजींच्या जबानीत नमूद करण्यात आले आहे.                                                       
                                                                                                          
मोरारजींच्या जबानीनुसार , जैन यांना त्या कटाची संपूर्ण माहिती होती. ‘ मदनलाल आणि त्याच्या काही मित्रांनी जैन यांना सांगितले होते की , ते एका बड्या राजकीय नेत्याची हत्या करणार आहेत. तो नेता म्हणजे महात्मा गांधी असल्याचे मदनलालने जैन यांना सांगितले होते... अहमदनगरला त्याच्यासोबत काम करणा-या करकरे नावाच्या मित्राची मदनलालने ओळख करुन दिली.... मदनलालने पुढे सांगितले की , करकरे त्याला घेऊन सावरकरांना भेटायला गेला होता. जवळपास दोन तासांहून अधिक काळ त्यांच्यात चर्चा झाली. मदनलाल जे काही करत आहेत , त्याबद्दल सावरकरांनी त्याला शाबासकीही दिली. त्यांनी मदनलालची पाठ थोपटली आणि मोहिम फत्ते करा , असे सांगितले. ’
बडगेंची महत्त्वपूर्ण जबानी : नगरवालांनी या प्रकरणाचा तपास करताना दिगंबर रामचंद्र बडगे नावाच्या माणसाला अटक केली. या बडगेनेच गोडसेला स्फोटके दिली होती. गोडसेने ती मदनलालला दिली. नंतर बडगे माफीचा साक्षीदार बनला आणि सरकारी पक्षाचा मुख्य साक्षीदार झाला. गांधी हत्या कटात सावरकरांचा कसा सहभाग होता , याची धक्कादायक वस्तुस्थिती बडगेने कोर्टात साक्ष देताना सांगितली.
                                                                                                    
बडगे हिंदू महासभेचा कार्यकर्ता होता. छोट्या शस्त्रांचा तो व्यापार करत असे. ९ जानेवारी रोजी आपटे आणि मदनलाल त्याच्याकडे गेले आणि त्यांनी गट कॉटन स्लॅबची (स्फोटक) मागणी बडगेकडे केली. दुस-या दिवशी आपटे बडगेला घेऊन दलाच्या कार्यालयात गोडसेला भेटायला गेला. दोन गन कॉटन स्लॅबस् , पाच हातबॉम्ब आणि दोन रिवॉल्वर्सची ऑर्डर बडगेला देण्यात आली. त्यासाठी पाहिजे ती किंमत देण्याचे आश्वासन गोडसेने दिले. मात्र ही शस्त्रसामुग्री बडगेने मुंबईत पोहोचती करायची , अशी अट घालण्यात आली. हिंदू महासभेच्या दादरच्या ऑफिसमध्ये आपटेला १४ जानेवारीला ती डिलिवरी हवी होती. बडगेने हत्येमागचा हेतूही पोलिसांना सांगितला. ‘ आपटेने मला विचारले की , आमच्यासोबत दिल्लीला यायची तुझी तयारी आहे का ? मी कशासाठी , अशी विचारणा केली. तेव्हा आपटे म्हणाला की , ‘ तात्याराव ’ म्हणजे सावरकरांनी गांधीजी आणि जवाहरलाल नेहरु यांना संपविण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे काम त्यांनी माझ्याकडे सोपविले आहे. ’

बडगे १७ जानेवारीला पुन्हा सावरकर सदनात गेला. ‘ तेव्हा गोडसे म्हणाला की , आपण सगळ्यांनी बाहेर पडण्यापूर्वी तात्यारावांचे शेवटचे दर्शन घेतले पाहिजे. आपटे , गोडसे , शंकर आणि मी टॅक्सीत बसलो आणि शिवाजी पार्कला सावरकर सदनाच्या दिशेने निघालो. मुख्य जंक्शनवरच टॅक्सी थांबवण्यात आली. आम्ही चौघे खाली उतरलो आणि समोरच्या बोळातून चालत सावरकर सदनात जाऊन पोहोचलो. जंक्शनपासून ती दुसरी बिल्डिंग होती. मला खालीच थांबायला सांगण्यात आले. आप्पा कासार आणि दामले तिथे होते. आपटे आणि गोडसे सावरकरांच्या दर्शनासाठी वर गेले. पाच किंवा दहा मिनिटांनी ते खाली उतरले. सावरकरही त्यांच्यापाठोपाठ खाली आले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. यशस्वी होऊन या... ’

सावरकर सदनातून परतताना आपटे बडगेला म्हणाला , ‘ गांधीजींची शंभरी भरली आहे , असे तात्यारावांचे भाकित आहे. ’ आपटेचे हे वाक्य आणि सावरकरांचे माझ्या कानांनी ऐकलेले आशीर्वाद यावरुन माझी खात्री पटली की , जे काही घडले त्याला तात्यारावांची मान्यता होती आणि त्यांचा त्यास आशीर्वादही होता. ’ गोडसे आणि आपटे दिल्लीला गेले. बडगे आणि शंकर दिल्लीला १९ जानेवारीला जाऊन पोहोचले. त्याठिकाणी हिंदू महासभेच्या कार्यालयात गोपाळ गोडसे , करकरे आणि मदनलाल यांना भेटलो.

गन कॉटन स्लॅब पेटवायचा , त्यातून गोंधळाची स्थिती निर्माण करायची आणि नंतर हातबॉम्ब फेकायचे , असा कट आखण्यात आला होता. मदनलालने स्फोटके पेटवली , परंतु बडगे आणि त्याच्यासोबत असलेल्या शंकरला हातबॉम्ब फेकता आले नाहीत. त्यामुळे हा कट फसला. खरं तर अनोळखी व्यक्तींच्या हातून हे काम करुन घेण्याचा आपटे आणि गोडसेचा खरा हेतू होता. मात्र तो फसल्याने शेवटी आपटे आणि गोडसेलाच हे काम स्वतः उरकावे लागले.

सावरकरांची निर्दोष मुक्तता का झाली ? : न्यायमूर्ती आत्मा चरण यांच्या कोर्टात जो खटला चालला , त्यात सर्व आठ आरोपींवर पहिला आरोप होता तो त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचल्याचा. उल्लेखनीय बाब म्हणजे , सावरकरांचा अपवाद वगळता अन्य सर्व आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले. तर बडगेने दिलेले साक्षीपुरावे तपासून घेण्यासाठी अन्य कोणताही पुरावा नसल्याच्या तांत्रिक मुद्यावरुन सावरकरांची मात्र कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.

तरीही , बडगे हा विश्वासू साक्षीदार असल्याचे कोर्टाचे मत होते. २० जुलै ते ३० जुलै १९४८ असे जवळपास दहा दिवस त्याची साक्ष आणि उलट तपासणी कोर्टात झाली. “ बडगेने त्याला असलेली सगळी माहिती परखडपणे कोर्टात सांगितली. उलट तपासणीतही त्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली , कोणत्याही प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला नाही. ” परंतु तरीही न्या. आत्मा चरण यांनी सावरकरांना दोषी ठरवले नाही. कारण सरकारी बाजूने सर्व भिस्त बडगेच्या साक्षी पुराव्यावरच बेतलेली होती.

गांधी हत्या कटातील दोन्ही प्रमुख आरोपी सावरकर सदनात गेले होते , हे तर जगजाहीरच होते. तत्कालिन ख्यातनाम अभिनेत्री शांताबाई मोडक यांनीही साक्ष देताना , गोडसे आणि आपटे आपणाला पुणे एक्स्प्रेसमध्ये भेटले. १४ जानेवारीला त्यांना मी सावरकर सदनाजवळ सोडले , अशी माहिती दिली. १७ जानेवारीला आपटे आणि गोडसे शिवाजी पार्कला सावरकर सदनाजवळ माझ्या टॅक्सीतून उतरले , अशी साक्ष टॅक्सीचालक ऐतप्पा कोटियन यानेही दिली.

“ सावरकरांची गांधी हत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्याच्या कनिष्ठ कोर्टाच्या आदेशाला सरकारी पक्षाने हायकोर्टात आव्हान दिले नाही. त्यामुळे हायकोर्टात हे प्रकरण कधीच रिओपन झाले नाही ,” असे मत शिमला हायकोर्टाचे न्या. जी. डी. खोसला यांनी व्यक्त केले आहे. खोसला यांनी साक्षीदार बडगेचे कौतुक केले. “ बडगेने त्याच्याकडे असलेली संपूर्ण माहिती तपशीलवार कोर्टात सांगितली. माझे असे मत आहे की , त्याने सांगितलेली सगळी माहिती सकृतदर्शनी खरी वाटते ,” अशी पुस्तीही न्या. खोसला यांनी जोडली.

कपूर आयोगाचा निष्कर्ष : गांधी हत्येनंतर तब्बल वीस वर्षानंतर न्या. जीवन लाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली गांधी हत्येच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करण्यात आला. बडगेने दिलेली साक्ष ही सावरकरांचे अंगरक्षक आप्पा रामचंद्र कासार आणि गजानन विष्णू दामले यांच्या जबानीशी सुसंगत आहे , असे मत न्या. कपूर आयोगाने नोंदविले. परंतु न्या. कपूर आयोगाचा निष्कर्ष असा होता की , “ सर्व वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मिळालेली माहिती तुटक तुटक अवस्थेत आहे. सावरकर आणि त्यांच्या ग्रुपने हत्येचा कट आखल्याचे त्यावरुन स्पष्ट होत नाही. ”

(अनुवाद - आऊटलुक , ६ सप्टेंबर २००४ मधील लेखाचा)

5 comments:

  1. १. हे अनिवार्य नाही कि, आशिर्वाद ह्याच कारणासाठी दिला पाहिजे.

    २. पंडित आणि तात्याराव ह्यांचे गुरू-शिष्याचे नाते म्हणजे अर्जून-द्रोणाचार्याचे नाते. १९२४ साली प्रथम गोडसे सावरकरांना भेटले, त्यांच्या विचार आणि कार्याचा प्रभाव गोडसेंवर पडलेला होता. गांधींचे मुस्लिमधाजिर्णे धोरण हिंदुस्थानला मारक ठरत होते आणि तत्कालीन मुस्लिम बर्हेदेशिय निष्ठा बाळगून देशात राहत होते. (पूर्वी खिलाफत चळवळ आणि नंतर पाकिस्तान)
    त्यांना इतर मुस्लिमेत्तर वर्गावर वर्चस्वाची आणि आत्मशरणागतीची तप्त मुद्राच ठोकायची होती. म्हणून सावरकरांनी हिंदुस्थान हिंदुंचा असा आग्रह धरला. मग ह्यामध्ये गैर मानायचे कारण काय ? फक्त सावरकर, गोळवलकर गुरूजी, डॉ. मुंजे ह्यांचा जीव हिंदूंसाठी तुटत होता. हिंदु-मुस्लिम एकता टिकवण्यात अपयश आल्याचे गांधीजींनी कबूल केले आणि म्हणाले, मला अपशय आले. पण हिंदूंनी स्वताचे लक्षावधी तुकडे करून घेतले तर मुस्लिमांचे हृदयपरिवर्तन होईल ! जर सावरकर नसते तर जिना आणि सु-हावर्दींनी हिंदू समाजाचे समुळ उच्चाटन केले असते, त्याचबरोबर भारतही इस्लामी राष्ट्र झाले असते. नंतर गोडसे ह्यांना रा. स्व. संघ आणि सावरकर ह्यांचे नेतृत्व म्हातारे वाटू लागल्यावर स्वताची हिंदुराष्ट्रदल ही संघटना काढली. गांधीजींची हत्या करण्यापूर्वी त्यांनी संघ सोडला होता. सावरकरांनी भलेही गोडसेंना वृत्तपत्रासाठी अर्थसहाय्य केले असले तरी त्यांनी स्वताहून कधीच त्यामध्ये
    लिखाण केले नाही. मूलनिवासी नायक ह्या वृत्तपत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा फोटो अजूनही छापतात. मग त्यातल्या लेखासाठी बाबासाहेबांना स्वर्गात जाऊन जवाबदार धरायचे का ?

    ३. गांधीहत्येची योजना गोडसे एकटेच बनवू शकत होते. गोडसेंना वाचनाचा भयंकर नाद होता आणि त्यांची स्मरणशक्ती, प्रगल्भ बुध्दीमत्ता, बोलण्याची पध्दत पाहूनच त्यांना "पंडित" ही पदवी बहाल केली.

    ४. २० जानेवारी रोजी बापूंवर हल्ला झाला तेंव्हा त्यांच्यावर गोळी झाडायचे काम बडगेला दिले होते, पण तो पळून गेला. जर तो सावरकरांच्या आदेश पालनसाठी प्राण पणाला लावू शकत होता तर पळून का गेला ?
    जी साक्ष बडगे ह्याने दिली ती पोलिसांनी तयार केली होती आणि बडगे मरायला खूप घाबरत होता म्हणून माफीचा साक्षीदार झाला.
    चर्चा चालू असताना बडगे तिथे उपस्थित नव्हता त्यामुळे काय बोलणे झाले हे त्याला कळणे शक्यच नव्हते. वर नमूद केल्याप्रमाणे, ह्याच कारणासाठी आशिर्वाद मिळावा हे अनिवार्य नाही. गांधीहत्येच्या दोन वर्षे अगोदरच सावरकर हिंदुमहासभेच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले होते.
    गोडसे आणि इतर प्रभूती हिंदुमहासभेचे सदस्य असल्याने त्यांच्या संपर्कात असणे स्वाभाविकच आहे. २० जानेवारीला मदनलाल ह्याला अटक केल्यावर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीचा नीट उपयोग केला नाही.
    ३० जानेवारी रोजी बिर्ला हाऊस वरच्या पोलिसांनी करकरेंच्याकडून लाच घेतल्याने गोडसेंना गांधीहत्या करणे सोपे झाले.

    ५. तांत्रिक कारण दुरूस्त करून अभियुक्तावर नव्याने खटला भरता येतो !
    हा मुद्दा सामान्य माणसापेक्षा कायद्याच्या परिक्षेत नापास झालेल्या परिक्षार्थ्यास जास्त कळतो. सरकारलाही माहित होते कि, आपला साक्षीदार
    आणि पुरावे तकलादू आहेत म्हणून सरकारने अपील केले नाही.
    द मँन हु किल्ड गांधी मनोहर माळगावकर लिखित पुस्तक आहे. ज्यामध्ये
    बडगेने स्वाताच कबूल केले कि, मी सावरकरांना कधीच भेटलो नव्हतो आणि
    त्यांच्याविरूध्द साक्ष देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला.

    ६. कपूर आयोग हे सरकारचे एक कारस्थान होते, ज्याचा उद्देश गांधीहत्येचा तपास करणे कधीच नव्हता. प्राथमिक अहवाल नोंदणीमध्ये कुठेही रा. स्व. संघाचे नाव नव्हते. नेहरू सरकारने स्वताचे महत्व वाढविण्यासाठी संघावर बंदी घातली. एखाद्या घटनेवर सरकार जेंव्हा आयोग नेमतो तेंव्हा त्या आयोगाचा अहवाल स्वीकारल्यावर न्यायालयात सादर करावा लागतो.
    न्यायालय आणि आयोग ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो.
    न्यायालय निर्णय देण्याचे काम करते आणि आयोग अहवाल सादर करतो.
    कपूर आयोगाचा अहवाल सरकारनेच दाबला. जर सावरकर गांधीहत्येचे सुत्रधार होते तर तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी स्वा. सावरकर
    राष्ट्रीय स्मारकाला १०,००० रूपये देणगी का दिली ?
    सर्व साक्षीदारांनी सांगितले कि, गोडसे आणि आपटे सावरकरांना भेटले आणि त्यांनी आशिर्वाद घेतला. पण एकानेही त्यांच्यात काय बोलणे झाले हे सांगितले का ? पोलिसांनी नीट तपास केला नाही म्हणून सावरकर सुटले अशी टीका करणा-यांना थेट प्रश्न, सुटका झाल्यावर सावरकरांच्यावर सरकार
    आत्मार्पण दिनापर्यंत नजर ठेवून होते. मग त्यांना एकही पुरावा सापडला नाही ? सावरकरांची सुटका निर्दोष व निष्कलंक असूनही टिकाकार खोडलेले मुद्दे उकरून त्यांना दोषी ठरवतात. स्वता कशाला न्यायाधीश होतात ?

    ReplyDelete
  2. १. हे अनिवार्य नाही कि, आशिर्वाद ह्याच कारणासाठी दिला पाहिजे.

  3. १. हे अनिवार्य नाही कि, आशिर्वाद ह्याच कारणासाठी दिला पाहिजे.

  4. विशेष न्यायालयासमोर आप्पा कासार व गजानन दामले ह्याच्या साक्षी कधीच झाल्या नाहीत !

    ReplyDelete
  5. क्रांतिसिंह नाना पाटील हेच खरे स्वातंत्र्यवीर होते

    ReplyDelete