
आता प्रश्न राहतो तो 'राजसंन्यास' या छत्रपती परिवाराची अत्यंत संतापजनक बदनामी करणाऱ्या नाट्यकृतीचा ! सन १९२२ सालाची गडकरी यांची हि नाट्यकृती त्यांचा २३ जानेवारी १९१९ साली मृत्यु झाल्या मुळे अपूर्ण राहिल्याचे सांगितले जात आहे.आज घडीला 'राजसंन्यास' या नाट्यकृतीचे अंक पहिला (प्रवेश१,२,३)अंक तिसरा (प्रवेश १ ) व अंक पाचवा (प्रवेश १,२,३,४,५)हे उपलब्ध आहेत.यातील अंक दुसरा व चौथा उपलब्ध नाहीत.(गडकर्यांच्या मृत्यू मुळे अपूर्ण राहिल्याचे बोलले जात आहे.) पण.........! नेमके हीच बाब संशय निर्माण करणारी आहे.कारण एकतर कोणताही नाटककार जे काही लिहाह्याचे असेल ते सलग लिहील एका आड एक अंक लिहिणार नाही.
पण गडकरी बुवा मात्र कमालच म्हणावे लागतील.कारण त्यांनी एका आड एक अंक लिखाण केले आहे.या सर्व प्रकारला संशय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील दोन उदाहने पाहणे महत्वाचे ठरेल.यातील पहिले उदाहरण म्हणजे 'ज्ञानेश्वरी' ची मूळ प्रत वी.का.राजवाडे यांनी नष्ट केली आणि त्या ठिकाणी बनवत प्रत महाराष्ट्राच्या माथी मारली असे त्यांच्याच जात बांधवांनी नोंदवून ठेवले आहे.दुसरे उदाहरण म्हणजे इतिहास संशोधन ? करीत असताना दत्तो वामन पोतदार यांना पेशव्यांचा कारभारी नाना फडणवीस याने भोगलेल्या 'राखेल्याची' यादी सापडली.पठ्याने चक्क ती यादीच गिळून टाकली.म्हणजे नाना फडणवीस याने रखेल्या नुसत्या भोगल्या पण दत्तो वामन पोतदार याने तर त्या पचवल्या ! याला म्हणतात 'जाती साठी माती (सॉरी) रखेल्या खाणे !'
या प्रकारे महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास ब्राम्हणी हागणदारीने बरबटलेला आहे.यात आता 'राजसंन्यास' या नाटकाची भर पडत आहे.या नाटक बाबत मी स्वत: महाराष्ट्रातील मान्यवर इतिहासकार यांच्या कडून अधिकची माहिती घेतली असता.असे समजले कि 'महाराष्ट्र शासनाने' 'राम गणेश गडकरी समग्र वाड्मय' प्रकाशित केलेले आहे.त्याचे संपादन प्र.के.अत्रे यांनी केलेले आहे.सदर समग्र वाड्मय मध्ये अत्रे यांनी सदर नाटक स्वत: पूर्ण करून छापले आहे.तसेच काहीच्या मते हे नाटक 'बाळ सामंत' या कथाकाराने नंतरच्या काळात पूर्ण केले आहे.पण मला जो मुद्दा सर्वांच्या समोर आणावयाचा आहे तो असा कि,'राजसंन्यास' हे नाटक स्वत: गडकरी याने त्याच्या हयातीतच पूर्ण केले असण्याची शक्यता आहे.कारण त्या काळात या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत.आणि त्याचा पुरावा म्हणजे 'राम गणेश गडकरी समग्र वाड्मय' याची संपूर्ण माहिती देण्यासाठी बनवण्यात आलेल्या http://ramganeshgadkari.com/ या संकेतस्थळावर या 'राजसंन्यास' नाटकाच्या सादरीकर झालेले फोटो उपलब्ध आहेत.
मग प्रश्न असा उरतो कि,आज जे 'राजसंन्यास' अपूर्ण आहे म्हणून दाखवण्यात येत आहे.ते ज्या प्रमाणे नंतरच्या काळात पूर्ण केले गेले असण्याची शक्यता सांगितली जात आहे.तशीच शक्यता पूर्ण असलेले नाटक नंतरच्या काळात 'अपूर्ण' करण्यात आले असण्याची शक्यता का असू शकत नाही ? म्हणजे पूर्ण नाटकातील (आता असणार्या अपूर्ण नाटकातील वादग्रस्त मजकुरा पेक्षा ) जास्त वादग्रस्त मजकूर नंतरच्या कळत कशा वरून वगळण्यात आलेला नसेल ? किंवा नष्ट करण्यात आलेला नसेल.(उदा : ज्ञानेश्वरी ची मूळ प्रत वि.का.राजवाडे याने नष्ट केली व नाना फडणवीस याच्या रखेल्या दत्तो वामन पोतदार यांनी गिळल्या !) या बाबत अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे जेम्स लेन ला विकृत माहिती पुरवली म्हणून एस.एस.बहुलकर या व्यक्तीला पुण्यातील शिवसैनिकांनी काळे फासले होते.त्या नंतर राज ठाकरेने बहुलकरची माफी मागितली त्याच दरम्यान संभाजी ब्रिगेड ने 'भांडारकर' वर कारवाई केली.त्याचा निषेध म्हणून पुण्यातीलच गजानन भास्कर मेहंदळे याने स्वत: लिहित असलेल्या 'शिव चरित्राची' एक हजार पाने नष्ट केली होती.त्या वेळेस हि मेहंदळेच्या पाने नष्ट करण्याच्या कृतीवर महाराष्ट्रातील आघाडीचे साप्ताहिक 'चित्रलेखा' ने संशय व्यक्त केला होता.असे काय लिहिले होते त्या पानात ? कि ती नष्ट करण्यात आली.असो.तर 'राजसंन्यास' या विकृत नाट्य कृतीच्या बाबत कुणी जाती साठी माती खाल्ली असेल हे सांगण्यास जोतिष्याची आवश्यकता नाही !