Friday, January 4, 2013

"जिजाऊ" चे स्मरण करताना !


१२ जानेवारी २०१३ "जिजाऊ जन्मोउत्सव" देशात-विदेशात आणि खास करून सिंदखेडराजा या जिजाऊ च्या जन्मगावी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.या दिना निमित्त जगभरातील मातृशक्तीचा सन्मान करणारे जिजाऊच्या समोर नतमस्तक होत आहेत. ज्या अर्थी हे वर्ष २०१३ आहे त्या अर्थी आपण  फार फार वर्ष पूर्वीचे अश्मयुगातील जीवन मागे टाकले आहे याचाच हा एक पुरावा आहे. पण शरीरात असणारा एखादा जुनाट दुर्धर आजारने ऐन मोक्याला डोके वर काढावे आणि आयुष्याच संपून जावे.अशीच काहीशी अवस्था आपल्या देशाची,समाजजीवनाची झालेली आहे.
एकीकडे आपण मातृशक्तीला सर्वोच्च स्थानी विराजमान करून या देशातील मातृसत्ताक समाज व्यवस्था परत पुन:स्थापित करण्यासाठी कटिबद्ध होत आहोत.झालो आहोत.आणि दुसरीकडे आपल्याच देशात दिल्ली मध्ये सामुहिक बलात्काची अत्यंत संताप जनक घटना घडून त्यात एका अनामिक मुलीचा जीव गेला आहे.दिल्ली मधील घटना हि काही या पहिली  देशातील घटना नाही.किंबहुना आपल्या देशातील बलात्काराची सरासरी काढल्यास प्रत्येक एका तासाला एक बलात्काराची घटना  घडत आहे.तर प्रत्येक अर्ध्या तासाला विनयभंग घडत आहेत.यातील बहुतांश घटना या समाजातील दिन-दलित,कष्टकरी,निराधार,लहान मुली यांच्या बाबत मोठ्या शहरापासून ते खेडेगावातील बांधाबांध वर घडत आहेत.आणि त्या भर म्हणजे कौटुंबिक अत्याचाराच्या घटनाची तर नोंदच सांगता येणे अशक्य आहे. आणि या सर्व घटनांमध्ये एकच व्यक्ती केंद्रभूत आहे ती  म्हणजे "स्त्री" ! जिला तिच्या जन्मा पासूनच 'तू' इतरांसारखी नाहीस.हेच सातत्याने बिंबवले गेले आहे.जात आहे.आपल्या देशातील मुळची संस्कृती असलेल्या शिव संस्कृतीचा संदर्भ सोडला तर आपल्या देशात आक्रमन करून प्रस्थापित झालेल्या वैदिक ब्राम्हण धर्माने सर्व प्रथम स्त्रीचा अपमान केला व मातृसत्ताक समाजजीवनाला पर्याय म्हणून पितृसत्ताक समाज व्यवस्था रूढ केली.पितृसत्ताक समाज व्यवस्था हि एक प्रकारची प्रतिक्रांतीच होती.हे आपण समजून घेतले पाहिजे.वैदिक ब्राम्हण धर्मातील वर्ण व्यवस्थे मध्ये प्रामुख्याने चार वर्ण होते हे आपणाला  माहित आहेच.पण....! स्त्री चे वर्णन कोणत्या वर्णात समाविष्ट आहे याचा शोध घेतला असता स्त्रीच्या अवस्थेची कल्पना येते.स्त्री हि ब्राम्हण आहे का ? नाही.स्त्री हि क्षत्रिय आहे का ? नाही.स्त्री हि वैश्य आहे का ? नाही.मग स्त्री हि शुद्र आहे का ? तर  त्याचे हि उत्तर आहे नाही.अजिबात नाही ! मग स्त्री आहे कुठे ? आणि  तिचा सामाजिक दर्जा काय ? तर वैदिक ब्राम्हणी धर्मानुसार स्त्री हि 'अवर्ण' आहे'.म्हणजे तिला ना आकार आहे ना उकार आहे.ती आहे फक्त उपभोगजन्य 'वस्तु' ! होय,वस्तूच ! आणि याचे समर्थन सनातनी कवी तुलसीदासने सुद्धा केले आहे.तुलसीदास म्हणतो,"ढोल गवार पशु और नारी ! सब है ताडन के अधिकारी !!" हे एकच उदाहरण नाही तर अशी लाखो नव्हे तर अनगिनत उदाहरणे वैदिक ब्राम्हणी धर्मग्रंथांच्या पानापानांवर आहेत.आणि त्याच वैदिक ब्राम्हणी धर्माचे आपण कळत-नकळत शिकार झालेलो आहोत.आपले भारतीय समाजजीवन तर या रोगाने पूर्ण ग्रस्थ झालेले आहे.त्यामध्ये सर्वात मोठा वाटा या देशातील मिडीयाचा आहे.जो आज दिल्लीतील बलात्काराच्या घटनांचे भांडवल करून खिसे भरून घेत आहेत.हा तोच मिडिया आहे.जो स्त्री हि नरकाचे दार आहे म्हणणाऱ्या असाहराम बापू व इतर अनेक बाबा-श्री श्री श्री-बुवा यांचे रात्रंदिवस उदात्तीकरण करण्यात गुंग असतात.आणि आता हेच दिल्लीतील निघणारे निषेध मोर्चे कव्हर करून थेट प्रसारण करीत आहेत.दिल्ली मध्ये घडलेली घटना निषेधाच्या पण पलीकडील आहे.पण या अगोदर फुलनदेवी या स्त्रीवर संपूर्ण उच्चवर्णनीय जमीनदारांनी गावासह सलग तीन दिवस बलात्कार केला.त्या वेळेस मिडिया नव्हता काय ? का तो बलात्कार नव्हता ? जेवढी प्रसिद्धी फुलनदेविच्या बंदूक हातात घेवून तिने घेतलेल्या प्रतिशोधा बद्दल दिली गेली.तेवढी तिच्यावर झालेल्या अत्याचाराला दिली गेली असती तर आज रस्त्या-रस्त्यावर मेणबत्या जाळण्याची वेळ भारतीयांवर आली नसती.आज मात्र अश्लीलतेच्या चौकटी कधीच मोडून मोकळे वावरणाऱ्या चित्रपट सुष्टीने सुद्धा निषेध नोदवावा या सारखा मोठा विनोद दुसरा कुठलाच नाही.
आपल्या देशात असणारी पुरुष प्रधान संस्कृतीच वाढत्या स्त्री अत्याचारास कारणीभूत आहे.कारण आपल्या देशातील सर्वच धर्मानी स्त्री हि 'अवर्ण' किंवा केवळ 'उपभोग' जन्य वस्तू म्हणूनच पहिले आहे.आज समाज,देश किती हि बदला असला तरी या देशातील हि विकृत मानसिकता आज हि कायम आहे.मुळामध्ये येथील धर्मानी मानवी जीवनाचा संपूर्ण ताबा घेतलेला आहे.त्यामुळे हि मानसिकता सहज सहजी बदलणे अवघड आहे.फक्त कायदा करून हा प्रश्न सुटणारा नाही.त्यासाठी आपल्या देशाची मूळ संस्कृती असणार्या 'मातृप्रधान संस्कृतीचा' जाणीवपूर्वक अंगीकार करावा लागेल.आणि त्यासाठी या देशातील सर्वच जाती-जमाती मधील स्त्री हि त्या त्या धर्मिक गुलामगिरीतून मुक्त झाली पाहिजे.त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे धर्मविरहित शिक्षण प्रणालीचा जाणीवपूर्वक अंमल करण्यात आला पाहिजे.अशा धर्मविरहीत शिक्षण प्रणालीतून तयार झालेली स्त्रीच या पुरुष प्रधान संस्कृतीचा 'काळ' ठरेल.व हि विकृती समाप्त करेल.पण,हे काम फक्त स्त्रीयाचेच नाही तर स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाचे आहे.
आज खर्या अर्थाने स्त्रीला सन्मानाचे आणि बरोबरीचे जीवनमान मिळवून द्यावयाचे असेल तर रस्त्यावर मेणबत्ती मोर्चा काढण्यापेक्षा आप-आपल्या घरातील  हि स्त्री हि उपभोग जन्य वस्तू समजणाऱ्या वैदिक ब्राम्हणी धर्म ग्रंथांची प्रत्येक चौका-चौकात जाहीररित्या होळी केली पाहिजे.आणि ती हि पुरुषांनी ! तरच जिजाऊचे स्मरण वंदनीय ठरणार आहे.
जय जिजाऊ ! जय शिवराय !!

Thursday, October 4, 2012

'राजसंन्यास'चा संशयकल्लोळ !

राम गणेश गडकरी लिखित 'राजसंन्यास' या सन १९२२ साली लिहिल्या गेलेल्या नाट्यकृती बाबत माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत.गडकरीच्या अपूर्ण ? राहिलेल्या 'वेड्याचा बाजार' आणि 'राजसंन्यास' या दोन नाट्यकृती असल्याचे सांगण्यात येते.पण अधिक माहित घेता यातील 'वेड्याचा बाजार'हि नाट्यकृती पुढील काळात राम गणेश गडकरी यांचे  निकटचे मित्र चिंतामण कोल्हटकर यांनी पूर्ण केले आणि १९२३ मध्ये प्रकाशित केले.
आता प्रश्न राहतो तो 'राजसंन्यास' या छत्रपती परिवाराची अत्यंत संतापजनक बदनामी करणाऱ्या नाट्यकृतीचा ! सन १९२२ सालाची  गडकरी यांची  हि नाट्यकृती त्यांचा  २३ जानेवारी १९१९ साली मृत्यु झाल्या मुळे अपूर्ण राहिल्याचे सांगितले जात आहे.आज घडीला  'राजसंन्यास' या नाट्यकृतीचे  अंक पहिला (प्रवेश१,२,३)अंक तिसरा (प्रवेश १  ) व अंक पाचवा (प्रवेश १,२,३,४,५)हे उपलब्ध आहेत.यातील अंक दुसरा व चौथा उपलब्ध नाहीत.(गडकर्यांच्या मृत्यू मुळे अपूर्ण राहिल्याचे बोलले जात आहे.) पण.........! नेमके हीच बाब संशय निर्माण करणारी आहे.कारण एकतर कोणताही नाटककार जे काही लिहाह्याचे असेल ते सलग लिहील एका आड एक अंक लिहिणार नाही.
पण गडकरी बुवा मात्र कमालच म्हणावे लागतील.कारण त्यांनी एका आड एक अंक लिखाण केले आहे.या सर्व प्रकारला संशय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील दोन उदाहने पाहणे महत्वाचे ठरेल.यातील पहिले उदाहरण म्हणजे 'ज्ञानेश्वरी' ची मूळ  प्रत वी.का.राजवाडे यांनी नष्ट केली आणि त्या ठिकाणी बनवत प्रत  महाराष्ट्राच्या माथी मारली  असे त्यांच्याच जात बांधवांनी नोंदवून ठेवले आहे.दुसरे उदाहरण म्हणजे इतिहास संशोधन ? करीत असताना दत्तो वामन पोतदार यांना पेशव्यांचा कारभारी नाना फडणवीस याने भोगलेल्या 'राखेल्याची' यादी सापडली.पठ्याने चक्क ती यादीच गिळून टाकली.म्हणजे नाना फडणवीस याने रखेल्या नुसत्या भोगल्या पण दत्तो वामन पोतदार याने तर त्या पचवल्या ! याला म्हणतात 'जाती साठी माती (सॉरी) रखेल्या खाणे !'
या प्रकारे महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास ब्राम्हणी हागणदारीने बरबटलेला आहे.यात आता 'राजसंन्यास' या नाटकाची भर पडत आहे.या नाटक बाबत मी स्वत: महाराष्ट्रातील मान्यवर इतिहासकार यांच्या कडून अधिकची माहिती घेतली असता.असे समजले कि 'महाराष्ट्र शासनाने' 'राम गणेश गडकरी समग्र वाड्मय' प्रकाशित केलेले आहे.त्याचे संपादन प्र.के.अत्रे यांनी केलेले आहे.सदर समग्र वाड्मय मध्ये अत्रे यांनी सदर नाटक स्वत: पूर्ण करून छापले आहे.तसेच काहीच्या मते हे नाटक 'बाळ सामंत' या कथाकाराने नंतरच्या काळात पूर्ण केले आहे.पण मला जो मुद्दा सर्वांच्या समोर आणावयाचा आहे तो असा कि,'राजसंन्यास' हे नाटक स्वत:  गडकरी याने त्याच्या हयातीतच पूर्ण केले असण्याची शक्यता आहे.कारण त्या काळात या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत.आणि त्याचा पुरावा म्हणजे 'राम गणेश गडकरी समग्र वाड्मय' याची संपूर्ण माहिती देण्यासाठी बनवण्यात आलेल्या http://ramganeshgadkari.com/ या संकेतस्थळावर या 'राजसंन्यास' नाटकाच्या सादरीकर झालेले फोटो उपलब्ध आहेत.




मग प्रश्न असा उरतो कि,आज जे 'राजसंन्यास' अपूर्ण आहे म्हणून दाखवण्यात येत आहे.ते ज्या प्रमाणे नंतरच्या काळात पूर्ण केले गेले असण्याची शक्यता सांगितली जात आहे.तशीच शक्यता पूर्ण असलेले नाटक नंतरच्या काळात 'अपूर्ण' करण्यात आले असण्याची शक्यता का असू शकत नाही ? म्हणजे पूर्ण नाटकातील (आता असणार्या अपूर्ण नाटकातील वादग्रस्त  मजकुरा पेक्षा ) जास्त वादग्रस्त मजकूर नंतरच्या कळत कशा वरून वगळण्यात आलेला नसेल ? किंवा नष्ट करण्यात आलेला नसेल.(उदा :  ज्ञानेश्वरी ची मूळ प्रत वि.का.राजवाडे याने नष्ट केली व नाना फडणवीस याच्या रखेल्या दत्तो वामन पोतदार यांनी गिळल्या !) या बाबत अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे जेम्स लेन ला विकृत माहिती पुरवली म्हणून एस.एस.बहुलकर या व्यक्तीला पुण्यातील शिवसैनिकांनी काळे फासले होते.त्या नंतर राज ठाकरेने बहुलकरची माफी मागितली त्याच दरम्यान संभाजी ब्रिगेड ने 'भांडारकर' वर कारवाई केली.त्याचा निषेध म्हणून पुण्यातीलच गजानन भास्कर मेहंदळे याने स्वत: लिहित असलेल्या 'शिव चरित्राची' एक हजार पाने नष्ट केली होती.त्या वेळेस हि मेहंदळेच्या पाने नष्ट करण्याच्या कृतीवर महाराष्ट्रातील आघाडीचे साप्ताहिक 'चित्रलेखा' ने संशय व्यक्त केला होता.असे काय लिहिले होते त्या पानात ? कि ती  नष्ट करण्यात आली.असो.तर 'राजसंन्यास' या विकृत नाट्य कृतीच्या बाबत कुणी जाती साठी माती खाल्ली असेल हे सांगण्यास जोतिष्याची  आवश्यकता नाही !

Friday, March 18, 2011

बडव्यांचा निर्णय दिशाभूल करणारा

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील बडवे-उत्पात व सेवाधारी यांनी भाविक भक्तांकडून दक्षिणा न मागण्यांचा घेतलेला निर्णय हा निव्वळ स्टंट असून सर्वसामान्य गोरगरीब भाविक भक्तांची दिशाभूल करणारा आहे, असे पत्रक येथील औदुंबरअण्णा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुळातच बी. डी. नाडकर्णी आयोगाच्या शिफारशीनुसार बडवे-उत्पात यांना गाभाऱ्यात व मंदिराच्या इतर कुठल्याही भागात दक्षिणा, ओवाळणी किंवा देणग्या मागण्याची मनाई आहे. दक्षिणा न मागण्याचा निर्णय हा नुकतेच आयकर विभागाने बडवे-उत्पातांना बजावलेल्या नोटिशीतून पळवाट काढून आपले उत्पन्न कमी दाखवण्याचा नियोजनबद्ध डाव आहे. तसे नसते तर आताच हा निर्णय घेण्याची सद्‌बुद्धी बडवे-उत्पातांना का सुचली? हा संशोधनाचा विषय आहे.
बडवे-उत्पातांनी विठ्ठलमूर्तीचे संरक्षण केल्याचा उल्लेख सातत्याने करण्यात येतो. जरी बडवे- उत्पातांनी विठ्ठलमूर्तीचे संरक्षण केले असले तरी त्यामुळे त्यांचा त्यावर हक्‍क प्रस्थापित होत नाही. त्यामुळे विठ्ठलमूर्तीचे संरक्षण करून बडवे-उत्पातांनी बहुजन समाजावर फार मोठे उपकार केल्याच्या आविर्भावात राहू नये. कारण याबाबत कोणत्याही ऐतिहासिक साधनांमध्ये कोणताच पुरावा उपलब्ध नाही.
या प्रकरणामध्ये सेवाधाऱ्यांना निश्‍चित मानधन देण्याचा विषय चर्चेत आहे. परंतु सेवाधारी हे काही मंदिराचे कायम कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांना कायम मानधन देण्याचा विषय हा गैरलागू तर आहेच पण ज्या बडवे-उत्पात व सेवाधारी यांच्याकडून ज्या भाविकभक्तांचा शेकडो वर्षे अगणित छळ करण्यात आला त्याच भाविकांच्या पैशातून बडव्यांना मानधन देणे हा सर्वसामान्य भाविकांचा अवमान आहे.
मुळातच नाडकर्णी आयोगाच्या शिफारशीनुसार बनवण्यात आलेल्या मंदिर अधिनियमाच्या अंमलबजावणीलाच या बडवे-उत्पात समाजाने दावा दाखल करून परंपरेच्या नावाखाली खोडा घातला आहे. त्यामुळे दक्षिणा न मागण्याचा निर्णय हा सर्वसामान्य भाविकांच्या डोळ्यात सरळ सरळ धूळफेक आहे आणि जर बडवे-उत्पातांना सर्वसामान्य भाविकांचा एवढा कळवळा असेल तर त्यांनी दाव्याचा अंतिम निकाल लागण्याची वाट न पाहता तत्काळ मंदिरातील अधिकार सोडावेत आणि मंदिर स्वतः शासनाच्या अधिपत्याखाली पूर्णपणे सोपवावे, असे पत्रक औदुंबर अण्णा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Saturday, March 12, 2011

बडवे-उत्पाताच्या कचाटयातुन पांडुरंगाची सुटका कधी ?


पंढरपुरचा पांडुरंग हा बहुजन समाजाचा लोकदेव आहे.त्याचा आणि वैदिक ब्राम्हण यांचा काडीचा ही संबंध नाही.तरीया बहुजन समजच्यादेवाताला आपल्या जानव्याच्या दोराने व परंपरेच्या नावाखाली  गेली अनेक दशके बांधून ठेवले आहे.आणि त्याच्या आडून आपली पोटे जाळण्याचा उद्योग ही मंडळी करीत आलेली आहेत.करीत आहेत.या सर्व प्रकरणाची  १९६६ ते २०११ च्या वास्तव परीस्थिती आपल्या समोर ठेवत आहे.
बडवे-उत्पाताच्या त्रासला वैयतागुन वारकरी यांनी सन १९६७ चे आलंदी यात्रेत वै.वरळीकर,मुंबई यांचे अध्यक्षते खाली वारकरी महा मंडलाची स्थापना केली.त्या नंतर कै.हरिभाऊ पाटसकर यांच्या नेतृत्वा खाली वारकर्याच्या मागणी प्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी २१/१०/१९६८ रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नाडकर्णी आयोगाची (श्री.बी.डी.नाडकर्णी,निवृत जिल्हा न्यायाधीश) यांची नेमणूक केली.नाडकर्णी आयोगाने अत्यंत कठीण परिश्रम घेउन पंढरपुर मंदिरातील गैरप्रकाराची सविस्तर चौकशी तसेच प्रथा-परंपरा यांचा अभ्यास करुन २ फेब्रुवारी १९७० रोजी शासनास चौकशी अहवाल सादर केला.तसेच पंढरपुर मंदिर अधिनियमाचा मसुदा सुध्दा यासोबत शासनास सादर केला.
नाडकर्णी आयोगाने बडवे-उत्पात सेवाधारी इ.चे हक्क,अधिकार व विशेषाधिकार काढून घेण्यात यावेत.देवताचे पूजेसाठी नौकर नेमावेत.धार्मिक देवालय राजकारणा पासून अलिप्त असावे.प्रांत दर्जाचा अधिकारी व्यवस्थापक असावा.देवलाच्या भागात दक्षिणा/ओवाळणी मागण्याची सक्त मनाई असावी.इ महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत.
सन.१९७३ साली.थोर स्वातंत्र्यसैनिक व विठ्ठल भक्त कै.शेलरमामा यांनी मुंबईतिल हुतात्मा चौकात प्राणातिक उपोषण केले होते.वारकरी महामंडल,रामदास बुवा मनसुख ,गो.श.राहिरकर यांच्या विनंतीला मान देऊन त्या वेळचे विधि व न्याय मंत्री ए.आर.अंतुले यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर मंदिर अधिनियम,१९७३ हा कायदा विधिमंडलाच्या दोन्ही सभाग्रहात मंजूर करण्यात आला.
सदर कायद्यान्वये बडवे,उत्पात,पुजारी यांचे अनुवंशिक अधिकार व विशेषाधिकार,मंदिरात दक्षिणा घेण्याचा किंवा मागण्याचा बडवे,उत्पात,सेवाधारी,शेत्रोपाध्याय,कोळ्याचे आणि इतर सर्वाचे अनुवंशिक अधिकार व विशेषाधिकार संपुष्टात आणण्यात आले आहेत.
समस्त बडवे मंडळ,समस्त बडवे समाज,उत्पात समिती यांच्या संबंधातिल त्यांच्या सर्व शक्ति,कर्तव्य,अधिकार व विशेषाधिकार इत्यादि सर्व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 
समितीच्या सुपूर्त करण्यात आले.
सदर कायदा अंमलात आणण्याची  अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द होण्यापुर्वीच  सन १९७४ मध्ये बडवे- उत्पात  यांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका (writ petition no 228  & 229 of 1974 ) दाखल करुन सदर कायद्याच्या वैधतेला आव्हान दिले.सदर याचिकेत आव्हानित कलेले मुद्दे हे पुराव्याच्या आधारे  सिद्ध करावयाचे असल्याने दिवाणी न्यायालयात दावे दाखल करण्याचे निर्देश मा.सर्वोच्च न्यायालयाने बडवे उत्पाताना दिले. 
त्याप्रमाणे बडवे-उत्पात यांनी सोलापुर येथील न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचे कोर्टात महाराष्ट्र शासन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या विरुध्द पंढरपुर मंदिरे अधिनियम १९७३ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारे दावे (regular civil suit no 527 of 1976  ) दाखल केले.सर्व संबंधीतांचे म्हणणे ऐकून व पुराव्याच्या अभ्यास करुन दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांनी सदर तिनीही दावे दिनांक २४/१/१९८४ रोजी दिलेल्या निकाला द्वारे फेटालून  लावले.
त्यानंतर बडवे,उत्पात व सेवाधारी यांनी सोलापुर येथील जिल्हा न्यायालयात पहिले अपिल (civil appeal no.105 of 1984 ) दाखल केले.तीसरे अतिरिक्त्त सहाय्यक जिल्हा न्यायाधीश यांनी दिनांक २८/११/१९८४ रोजी दिलेल्या निकालात ही सर्व अपिले फेटालून लावली.
त्यानंतर बडवे-उत्पात यांनी मुंबई उच्च न्यायालयात दुसरे अपिल दाखल (second appeal no 46 & 52 of 1985 ) दाखल केले.या अपिलाची सुनावनी होउन निकाल लागे पर्यंत मंदिराचे व्यवस्थापन करण्याबाबत अंतरिम निर्देश द्यावेत 
असा विनंती अर्ज (civil application no.238 of 1985 ) बडवे-उत्पातानी मा.उच्च न्यायालयात दाखल केला.या अर्जानुसार मा.न्यायालयाने अस्थायी समितीद्वारे मंदिराचे व्यवस्थापन सुरु ठेवणे बाबत तसेच अशा समितीमध्ये  बडवे-उत्पात यांच्या प्रतिनिधिंचा समावेश करणे बाबत अंतरिम आदेश दिनांक २१/२/१९८५ रोजी दिले आहेत.
त्यामुले "श्री विठ्ठलाच्या पायाशी अर्पण केलेली रक्कम बडवे यांनी व श्री रुक्मिणी मातेच्या पायाशी अर्पण केलेली रक्कम उत्पात यांनी उचलने" हे आजतागायत  चालू राहिले आहे. 
त्यानंतर अनेक वर्षे (२१ वर्षे) कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सदर अपिलाची सुनावनी पुढे ढकलण्यास बडवे-उत्पात यांना यश आले.मात्र २००६ चे एप्रिल-मे-जून या काळात सदर अपिलाची सुनावनी मा.उच्च न्यायालय (न्यायमूर्ति मा.अजय खानविलकर) यांचे समोर होउन संपली.दिनांक १६/११/२००६ रोजी मा.न्या.अजय खानविलकर यांचे कोर्टात सर्व अपिलांचा निर्णय जाहिर करण्यात आला.व सर्व अपिले नामंजूर करुन फेटालन्यात  आली.
मा.उच्च न्यायालयातील सदर अपिलांच्या सुनवणीच्या वेळी मा.शासनाच्या वतीने वरिष्ठ विधिन्य शेखर नाफड़े
यांनी तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने वरिष्ठ विधिन्य मा.अनिल साखरे व मा.शशिकांत सुराणा यांनी युक्तिवाद केला.बडवे यांच्या वतीने वरिष्ठ विधिन्य मा.बाळ आपटे व उत्पाताच्या वतीने वरिष्ठ विधिन्य मा.अभय अभ्यंकर आणि सेवाधारी यांच्या वतीने मा.विनीत नाईक यांनी युक्तिवाद केला. 
मा.उच्च न्यायालयाने सर्व संबंधीतांचा  युक्तिवाद ऐकून पंढरपुर मंदिरातील प्रथा परंपरांचा सर्व अनुषंगिक बाबींचा विचार करुन ३५३ पानांचे सविस्तर असे निकालपत्र
दिनांक १६/११/२००६ रोजी जाहिर केले.त्यामुले पंढरपुरच्या  विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बडवे-उत्पात आणि सेवाधारी यांचे हक्क आणि अधिकार हे संपु ष्ठात  येउन ते शासन नियुक्त अस्थायी मंदिर समितीकडे  सुपूर्त करण्यात आले.   
परिणाम स्वरूप बडवे,उत्पात,सेवाधारी व पंढरपुर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील इतर हक्कदार यांचे दक्षिणा
अथवा देणग्या व त्यापासून मिळणारे उत्पन्न स्वत:ला घेण्याचे सर्व अधिकार संपुष्टात आले.शासन नियुक्त समिती मंदिराचा कारभार 
पाहिल.तसेच बडवे,उत्पात,सेवाधारी व इतर यांचे भक्ताच्या नावाने देवतांची पूजा करणे इत्यादि अधिकार संपुष्टात आले.या निर्णयामुले संपूर्ण भारतातील व महाराष्ट्रातिल वारकरी भक्तांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले होते.
नोव्हेंबर -२००६ रोजी मुंबई उच्च न्यायालयात मा.न्या.अजय खानविलकर यांनी वरील निर्णय जाहिर केल्यानंतर बडवे,उत्पात,सेवाधारी यांच्या वकिलांनी सन १९८५ मध्ये दुसरे अपिल दाखल होताना जे अंतरिम आदेश दिलेले 
होते ( दिनांक २१/२/१९८५ रोजी दिलेले अंतरिम आदेश) तेच आणखी बारा आठवडे पुढे चालू रहावेत,अशी विनंती न्यायालयास केली.न्यायालयाने गेली २० वर्षे सुरु 
असलेले दिनांक २१/२/१९८५ रोजीचे अंतरिम आदेश १२ आठवडे पुढे चालू ठेवण्यास सर्व संबंधीताना आदेश दिले.
यानंतर बडवे-उत्पात यांनी मा.उच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाच्या विरोधात मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमति याचिका 
क्रमांक २८३०/२००७ ( ) दाखल केली.मा. सर्वोच्च न्यायालयाकडून 'जैसे थे' ( ) परिस्थिति ठेवण्याचे आदेश २३/२/२००७ रोजी मिळवलेत.त्यामुले आजही मा.उच्च न्यायालयाने 
दिनांक २१/२/१९८५ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार अंमलात आलेली व्यवस्था सुरु आहे.म्हणजेच आजही श्री विठ्ठलाच्या पायाशी 
अर्पण केलेली रक्कम बडवेनि उचलने व श्री रुक्मिणीच्या पायाशी अर्पण केलेली रक्कम उत्पात यांनी उचलने अशी व्यवस्था आजतागायत चालू राहिली आहे.
त्यानंतर २००९-१० या वर्षात तात्कालीन विधि व न्याय मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे-पाटिल यांनी या प्रकरनात  व्यक्तिश: लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाची बाजु भक्कमपणे मांडण्यासाठी दिल्ली येथील सुप्रसिध्द विधिन्य मा.हरीश साळवे यांना जेष्ठ वकील ( )म्हणून तसेच सुप्रसिध्द वकील श्री.पी.पी.राव यांची विशेष अभियोक्ता ( )म्हणून दिनांक १४/२/२०१० रोजी नियुक्ति केली आहे.
आज मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २३/२/२००७ रोजी दिलेल्या आदेशाला तसेच मा.उच्च न्यायालयाच्या दिनांक १६/११/२००६ रोजीच्या अंतिम आदेशाला ४ वर्षे पूर्ण होऊंनही सदर प्रकरण कधीही मा.सर्वोच्च न्यायालयाच्या समोर सुनावनीस आलेले नाही.
यावरुन असे स्पष्ट दिसून येते की,पंढरपुर मंदिरे अधिनियम १९७३ अस्तित्वात येण्यासाठी प्रचंड परिश्रम व कालावधी 
लागला आहे.त्यानंतर या कायद्याची अंशत:अंमलबजावनी  शक्य होऊंन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे शासनाच्या ताब्यात  येण्यासाठी १२ वर्षे (१९७३ ते १९८५) वाट पहावी लागली.त्यानंतर या प्रकरणाचा उच्च न्यायालयात अंतिम निकाल लागेपर्यंत २१ वर्षे (१९८५ ते २००६) इतका कालावधि लागला.तसेच या कायद्याची पूर्णपणे अंमलबजावनि करण्यासाठी अजुन किती वर्षे लागतील हे सांगता येत नाही.
म्हणजे १९६६-६७ साली (किंवा त्यापूर्वी अनेक वर्षे) असलेली मंदिरातील परिस्थिति आजही २०१०-११ या सालात कायम आहे.या परिस्थितिस जबाबदार कोण ? आणि......
बडवे-उत्पाताच्या कचाटयातुन पांडुरंगाला सोडवणार कोण ? आणि कधी ?

Friday, February 25, 2011

मराठीचा 'बाप' कोण ? 'मराठी भाषा' दिवस कुणाच्या नावावर ?

मराठी भाषा दिवस २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्याचे आवाहन तथाकथित मराठी भाषा प्रेमी सेना-मनसेवाल्यानी केले  आहे.या दिवसाच्या निमित्ताने बहुजन समाजाच्या दृष्ठिने काही प्रश्नाची उत्तरे शोधने आवश्यक आहे.त्यासाठीच हा लेखन प्रपंच !
सुरवातीला आपण मराठी आणि मराठा या दोन समान वाटणार्या पण परस्पर भन्न असणार्या शब्दाच्या व्याख्या समजुन घेतल्या पाहिजेत.या दोन शब्दाची व्याख्या पुढील प्रमाने सांगता येतील.तेथे आपण मराठी संस्कृति आणि मराठा संस्कृति याची नोंद घेतली पाहिजे.
मराठा संस्कृति:-छत्रपति शिवरायांनी उभारलेले स्वराज्य हे मराठा राज्य म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रात नोंद आहे.छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति झाल्यावर सभासद नावाचा बखरकार म्हणतो,"या युगी सर्व पृथ्वीवर मेच्छ बादशाह,मराठा पादशाह ऐवढा छत्रपति झाला.ही गोष्ट काही सामान्य झाली नाही."छत्रपति शिवरायांचे स्वराज्य मराठा राज्य असले तरी त्यातील 'मराठा' या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आहे.यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचा समावेश होतो.मराठा संस्कृति ही व्यापक संस्कृति आहे.यामध्ये आठरापगड़ जातीचा आणि बाराबलुतेदाराचा समावेश होतो.मराठा ही अन्ययाच्या विरोधात लढणारी वृति  आहे.या संस्कृतीचे मुळ हे हडप्पा-मोहोंजोधडो या मध्ये सापडते.म्हणून आपल्या देशाच्या राष्ट्रगीता मध्ये मराठा असा उल्लेख रविंद्रनाथ टागोर यांनी केला आहे.थोडक्यात  मराठा संस्कृति म्हणजे महात्मा बलिराजा पासून ते गोतम बुध्दान आणि जगदगुरु तुकोबरायण पासून ते छत्रपति शिवरायां पर्यत व पुढे फुले-शाहू-आंबेडकरांची संस्कृति आहे.बहुजन संस्कृति आहे.                                                                                                    
नेमके याच्या उलट मराठी संस्कृति आहे.तिचाही थोडक्यात आढावा घेऊ या.
मराठी संस्कृति:-मराठी संस्कृतिचे मुळ हे वैदिक ब्राम्हणी संस्कृतित आहे.ज्याप्रमाने ब्राम्हनानी आपल्या फायद्यासाठि हिंदुत्वाचे कवच घेतले आहे.तसेच महाराष्ट्रातील ब्राम्हनानी मराठीपणाचे कवच घेतले आहे.ब्राम्हनाच्या मते जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी अशी संकल्पना नसून जो जन्माने ब्राम्हण आहे.तोच केवळ मराठी माणूस म्हणून ओळखण्यात येतो.म्हणून तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांना "हे राज्य मराठा असणार की मराठी" असा खोचक माडखोलकरी प्रश्न विचारण्यात आला होता.म्हणजेच छत्रपति शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला या देशातील ब्राम्हनानी मराठी राज्य मानले नाही.आणि ते प्रत्येकशात मराठा स्वराज्य होते.हे आपण वर पहिलेच आहे.ब्राम्हनाच्या मते मराठी राज्य म्हणजे पेशवाई हे होय.मराठी संस्कृति ही अत्यंत संकुचित संस्कृति आहे.ज्यामध्ये ब्राम्हनांचा समावेश होतो.थोडक्यात मराठी संस्कृति म्हणजे सदाशिव पेठी संस्कृति.म्हणजे बामन एके बामन.                                
आता आपण मराठी भाषा दिवस या विषयकडे पाहू या.या दिवसाचा इतिहास पाहता तो फार अलीकडचा असल्याचे आपल्या लक्षात येते.११९५ साली महाराष्ट्रामध्ये सेना-बीजेपीचे युति सरकार असताना गणपतीला दूध पाजन्याचा चमत्कार करणारे चमत्कारी बाबा मनोहर पंत जोशी हे मुख्यमंत्री म्हणून गादीवर होते.यानीच २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून जाहिर केला.२७ फेब्रुवारी म्हणजे वि.वा.शिरवाडकर उर्फ़ कुसमाग्रज याचा जन्म दिवस आहे.या कुस्माग्रजांचे अल्प चरित्र पाहने या विषयासाठी आवश्यक आहे.दि.२७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे शहरात रंगनाथ शिरवाडकरांच्या घरात मुलगा जन्मला.नाव ठेवले गजानन.काकाकड़े दत्तक दिले.म्हणून नाव झाले:-विष्णु वामन शिरवाडकर !पुणे तेथे शिक्षण झाले.पत्रकारिता करित असताना कविता लिहायला सुरवात केली.त्यासाठी टोपन नाव घेतले कुसमाग्रज.अशा कुसमाग्रजाचे मराठी साहित्यात योगदान काय ?तर ऐकून १४ पुस्तके.त्यातील ही बरीच भाषांतरित.यांनी छत्रपति शिवरायांचा व मावल्याचा अपमान करणारी 'सात' नावाची कविताही लिहिली आहे.ती दाहवीच्या 'मराठी कुमारभारती' या पुस्तकात पान क्रमाक १२८ वर आहे.अशा पध्तिने  छत्रपतींचा अपमान करणार्याच्या नावाने 'मराठी भाषा दिन' दिन साजरा केला जातो.आणि ते ही परस्पर वेगले असल्याचे दाखवणार्या सेना
मनसे या ब्राम्हणवाद जोपासनार्या पक्षा कडून हे बहुजन समाजाने लक्षात घ्यावे.
कारण या  कुसमाग्रज पेक्षा काकनभर जास्तच नव्हे तर असे लाखो कुसमाग्रज ज्यांच्या पसंगालाही पुरणार नाहीत.अशी माणसे बहुजन समाजात आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.साहित्यसम्राट आन्नाभाऊ साठेचे नाव सुध्दा पुरेसे आहे.तरी पण ब्राम्हनाना पाहिजे जातीचा 'मराठी माणूस'.तसेच लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदा मराठीत भाषण करणारे क्रांतिसिंह नाना पाटिल सुध्दा यांना चालत नाहीत.आणि ज्या छत्रपति शिवरायांनी मराठी भाषेचा 'राज्यव्यवहार कोष' तयार केला.ते सुध्दा चालत नाहीत.अशा बामनी षड्यंत्रला बळी पडण्यासाठि जणू आम्हा बहुजनात स्पर्धाच सुरु असल्या सारखे आमच्यातील बैयताड तरुण मरत असतात.खंर तर त्याची चुक नाहीच.कारण "जेथे पोरग रडतच नाही.....तेथे आईने पजन्याचा प्रश्नच उदभवत नाही."
 (हा विषय समजुन घेऊ इच्छीनार्या लोकानी "मराठी की ब्राम्हणी" हे पुरुषोत्तम खेडेकर लिखित पुस्तक जरुर वाचावे.)

Thursday, February 24, 2011

रामदासी 'सदगुरु बैठकी' चा भांडाफोड़....!
'स्त्रीलंपट' रामदास 'सदगुरु' कसा ?
आदिलशाह,औरंगजेबाचा 'हेर'..! छत्रपति शिवरायांचा 'गुरु' कसा ?

बहुजनप्रतिपालक,कुळवाडीभूषण  छत्रपति शिवाजी महाराजांनी,स्वराज्य संकल्पक छत्रपति शाहजीराजे,राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व जगदगुरु तुकोबाराय यांच्या प्रेरणेनेमार्गदर्शनाखाली तमाम बहुजनाचे 'स्वराज्य'   उभारले.छत्रपति शिवरायांनी  आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात आठरापगड़ जातीतील मावळयांना सोबत घेउन केलेल्या 'बहुजन हिताय -बहुजन सुखाय' या कार्याला व खुद्द छत्रपति शिवरायांना कलंकित-बदनाम करणारी या देशातील सडक्या मेंदुची भट-ब्राम्हनाची नाजायज आवलाद पुन्हा माजली आहे.याच भट-ब्राम्हनानी महात्मा गोतम बुध्दान पासून संत शिरोमणी संत नामदेव महाराजांन  पर्यंत व जगदगुरु तुकोबरायान पासून ते राष्ट्रसंत गाडगेबाबान पर्यंत व महात्मा बलिराजा पासून ते छत्रपति शिवरायांन पर्यंत व पुढे छत्रपति संभाजी महाराजांन पासून ते फुले-शाहू-आंबेडकर-प्रबोधनकार-क्रांतिसिंह नाना पाटिल यांच्यासह सर्वच बहुजन महापुरुषांच्या व सर्व बहुजन समाजाचा इतिहास नासवन्याचे व बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे.सातत्याने रचत आहेत.
बहुजनानो......विचार करा......! याच भट-ब्राम्हनानी शेतकर्याचा बळीराजा पातालात घालून त्यांचा 'बळी' घेतला.तर 'जेम्स लेन'या विदेशी लेखकाच्या आडून पुण्यातील भांडारकर संस्थेतिल चौदा भटांसह,इतरानी राष्ट्रमाता-राजमाता जिजाऊना चरित्र्यहिन ठरवण्याचे व प्रत्यक्षात छत्रपति शिवरायांचा बापच बदलण्याचे आंतरराष्ट्रीय कट-कारस्थानासाठी देश-विदेशातील एकजात सर्वच भट-ब्राम्हण शेकडो वर्षापासून गुप्तरित्या विविध माध्यमातून 'कूचाळकी तंत्राचा' वापर करित होते.याच षड्यंत्राचा एक भाग म्हणून छत्रपति शिवरायांच्या 'जन्म तारखेचा वाद' शंभर वर्षापेक्षा जास्त काळ घातला गेला.तसेच,छत्रपति शिवरायांच्या लोकोत्तर कार्याचे श्रेय भटा-ब्राम्हनाना देण्यासाठीच शहाजीराजांचा सामान्य नोकर असणार्या दादू कोंढदेव गोचिवड़े-कुलकर्णी व रामदासाचे सातत्याने उदात्तीकरण करण्यात येत आहे.अशा प्रकारे बहुजन समाजाची अस्मिताच नष्ट करण्यासाठी सर्व ब्राम्हण व त्यांच्या सर्व संघटना रात्रं-दिवस राबत आहेत.म्हणुनच,बहुजनानो.....जागे राह.....कारण,आता रात्रच नव्हे तर दिवसही वैर्याचा आहे.
बहुजनप्रतिपालक छत्रपति शिवरायांच्या गुरुपदी रामदासाला बसवण्यासाठी 'हलकट रामदासी' वाटेल त्या थराला गेले  आहेत.जात आहेत.रामदासाला छत्रपति शिवरायांचा 'गुरु' म्हणून सांगणार्या भटा-ब्राम्हनांचा समाचार आपल्या जहाल लेखनितुन घेताना सत्यशोधक दिनकरराव   जवळकर म्हणतात, "शुद्र राजा राज्या भिषेक करुन घेतो,म्हणून धर्म बुडाला म्हणणार्या भिक्षुकी मनाला,एखादी भटीण शुद्र पलंगावरून उड्या ठोकित आली तरी समजत नाही ! राज्याची भिक्षा मागायला अल्लक म्हणून येणारा गोसावड़ा रामदास हा राज्याभिषेक प्रसंगी कोठल्या मठठीत गांजा खेचित बसला होता.याचा उलघडा भटोबा करतील काय ? जेव्हा जेव्हा शिवाजीचे गुरुपद रामदासी झोलित टाकनार्या आजच्या भटात भगवा भंगड रामदास,बजाजीखानाच्या शुद्धीप्रसंगी कोठे वेणुताईच्या महलात
सदा सर्वदा योग तुझा घडावा ! तुझ्या कारणी देह माझा पडावा !!
हा शुंगारमंत्र शिष्यीनिला शिकवित होता काय ?
(संदर्भ:-देशाचे दुष्मन,लेखक:-दिनकरराव जवळकर,पान.नं. १४ व १५)
बहुजनानो......वाचा....! ज्या दिनकरराव जवळकरांवर राजश्री शाहूनी अपार माया,प्रेम केले ते सत्यशोधक दिनकरराव जवळकर आपल्या छत्रपति पद्य संग्रह या पुस्तकात रामदासाच्या गुरु पदाचा बुरखा आपल्या तिखट लेखणीने टर्कवताना लिहतात,
ही भटे माजली फार ! खर्याला कोण जगि पुसणार !! ध्रु !!
शिवबाच्या गुरुपदी बसविती ! रामदास भंगडभाई !
कुठे शिवाजी तो रणगाजी ! कुठे शिष्यानीयार !!१!!
शिवबाला हे शुद्र ठरवुनि ! आडवे पडले अभिषेका !
त्या समयला हा गोसावड़ा ! झाला होता गार !!२!!
खान बजाजी खरा मराठा ! बाटून गेला पार !
श्री शिवबाने शुद्ध करविले ! केला देशोध्दार !!३!!
या शुद्धीच्या समयी नव्हता ! रामदास तो काय जीता ? !
भगवाभंडग खान्यापुरता ! भूमीला तो भार !!४!!
राज्य कमविले श्री शिवबाने ! शुर मराठे लढवोनी !
हा गोसावड़ा मठित बैसे ! गांजा खेची फार !!५!!
कुठे सिंह तो शिवबा राजा ! कुठे रामदासी कोल्हा !
कुठे मराठे ते लढवय्ये ! कुठे लाडू खाणार !!६!!
श्री शिवबाने राज्य कमविले ! हातावर शिर घेवोनी !
हा गोसावड़ा दारोदारी ! झोळीसह फिरणार !!७!!
असे हजारो कुबड़ीवाले ! राखुंडीतिल संन्यासी !
राज्य कमाऊ जरी लागले ! कशाला मग तलवार !!८!!
शिवबाच्या गुरुपदी शोभते ! जिजाऊ माता ती देवी !
भगवाभंडग गुरु बनविती ! नसताना आधार !!९!!
(संदर्भ:- छत्रपति पद्य संग्रह,लेखक:-दिनकरराव जवळकर,पान.नं.२० व २१)
अशा रामदासाला छत्रपति शिवरायांचा 'गुरु' म्हणून थापन्याचा प्रयत्न रामदासी सातत्याने करित आहेत.काय तर म्हणे.....! रामदासाने छत्रपति शिवरायांना 'स्वराज्य' स्थापन्यासाठी प्रेरणा दिली.खरे तर.....! प्रेरणा-आशिर्वाद तर सोडाच पण, या रामदासाची आणि छत्रपति शिवरायांची कधी ही भेट सुध्दा झालेली नाही.रामदास हा छत्रपति शिवरायांचा 'गुरु' तर नाहीच.नाही.पण हा रामदास विजापुरच्या आदिलशहाचा व औरंगजेबाचा 'हेर' मात्र नक्की आहे.तसेच रामदासाने 'रामदासी पंथ' ही आदिलशाहितच स्थापन केला होता.त्या बाबत आनंद घोरपडे लिहितात,"शिवाजिराजांच्या राज्य स्थापनेचा प्रारंभ १६४५ च्या सुमारास झाला हे वर आलेच आहे.त्यांची राजमुद्रा असलेले पहिले निर्णायक पत्र १६४६ चे (१५-पृ.१९) या रामदासी पंथाची स्थापना १६४९ ची (१५-पृ.३१) हा कालानुक्रम पाह्ताही शिवाजीची राज्यनिर्मितिची प्रेरणा समर्थंची नव्हेच.हा रामदासी पंथही त्यांनी आदिलशाहित स्थापला जेथे राजांचा कोणत्याही प्रकारचा अधिकार व संबंध पोहोचत नव्हता,व चाफळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजिराजांचे शत्रु होते.विजापूर पातशाहिचे दोन बडे अंमलदार मुरार जगदेव आणि बाजी घोरपडे यांनीच रामदासांच्या नव्या देवस्थानाला काही स्वत:च्या  जमिनी व काही विजापूर दरबारा मार्फत इनाम दिल्याचा उल्लेख आहे.(२०-पृ.३७) रामदासाचे ठोसर घराणे मुधोळच्या घोरपडे घराण्याचे आश्रित होते." (संदर्भ:-शिवछत्रपति समज : अपसमज,लेखक-आनंद घोरपडे.पान.नं.५८)
बहुजनानो......विजापूर दरबारात छत्रपति शहाजीराजांना अफजलखाना मार्फत कैद करणार्या मुरार जगदेव व बाजी घोरपडे यांच्याकडे हा रामदास आश्रयास असे.याच मुरार जगदेवाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता.त्यावर पुन्हा बाल शिवरायांनी जिजाऊ,शहाजीराजे व तुकोबारायांच्या साक्षीने सोन्याचा फाळ असलेला नांगर फिरवून  पुणे(पुनवडी) पुन्हा वसवले.हा सत्य इतिहास आहे.रामदास,मुरार जगदेव व बाजी घोरपडेचाच नव्हे तर अफजलखानाचा सुद्धा 'गुरु' होता.तर आदिलशहाचाच नव्हे तर,
रामदासी इतिहास लिहिला ! मराठ्यांचा अपमान केला !!
परडीच्या गडा,ब्रम्हवादी कंडा,सैतानाचा हंडा
मोंगलाचा हेर होता साला !!
(संदर्भ:-Exposition of cosmic truth,लेखक-वीर उत्तमराव मोहिते.पान.नं.६१)
म्हणजे बघा....! रामदास हा फक्त विजापुरच्या आदिलशहाचाच नव्हे तर मोगल बादशाह औरंगजेबाचा सुद्धा 'हेर' होता.या औरंगजेबा बरोबर रामदासाने मासान्न(मटन) स्वीकारले.त्या बाबत हा घ्या पुरावा,
मांस धृताने चपचपित अन्न !
पुलाव सानक पुढे ठेउन (औरंगजेब)
स्वीकार म्हणे कर जोडून,तव हास्य आले समर्था !!१०७!! दासविश्राम धाम !!
या रामदासाला मटन बघून आनंद झाला.याचा हा पुरावा खुद्द त्याच्या शिष्यानिच नोंदवले आहे.इतकेच नव्हे तर रामदासी मनोवृति म्हणजे 'मुखमे  राम,बगलमे नारी' असा हा भटी गौड़बंगालाचा वासनांध बाजार आहे.म्हणजे रामदास हा 'सदगुरु' म्हणण्याच्या सुद्धा लायकीचा नव्हता.कारण त्याचे अनेक ब्राम्हण बायकांशी अनैतिक शारीरिक संबंध होते.या बाबत विद्दवान इतिहासकार न.र.फाटक लिहितात,  "शिष्यानिंचा अपवाद.....रामदासांच्या शिष्यांची संख्या चाफळचे देवस्थान निर्माण होण्यापूर्वीच वाढू लागली होती.त्यात कित्येक बालविधवा स्त्रियाही होत्या.कराडची अक्काबाई व मिरजेची वेणुबाई यांची नावे रामदासांच्या शिष्य विस्तारात प्रामुख्याने झळकतात.स्त्री-शिष्यानिंचा हा प्रपंच त्यांच्या संप्रदाय चारित्र्याला मलिनता आणणारा आहे." (संदर्भ:-रामदास आणि पेशवाई,लेखक:-मा.म.देशमुख.पान.नं.३७)
रामदासाचा एक शिष्य 'दिनकर' याच्या ग्रंथात स्त्रीयां बाबत पुढील उल्लेख आहे.दिनकर म्हणतो, "परस्त्री-मग ती सुवासनी असली तरी प्रबोधनात(उपदेशकार्यात) त्याज्य(टाकाऊ) समजावी."कारण....
ज्यांचिया कटाक्षमात्रे अव्यसनी ! योगी भ्रंशती  तत्काळ !!
परवनीता पडता दुष्टि ! निश्कामासिही  अभिलाप उठी !
त्या येकान्ति बोधिता सुखसंतुष्टि ! घडो शके कैसे नि !!९!!
म्हणजे बघा.....!शिष्य सांगतोय,'स्त्रीच्या एका नजरेत योगी,सदगुरु सुध्दा तात्काळ भ्रमिष्ट होतो.स्त्रीच्या एका नजरेत कामवासना जागृत होते.त्या एकांतात असताना विषयसुख घडू   कसे शकत नाही.'शिष्य शेर तर गुरु सव्वाशेर.....!वा....रे रामदासी.आता हा वाचा रामदासी नंगाबाजार न.र.फाटक म्हणतात, "शिष्य संप्रदायात बायका होत्या असे नव्हे,तर त्या खास मेहेरबानितल्या व रात्री शरीरसेवा करणार्या होत्या.जेव्हा रामदास मठात राहात तेव्हा गाद्या-गिरद्या,पलंग आणि शिष्यानी असा त्यांचा झोपेचा सरंजाम असे." (पुष्ट २६८-२६९) (संदर्भ:-रामदास आणि पेशवाई.लेखक-मा.म.देशमुख.पान.नं.४१)
रामदासी प्रताप एवढ्यावर संपतील तर ते रामदासी कसले,हा रामदास वेनुबाईचे लुगड़े नेसून सतत आकरा दिवस हिंडत होता.रामदासाने केलेल्या रंडीबाजीचे समर्थंण त्याचाच एक शिष्य 'भिमस्वामी' आपल्या चरित्रात खुद्द रामदासाच्या तोंडूनच घडवले आहे.ते असे.....
सदगुरुचा कधी ना यावा वीट ! जरी झाला भ्रष्ट सर्वोपरी !!
जार कर्म जरी केले सदगुरुनी ! मानावे शिष्यानी कृष्णरूप !! (पृष्ट २६५,वि.न्यां.विस्तार जुलै १९२९)
याचा अर्थ सांगण्याची आवश्यकता वाटत नाही.कारण रामदासाने शिष्यानिशी केलेल्या संभोगाचे हे निर्लज्ज रामदासी समर्थंण आहे.ते ही खुल्लम खुल्ला....! इतके धंदे करणार्या रामदासाचा आणखी एक उद्योग म्हणजे 'दासबोध'! लग्न मंडपातून पलून जाणार्या रामदासाचा म्हणे 'संसार उपयोगी ?' ग्रंथ.ज्या प्रमाणे रामदास हा भंडग त्याच प्रमाणे त्याचा 'दासबोध' म्हणजे निव्वळ भटी बकवास अन भक्कस.हे त्यातील उदाहरणा वरून बघा.....दासबोध ब्राम्हण श्रेष्ठवाचा ठेंबा मिरवते.त्याचा हा नमुना....अर्थात रामदासाची जातीयवादी शिकवण म्हणजे 'दासबोध!' बहुजनानो.....वाचा....समजुन घ्या 'बोध'.रामदासाची दासबोधी विषारी लेखणी बामणी वर्चस्व कसे मिरवते....आणि बहुजनाना कसे हीनवते.....!
अंतर तो एक खरे,परी संगती घेऊ नये महारे !
पंडित आणि चाटी पोरे ! एक कैशी !!
अर्थ:-अंतर समजुन घ्या.महाराना सोबत घेऊ नका.पंडित आणि चाटी(लहान) पोरे एक कशी असू शकतात.
गुरु तो सकलाशी ब्राम्हण ! जरी तो झाला क्रियाहीन
तरी तयासीच शरण ! अनन्यभावे असावे !!
अर्थ:-ब्राम्हण हाच सर्वाचा गुरु आहे.जरी तो आचारभ्रष्ट आणि नीच असला तरी त्यालाच शरण जावे.
असो ब्राम्हण सुरवर वंदिती ! तेथे मानव बापुडे किती !
जरी ब्राम्हण मूढ़मती ! तरी तो जगद्व्द्य !!
अर्थ:-ब्राम्हनास साक्षात् देव नमस्कार करतात.त्या ठिकाणी सामान्य माणसाची काय लायकी आहे ? एखादा ब्राम्हण अड़ाणी,मुर्ख असला तरी तो श्रेष्ट आहे.
बहुजनानो.....वाचा....विचार करा ! अशा ब्राम्हणवादाचे व ब्राम्हनाचे उदात्तीकरण करणार्या 'दासबोधात' बहुजन समाजाची यथेच्छ निंदा-नालस्ती करण्यात आलेली आहे.हाच रामदास 'दासबोधात'  म्हणतो.....
देवा ब्रम्हणा राज्य करी ! तो एक मुर्ख !!
अर्थ:-देवा-ब्रम्हणांवर राज्य करणारा व्यक्ति मुर्ख असतो.
छत्रपति शिवरायानी ब्रम्हणांवर राज्यच केले नाही.तर वेळ पडल्यास त्यांना कठोर शिक्षाही दिल्या.अशा छत्रपति शिवरायाना हा रंडीबाज गोसावड़ा 'मुर्ख' समजतो.
बरं.....गुरु ब्राम्हणांचाच करा म्हणणारा रामदास बहुजन समाजाचा गुरु केल्यास शिष्याला काय म्हणतो,तर......
नीच यातिचा गुरु ! तोही कानकोंडा विचारू !
ब्रम्हसभेसी  जैसा चोरु ! तैसा दडे !!
अर्थ:-बहुजन समाजाला नीच म्हणून,या जातीचा गुरु केल्यास उच्चवर्णीय ब्राम्हण सभे मध्ये एखाद्या चोराने कोपर्याला बसावे तशी शिष्याची अवस्था होते.
म्हणजे बघा....!रामदासी हेका....अन गुरुपदी मलाच 'ठोका'...!इतर जातीचा गुरु केला तर शिष्याला सुध्दा चोरटा ठवणारा भंडग रामदास आणि त्याचा भंकस 'दासबोध' ! याच दासबोधातील जातीयवादी 'हगनदारीचा' हा घ्या आणखी एक पुरावा.....
महार,धेंड,चांभार ! त्यांचे राखावे अंतर !
राखावी बहुताची अंतरे ! भाग्य येते तद नंतरे !!
अर्थ:-महार,मांग,चांभार यांच्या पासून लांब राहवे.त्यांना शिऊ नये.तरच भाग्य उजलेल.
खरं तर...! हा 'दासबोध' नसून 'उदासबोध' आहे.अशा अनेक पोथ्या,पुराणे,ग्रंथ ही भटा-ब्राम्हणांची 'रोजगार हमी योजना' आहे.त्या रोजगार हमी पैकीच एक म्हणजे 'सदगुरु बैठका' या होय ! जो रामदास छत्रपति शिवरायांचा शत्रु आहे.त्या स्त्रीलंपटाचे उदात्तीकरण म्हणजे शिवरायांचा अपमानच ! आणि जो रामदास स्वत:  रंडीबाज आहे.त्याच्या 'सदगुरु बैठका'  म्हणजे 'छिनाल धंदा'! या छिनालबाजील जोडयाने मारले तरी कमी आहे.पण जोड़ा घाण करण्यापेक्षा,शब्दानेच मार देऊ या....तो ही त्यांना समजेल अशा भाषेत.....अरे रामदाश्या...!
मनाची नको लाज ठेवू तरी तू !
जनाची तरी ठेव पळपुटया नागडया थू !!
(संदर्भ:-हिंदू:जगण्याची समृद्ध अडगळ.लेखक-भालचंद्र नेमाडे.पान.नं.४५१)
बहुजनानो......अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली....! सावधान व्हा......सावधान....! रामदासी 'सदगुरु बैठका' वर बहिष्कार टाका.आदिलशहा,औरंगजेबाचा 'हेर' असणार्या 'स्त्रीलंपट,रंडीबाज' रामदासाचे उदात्तिकरण मोडून काढा ! छत्रपति शिवरायांचा स्वाभिमान जपा ! ऐपत नसताना बैठकितला 'रामदासी देव्हारा,कुंकू घेऊ नका....! आयुष्यातील अमूल्य वेळ,पैसा बरबाद करू नका...! त्या पेक्षा पोरा-बालाना शिकवा...!त्यांना कंप्यूटर,विन्यानवादी पुस्तके घेउन द्या.न्यान-विन्यानाचा विचार स्वीकार...!आपल्या हक्क-अधिकारासाठी लढा...!कुणाचेही 'दास'  होऊ नका....! जागे व्हा...आणि रामदास व रामदासी बैठकाचे सनातनी विष गादून टाका...! अन्यथा......परीस्थिति अटल आहे.

गांडू भडवे रण चढ़े,मर्दोंके बेहाल !
पतिव्रता भुकण मरे,पेढे खाये छिनाल !

Sunday, February 6, 2011

मिडियाचा दुटप्पीपणा...!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्यावर सध्या मिडीयातून टिका करण्याची स्पर्धा सुरु आहे.कारण काय तर,दादानी केलेले तथाकथित वक्तव्य.या प्रकरणावर सर्व अंगाने चर्चा होणे आवश्यक आहे.असे मला वाटते.या निमित्ताने काही प्रश्नाची उत्तरे शोधावी लागतील.त्यातील अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे,जेव्हा जेव्हा मिडियाशी संबंधित कोणतेही प्रकरण घडते.तेव्हा तेव्हा मिडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगितले जाते.पण वास्तव काय आहे ? "मिडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे का ?'' तर या प्रश्नाचे उत्तर पूर्णता नकारार्थी आहे.कारण भारतीय लोकशाहीचे केवळ तिन स्तंभ आहेत.आणि ते म्हणजे कायदेमंडल,न्यायपालिका आणि प्रशासन हे होय.यामध्ये कुठेही सतत्त्याने सांगितली जाणारी ''तथाकथित पत्रकारिता" याचा समावेश नाही.हे आपण समजुन घेतले पाहिजे.त्यामुले सातत्याने केली जाणारी "चौथ्या स्तंभाची" ओरड ही बनवेगिरी आहे.

आता,आपण अजितदादाच्या वक्तव्याकडे पाहू या....! मुलामध्ये जे काही घडले.ते मिडीयाच्या माध्यमातूनच लोकाच्या समोर आले आहे.आणि आज घडीला मिडीयावर विश्वास ठेवण्या लायक वातावरण आहे का ? याचा अर्थ असा अजिबात नाही की सर्व मिडियाच याला जबाबदार आहे.आज ही आपल्या जिवाची बाजी लावून पत्रकारिता करणारी "ग्रामीण पत्रकारिता" मी जवलुन पाहिली आहे.पण नेमके याच्या उलट "शहरी पत्रकारिता" चे वास्तव आहे.कारण नागपुर हिवाळी अधिवेशना दरम्यान आंदोलनकर्त्याच्या बातम्या लावण्यासाठी ''पैसा" मागितला जातो.हे मी स्वत: अनभुव घेतला आहे.मग या पार्श्वभूमीवर अजितदादाच्या मिडिया प्रकरणाकडे पाहिले पाहिजे.                                  
राज्यामध्ये दोन नेत्यांन बाबत मिडिया कसा भेदभाव करते हे पहा.याना अजितदादाची प्रत्येक गोष्ट कडू लागायला लागली ती "दादोजी कोंडदेव प्रकरणा" पासून.कारण या प्रकरणात दादानी कायदेशिर लोकशाहीवादी भूमिका घेतली होती.आणि नेमकी तीच मिडियातिल "ब्राम्हणवाद्याची पोटदुखी" आहे.एका बाजूला अजितदादाना अडचनीत आणण्याची एक ही संधि न सोडणारा मिडिया राज ठाकरे बाबत मात्र,राज ठाकरे उठले,राज ठाकरे बसले,राज ठाकरे हसले,राज ठाकरे रडले,राज ठाकरे हगले,राज ठाकरे मुतले,राज ठाकरे पादले या बातम्या सुद्धा "ब्रेकिंग नियुज" होतात.आणि हे सर्व जनतेला काही कळतच नाही या अविर्भावात दाखवले जाते.त्या मुले अजितदादाच्या मिडिया प्रकरणाला जास्त महत्व देने जरुरीचे वाटत नाही.आणि मिडियाने पण एक बाब समजुन घेतली पाहिजे....ऐ जो पब्लिक है,सब जानती है...!